नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले. पण दोन्ही पक्षांनी आपलाच मुख्यमंत्री होणार असा ठाम निर्धार केल्याने सत्ता स्थापनेचा तिढा निर्माण झाला आहे. युती करताना सत्तावाटपात समसमान हिस्सा असे ठरले असल्याचे शिवसेना वारंवार सांगत आहे. पण भाजप मात्र देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री बनणार असे भाजपकडून सांगण्यात येत आहे.
शिवसेना भाजप यांच्यातील हा तिढा सुटला नाही तर शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस अशा समीकरणांची राज्यात शक्यता आहे. शिवसेनेने प्रस्ताव पाठवल्यास राष्ट्रवादी पाठिंबा देण्यास तयात असल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून वारंवार सांगण्यात येत आहे.
भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरीही संख्याबळ नसल्यानं त्यांनी सत्ता स्थापनेचा दावा केलेला नाही. अशा परिस्थितीत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे. मात्र अशी परिस्थिती येणार नसल्याचे राष्ट्रवादीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करू शकते. या सरकारला काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा असेल. त्या बदल्यात काँग्रेसला विधानसभेचे अध्यक्षपद दिलं जाईल अशी शक्यता आहे. १९९५ च्या फॉर्म्युल्यानुसार शिवसेना आघाडीसोबत सरकार स्थापन करू शकते. यावर चर्चा करण्यासाठी काल शरद पवार यांनी दिल्ली सोनिया गांधी यांच्याशी बराच वेळ चर्चा केली.
दरम्यान भाजप शिवसेना युती कायम ठेवून सत्ता स्थापन करणार की, शिवसेना मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. जर कोणीच सत्ता स्थापनेचा दावा नाही केला तर राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते. असे झाल्यास शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीला आमदार फुटण्याची भीती देखील राहणार आहे. पण या भीतीवर काँग्रेस राष्ट्रवादीने एक शक्कल काढली असून काल जयंत पाटील यांनी याबाबत भाष्य केले.
आमदार फुटल्यास राष्ट्रवादी वापरणार हि शक्कल-
कर्नाटकमध्ये भाजपने सर्वाधिक जागा मिळवल्या होत्या. काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर यांनी मिळवून भाजपला बाजुला ठेवत सत्ता स्थापन केली होती. मात्र भाजपने काँग्रेस आणि जेडीएसचे अनेक आमदार फोडत हे सरकार पाडले. राज्यातही असे काही होण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही.
हि संभाव्य फुटीची शक्यता लक्षात घेऊन जयंत पाटील यांनी सांगितले आहे कि सत्ता स्थापन झाल्यानंतर आमदार फुटल्यास, त्या आमदाराला पाडण्यासाठी शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येईल. ज्या कोणत्या पक्षाचा आमदार फुटेल त्याला पाडण्यासाठी बाकीचे सर्व पक्ष एकत्र येतील असे त्यांनी सांगितले आहे. त्यांनी सांगितले कि निवडणुकीपूर्वी सोडून गेलेले ८० टक्के नेते पराभूत झाले आहेत. नंतरही कोणी फुटले तर त्याला अशाप्रकारे अद्दल घडवली जाईल असा इशारा दिला आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.