भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार, जगातील सर्वोत्तम विकेटकिपर, बेस्ट फिनिशर अशी ओळख असणारा महेंद्रसिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याची कुठलीही घोषणा त्याने अद्याप केली नाही.
मात्र भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने १२ सप्टेंबर रोजी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर धोनी सोबतच त्याचा एक फोटो पोस्ट केला होता, त्यानंतर धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना सोशल मीडियावर ऊत आला.
विराट कोहलीचे ट्विट
विराट कोहलीने ट्विटरवर महेंद्रसिंग धोनी सोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत विराट गुडघ्यावर बसून विजयाचा आनंद साजरा करत आहे आणि धोनी त्याच्याकडे चालत निघाला आहे.
या ट्विटमध्ये विराटने म्हटले आहे, “मी हा सामना कधीही विसरू शकत नाही. ती माझ्यासाठी खास रात्र होती. या माणसाने मला फिटनेस टेस्ट असल्याप्रमाणेच धावा काढण्यास भाग पाडले होते.” वास्तविक हा फोटो २०१६ च्या टी-२० वर्ल्ड कपमधील आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान मोहाली येथे हा सामना खेळला गेला होता. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला सहा गडी राखून पराभूत केले होते.
…आणि धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण
विराट कोहलीच्या ट्विटनंतर महेंद्र धोनी १२ सप्टेंबरला प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपल्या निवृत्तीची घोषणा करणार असल्याची अफवा सोशल मीडिया व्हायरल झाली होती. धोनीच्या निवृत्तीच्या बाबतीत चर्चांना उधाण आले होते. विराट कोहलीने एक ट्विट केले आणि धोनीचे सगळेच चाहते संभ्रमावस्थेत सापडले होते.
धोनीसोबतचा ‘तो फोटो शेअर करण्यामागे होते हे कारण-
आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत माजी कर्णधार धोनी दिसणार नाही. वेस्ट इंडिजपाठोपाठ धोनीनं याही मालिकेतून विश्रांती देण्याची विनंती निवड समितीकडे केली होती आणि ती मान्यही झाली. धोनीची फटकेबाजी या मालिकेत दिसणार नसली तरी कॅप्टन कोहलीनं एक भावनिक फोटो शेअर करून धोनीचे आभार मानले आहे.
तो फोटो शेअर करण्यामागचे कारण सांगताना कोहली म्हणाला ”माझ्या मनात दूरदूर पर्यंत असा विचार नव्हता की धोनी निवृत्ती घेतोय. बस मला त्या सामन्याची आठवण झाली. त्यामुळे मी सहज तो फोटो शेअर केला. पण, लोकांनी त्याचा भलताच अर्थ लावला गेला.”
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.