रोहित शर्माने स्वतः सांगितले या वर्ल्डकपमध्ये तो स्वतःच्या फलंदाजीवर खुश का नाहीये..

भारताने २०१९ च्या विश्वचषकात दमदार कामगिरी केली आहे. भारताच्या टीमने लीग स्टेजला पहिले स्थान मिळवले. यंदाच्या विश्वचषकात संपूर्ण भारतीय टीमने चांगली कामगिरी केली आहे. पण फलंदाजीमध्ये रोहित शर्मा सध्या सर्वांच्या खूप पुढे आहे. रोहित सध्या जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. रोहित शर्माने विश्वचषकात खेळलेल्या ९ मॅचमध्ये ९२.४३ च्या ऍव्हरेजने ६४७ धावा ठोकल्या आहेत.

रोहित शर्माने या विश्वचषकात अनेक विक्रम रचले आहेत. रोहितने ९ मॅचमध्ये ५ शतक झळकावले आहेत. रोहितने एका विश्वचषकात सर्वाधिक ५ शतके ठोकण्याचा विक्रम केला आहे. तसेच रोहितनी विश्वचषकात सर्वाधिक शतकांच्या सचिन तेंडुलकरच्या रेकॉर्डची देखील बरोबरी केली आहे. सचिनच्या नावावर विश्वचषकात ६ शतके आहेत. तसेच रोहित शर्मा एका विश्वचषकात सचिनच्या सर्वाधिक धावांच्या रेकॉर्डच्या देखील जवळ पोहचला आहे. रोहितला अवघ्या २७ धावांची गरज आहे.

रोहित शर्माने मागच्या तीन मॅचमध्ये सलग तीन शतके झळकावले आहेत. रोहितने इंग्लंच्या विरोधात १०२ रन, बांगलादेश विरुद्ध १०४ रन अन श्रीलंकेविरुद्ध १०३ रन केले होते. रोहित शतक झाल्यानंतर तात्काळ आऊट होत आहे. त्यामुळे तो थोडा निराश आहे. सेमीफायनलमध्ये मोठी धावसंख्या उभारून तो त्याची हि चूक सुधारू इच्छितो.

स्वतःच्या फलंदाजीवर खुश का नाहीये रोहित?

रोहित या विश्वचषकात सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. रोहितने रेकॉर्डब्रेक कामगिरी केली असली तरी तो त्याच्या कामगिरीवर खुश नाहीये. रोहितने याबद्दल पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. रोहितच्या मते हा विश्वचषक टीम इंडिया जिंकली तरच तो आपल्या फलंदाजीवर खुश होईल. जोपर्यंत टीम इंडिया वर्ल्डकप आपल्या नावावर करत नाही तोपर्यंत माझ्या रेकॉर्डना काही अर्थ उरत नाही. तुम्ही कितीही रन केले तरी शेवटी विजय महत्वाचा आहे असे रोहित म्हणाला.

जुन्या आठवणींना दिला उजाळा-

रोहितने आयपीएलच्या आठवणी देखील यावेळी सांगितल्या. जेव्हा रोहित फॉर्ममध्ये नव्हता तेव्हा त्याला युवराज सिंगने खूप मदत केल्याचे सांगितले. तेव्हा युवराजने सांगिलते होते कि जेव्हा गरज असेल तेव्हा तू रन बनवशिल. युवराजचे शब्द या वर्ल्डकपमध्ये खरे ठरत आहेत. रोहित प्रत्येक मॅचमध्ये पहिलीच मॅच असल्याचे समजून खेळतो.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.