सध्याचा काळ हा आपल्या प्रत्येकासाठीच आव्हानात्मक आणि संयमाची परीक्षा पाहणारा काळ आहे. शासनाने प्रत्येकालाच आपापल्या घरी राहायला सांगितले आहे. कंपन्या बंद आहेत. रोजगाराची साधने नाहीत. लोक आपली साठवलेली बचत वापरुन जगत आहेत, तर काही लोक उपाशीपोटीच झोपत आहेत. जिथे माणसालाच खायला मिळत नाही, तिथे मोठ्या हौसेने घरात पाळलेल्या पाळीव प्राण्यांची काय बात ? त्यांना पोसणे जड जात असल्याने आणि प्राण्यांमुळे कोरोना होईल या भीतीने काही लोक प्राण्यांना शहरात मोकाट सोडून आपापल्या गावी जात आहेत. परंतु एका महिलेची अशी बातमी समोर आली आहे, ज्यामध्ये ती ती महिला एकवेळ उपाशी राहून आपल्या १३ पाळीव कुत्र्यांना जगवत आहे.
कोण आहे ती महिला ?
ए. मीना असे त्या महिलेचे नाव असून ती चेन्नईमध्ये राहते. मीना एक स्वयंपाकीण म्हणून काम करते आणि मागच्या २१ वर्षांपासून तिला कुत्रे पाळण्याची मोठी आवड आहे. आजमितीला मीनाकडे १३ पाळीव कुत्रे आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने लॉकडाऊन घोषित केले तेव्हा मीनाला भविष्यात अन्नाची कमतरता भासेल याचा अंदाज आला होता. त्यासाठी तिने आपल्या मालकाकडून ऍडव्हान्स पगार मिळवण्यासाठीही प्रयत्न केला होता. मीना आपल्या कुत्र्यांची खूप काळजी घेते.
आपल्या १३ कुत्र्यांना जगवण्यासाठी ती राहते एकवेळ उपाशी
मीनाचा अंदाज खरा ठरला आणि लॉकडाऊन काळात काळात अन्नाची कमतरता भासू लागली. अशामध्ये आपल्या कुत्र्यांना उपाशी राहावे लागू नये म्हणून मीनाने स्वतः एकच वेळ जेवण करुन एकवेळ उपाशी राहण्याचा निर्णय घेतला. याबाबत तिला विचारले असता ती सांगते की, “मला खाण्याची जास्त आवड नाही. मला जे खायला मिळेल ते मी माझ्या कुत्र्यांसोबत वाटून खाते. आता मी सावधगिरी बाळगून दिवसातून एकदाच जेवते आणि बाकीचे माझ्या कुत्र्यांसाठी वापरते.”
मीना केवळ तिच्या १३ कुत्र्यांनाच नाही, तर घराबाहेरच्या भटक्या कुत्र्यांनीही खायला घालायची, पण आता अन्नधान्याचा साठा आणि कमाई कमी झाल्यामुळे तिला ते जमत नाही. परंतु हा कोरोना संपेल आणि सर्वकाही ठीक झाल्यानंतर मी पुन्हा त्या भटक्या कुत्र्यांना खायला घालू शकेल असा मीनाला विश्वास आहे.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.