वैद्य राज , हकीम , डॉक्टर जैन इत्यादी नावानी बस स्थानकावरील किंवा सार्वजनिक शौचालयाच्या भिंती यांनी कव्हर केलेल्या असतात. स्वप्नदोष, वीर्यपतन इत्यादी शब्द लिहून सर्वावर एकच इलाज यांच्याकडे असा या डॉक्टरांचा दावा असतो. परंतु कधी यांच्याकडे कोणी गेले आहे का ?
लग्नानंतर शारीरिक संबंधात समाधान नसेल, लिंग लहान मोठे, धातुदोष , स्वप्नदोष इत्यादी भारी भारी शब्द लिहलेले लिफाफे भिंतीवर लावून असतात. आता तर वृत्तपत्रात हि त्यांच्या जाहिराती येणे सुरु झाले आहे. विशेष म्हणजे हे सर्व डॉक्टर गोल्ड मेडलिस्ट असतात. अश्याच प्रकारे पहिले गावाकडे जडी बुटीची दुकाने लावलेली असायची.
ज्यामध्ये तो जुडी बुटी विकणारा मोठ मोठ्या सिनेस्टार सोबत फोटो त्याचे फोटो असायचे. अमिताभ, गोविंदा, मिथुन तर हमखास त्यांच्या अल्बम मध्ये असेलच. आणि तो दावा करतो कि त्याने दिलेल्या औषधामुळे यांच्या अनेक समस्या दूर झाल्या. याच खोट्या प्रचारास बळी पडून अनेक लोक आपला आजार वाढवून घेतात.
आता आपल्या विषयाकडे वळूया तर ह्या जाहिरातीवरील नंबर वर कधी आपण फोन करायचा प्रयत्न केला आहे आहे का ? तर असाच एक प्रसंग आपल्याला इथे सांगणार आहोत कि एका व्यक्तीने ह्यांना फोन केल्यावर काय घडले. तर सर्वात पहिले तर इथे फोन केल्यावर भेट देण्याची गरज नाही फोनवर सुध्दा आपला इलाज करणार असा दावा केल्या जातो परंतु यासाठी पैसे जास्त लागतील असे ते सांगतात.
पावडर,जेल आणि पेस्ट या स्वरुपात सर्व औषधे असतील हे सांगितल्या जाते. तर ते सांगतात कि ह्या पावडर जेल अथवा पेस्ट ने मालिश करायची आणि सर्व दोष दूर होतात. त्या सोबत कैप्सुल आणि सिरप सुध्दा दिला जातो परंतु प्रत्येकाला याची गरज असेलच हे सांगता येत नाही. समस्ये नुसार औषधे असतात. सोबत मेमरी कार्ड सुध्दा दिले जाते.
तर ह्या सर्व याचा खर्च किती तर महिन्याला ३२०० रुपये अशी या कोर्सची फी आहे. आणि त्या नंतर सतत यांचे फोन येत राहतात कि आमचा कोर्स कधी घेणार. परंतु ह्या सर्व गोष्टी फसव्या असतात हे एखाद्या हुशार व्यक्तीस कळायला वेळ नाही लागणार. बाकी निर्णय आपला आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.