बॉलिवुड आणि क्रिकेटचे नाते खुप जुने आहे. क्रिकेट विश्वातील अनेक खेळाडुंनी सिनेअभिनेत्री सोबत लग्न केली आहेत. मोहम्मद अजहरुद्दीन पासुन विराट कोहली, हरभजन सिंग, जहीर खान अशी अनेक नावे सांगता येतील. त्याच यादीत युवराज सिंगचेही नाव सांगता येईल.
बॉलिवुड एक्ट्रेस हेजल कीच ही युवराजची पत्नी आहे. बॉडीगार्ड चित्रपटात करीना कपुरच्या मैत्रिणीच्या भूमिकेत आपण तिला पाहिले असेल. सोशल मीडियावर मैत्री करुन युवराजने तिला पटवले होते. २०१६ मध्ये दोघे विवाहबद्ध झाले.
हेजलच्या आधी या एक्ट्रेससोबत जोडले गेले होते युवराजचे नाव
युवराज सिंग आणि हेजल कीच यांचा विवाह होण्याआधी बॉलिवूडमधील अनेक एक्ट्रेस सोबत युवराजचे नाव जोडले गेले होते. युवराज आणि प्रसिद्ध बॉलिवुड अभिनेत्री दीपिका पदुकोण यांच्यातील प्रेमप्रकरणाची चर्चा चांगलीच रंगली होती.
मोहब्बते चित्रपटात दिसलेल्या किम शर्मा हीच्यासोबतही युवराजचे नाव चर्चेत होते. याशिवाय एक्ट्रेस नेहा धुपिया, मॉडेल सोफी चौधरी, बिग बॉस स्पर्धक आंचल कुमार, काहो ना प्यार है मधील एक्ट्रेस अमिषा पटेल यांच्यासोबतही युवराजचे नाव जोडले गेले होते.
युवराज जेव्हा पत्नीलाच म्हणतो “मी एका माकडीनिशी लग्न केले”
झालं असं की तीन दिवसांपूर्वी युवराजने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. अबूधाबीत होणाऱ्या टी-१० लीग स्पर्धेत मराठा अरेबियन्स संघाला सपोर्ट करण्यासाठी युवराजने अभिनेता सोहेल खानला टॅग करुन “आला रे आला मराठा आला” अशी पोस्ट केली होती.
त्या पोस्टवर युवराजची पत्नी हेजलने गमतीने “युवराज तु खूप सुंदर दिसत आहेस, तू सिंगल आहेस का ?” अशी कमेंट केली. त्यावर युवराजनेही गंमतीने “नाही मी सिंगल नाही, मी एका माकडीनिशी लग्न केले आहे” अशी कमेंट केली. अर्थातच हे सगळं गंमतीगंमतीत होते.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.