हाय चिकू, सर्वप्रथम तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मला खात्री आहे की आपल्या भविष्याबद्दल तुझ्या मनामध्ये माझ्यासाठी बरेच प्रश्न असतील. परंतु मला माफ कर, मी त्यापैकी बऱ्याच प्रश्नांची उत्तरे देणार नाही, कारण संग्रहामध्ये काय आहे हे माहित नसेल तरच प्रत्येक आनंदाचा धक्का गोड बनतो, प्रत्येक आव्हान रोमांच आणि प्रत्येक निराशा शिकण्याची संधी देते. आज तुला हे कळणार नाही, पण हे मुक्कामापेक्षा प्रवासाबद्दलच जास्त आहे आणि हा प्रवास विलक्षण आहे.
मला तुला जे काय सांगायचे आहे ते असे की, विराट आयुष्याच्या संग्रहामध्ये तुझ्यासाठी मोठ्या गोष्टी आहेत .पण तुझ्या मार्गावर येणाऱ्या प्रत्येक न प्रत्येक संधीसाठी तू तयार असला पाहिजेस. ती येईल तेव्हा ती पकड आणि जे सहजासहजी मिळेल ते घेऊ नकोस. ते मिळवा कधी येईल याचा विचार करू नका. तू अपयशी होशील, प्रत्येकजण अपयशी होतो.
फक्त स्वतःला वचन दे की तू पुन्हा उभा राहायला विसरणार नाहीस, आणि जर पहिल्यांदा तुला ते जमले नाही, तर पुन्हा प्रयत्न कर. अनेकजण तुझ्यावर प्रेम करतील आणि जे तुला ओळखत नसतील त्यांना तू कदाचित आवडणार देखील नाही. पण त्यांची काळजी करु नकोस, स्वतःवर विश्वास ठेव
मला माहित आहे तू त्या शूजविषयी विचार करत आहेस जे बाबांनी तुला आज गिफ्ट केले नाहीत. पण त्यांनी सकाळीच तुला जी मिठी मारली किंवा त्यांनी तुझ्या उंचीवर जो विनोद केला, त्याच्याशी तुलना करता त्याला काहीच अर्थ राहत नाही. तू हे हृदयात जतन कर. मला माहित आहे की ते कधीकधी खूप कडक दिसायचे. पण हे अशासाठी की त्यांना तुझे भले हवे होते.
तुला वाटेल की आपले पालक कधीकधी आपल्याला समजून घेत नाहीत, पण लक्षात ठेव – केवळ आपले कुटुंबच आपल्यावर बिनशर्त प्रेम करते. याबदल्यात त्यांच्यावर प्रेम कर, त्यांचा आदर कर आणि त्यांच्यासोबत जास्तीत जास्त वेळ व्यतीत कर. बाबांना सांग की तुझे त्यांच्यावर प्रेम आहे. खूप. त्यांना आज सांग. त्यांना उद्या सांग. त्यांना वारंवार सांग. तू स्वतः बन.
शेवटी, तुझे हृदय सांगेल तसे कर. तुझ्या स्वप्नांचा पाठलाग कर, दयाळू बन आणि जगाला दाखवून दे की मोठी स्वप्ने बघण्यात काय वेगळेपणा असतो. आणि…पराठ्याची चव घे मित्रा ! येणाऱ्या काही वर्षात तोच ऐषोआराम असेल. प्रत्येक दिवस विलक्षण बनाव…
तुझा विराट !
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.