आपल्याला नेहमी कुतूहल राहत कि देशात आपले स्थान काय ? देशाच्या १४ व्या राष्ट्रपतिपदी विराजमान रामनाथ कोविंद हे भारताचे पहिले नागरिक बनले तर देशाचे दुसरे नागरिक अर्थात उपराष्ट्रपति व्यंकय्या नायडू हे झाले. नागरिकत्वाच्या क्रमानुसार सामान्य नागरिकाचा यात नेमका नंबर कितवा? हे पाहू…
तिसरा नागरिक देशाचा पंतप्रधान असतो. चौथा नागरिक हा राज्यपाल (स्वत:च्या संबंधित राज्यात)राज्यपाल असतो. पाचवा नागरिक देशाचे माजी राष्ट्रपती व देशाचे उप प्रधानमंत्री हे आहे.
सहावा नागरिक देशाचे सरन्यायाधीश, लोकसभा अध्यक्ष आहे. सातवा नागरिक देशाचे केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्य, राज्यांचे मुख्यमंत्री, निती आयोगचे उपाध्यक्ष, माजी पंतप्रधान, राज्यसभा आणि लोकसभेचा विरोधी पक्ष नेता हे सर्व येतात. आठवा नागरिक भारतातील मान्यताप्राप्त राजदूत, मुख्यमंत्री (स्वत:च्या राज्याबाहेर), राज्यपाल (स्वत:च्या राज्याबाहेर) हे असतात.
नववा नागरिक सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश , दहावा नागरिक राज्यसभेचे उपाध्यक्ष, उपमुख्यमंत्री, लोकसभेचे उपसभापती, निती आयोगातील सदस्य, संरक्षण विभागाशी निगडीत इतर मंत्री असतात. अकरावा नागरिक अॅटर्नी जनरल, मंत्रिमंडळ सचिव, उप-राज्यपाल (केंद्रशासित प्रदेशांसह) हे सर्व येतात.
१२ वा नागरिक तिन्ही संरक्षण दलांचे प्रमुख, १३ वा नागरिक हे असाधारण राजदूत आणि पूर्णाधिकार प्राप्त मंत्री , १४ वा नागरिक राज्यांचे चेअरमन आणि राज्य विधानसभेचे सभापती, हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश आहे. १५ वा नागरिक राज्यांचे मंत्रिमंडळ सदस्य, केंद्र शासित राज्यांचे मुख्यमंत्री, दिल्लीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, केंद्रातील उपमंत्री हे आहेत.
१६ वा नागरिक लेफ्टनंट जनरल आणि प्रमुख अधिकारी, १७ वा नागरिक अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष, अनुसूचित जाती-जमातीच्या राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष, हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश (स्वत:च्या राज्याबाहेर) , १८ वा नागरिक कॅबिनेट मंत्री (स्वत:च्या राज्याबाहेर), राज्यांच्या विधानसभेचे सभापती आणि अध्यक्ष (स्वत:च्या राज्याबाहेर), राज्यांच्या विधानसभेचे उपाध्यक्ष, राज्यांचे मंत्री हे आहेत.
१९ वा नागरिक केंद्रशासित राज्यांचे मुख्य आयुक्त, केंद्रशासित राज्यांचे उपमंत्री, केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभेचे उपाध्यक्ष, २० वा नागरिक राज्यांच्या विधानसभांचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष (स्वत:च्या राज्याबाहेर), २१ वा नागरिक खासदार,२२ वा नागरिक राज्यांचे उपमुख्यमंत्री (स्वत:च्या राज्याबाहेर) आहेत.
२३ वा नागरिक लष्कराचे कमांडर, व्हाइसचीफ आणि इतर महत्त्वाचे अधिकारी, राज्य सरकारचे मुख्य सचिव, अल्पसंख्याक आयागोचे आयुक्त, अनुसूचित जाती-जमाती आयोगांचे आयुक्त, अल्पसंख्याक आयोगातील सदस्य, राष्ट्रीय अनुसूचित जाती आणि राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे सदस्य, २४ वा नागरिक उप राज्यपालांच्या रँकशी समकक्ष अधिकारी , २५ वा नागरिक भारत सरकारचे अतिरिक्त सचिव, २६ वा नागरिक भारत सरकारचे संयुक्त सचिव, मेजर जनरल रँकशी समस्क रँकचे अधिकारी
आणि सर्वात शेवटी आपला नंबर
या सर्वांनंतर देशातील सामान्य व्यक्ती असतो देशाचा २७ वा नागरिक.