नौकरी किंवा व्यवसायामध्ये व्हिजिटिंग कार्ड ची आवश्यकता असते. परंतु घर काम करणाऱ्या मावशीनी असे व्हिजिटिंग कार्ड छापावे हे नवलच वाटते. आणि अस झालेले आहे पुणे बावधन मध्ये आणि परत पुणे तिथे काय उणे हि म्हण सार्थकी लागली आहे.
कामाची गरज आहे म्हणून व्हिजिटींग कार्डचा पर्याय गीता मावशींनी निवडला. आणि सोशल मिडिया व नेटकरी लोकांची कमाल या मावशी एका रात्रीत प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांना कामासाठी एवढे फोन येत आहेत की गेल्या दोन दिवसांपासून त्यांनी फोन बंद ठेवला आहे. बावधनमध्ये काम हवयं म्हणून त्यांनी हे कार्ड छापलं.
मुळच्या कर्नाटकमधील गुलबर्ग्याच्या आहे. पुण्यात काम मिळवण्यासाठी संपर्क कसा वाढवायचा, हा प्रश्न होता. त्यामुळं हा प्रयोग त्यांनी केला आहे. व्हिजिटिंग कार्ड मुळे संपूर्ण भारतातून त्यांना फोन येणे सुरु झालेले आहे आणि या कारणामुळे शेवटी मावशीना आपला फोन बंद करावा लागला आहे. गीता मावशीचे पूर्ण नाव गीता काळे हे आहे. परंतु गीता मावशींना हि जबरदस्त आयडिया देणारी कोण आहे तर या मागे आहे धनश्री शिंदे ज्यांच्या कडे मावशी काम करतात.
गीता काळे या बावधनमध्ये राहणाऱ्या धनश्री शिंदे यांच्याकडे घरकामाला येतात. काही दिवसांपूर्वी त्या चिंतेत होत्या. त्यांना काम मिळत नसल्याचे त्यांनी धनश्री शिंदेंना सांगितले. तेव्हा धनश्री शिंदेंनी त्यांना व्हिजिटिंग कार्ड काढण्याचा सल्ला दिला. आणि हे कार्ड त्यांनी प्रत्येक सोसायटीच्या चौकीदारा कडे देण्याचे ठरविले ज्यामुळे मावशीला काम मिळू शकेल.
हे करताना दोघीनाही कल्पना नव्हती कि हे कार्ड एवढे वायरल होणार परंतु असे झाले. या कार्डवर त्यांनी आधार नंबर लोकांना विश्वास देण्यासाठी टाकला आणि बाकी कामासाठी किती चार्ज घेण्यात येईल याचा रेटकार्ड देखील टाकण्यात आला आहे.
कार्ड आल्यानंतर धनश्रींनी चार पाच कार्ड स्वतः जवळ ठेवत बाकीचे मावशींकडे दिले. यानंतर धनश्रींनी एका मित्राला व्हॉट्सअॅपवर हे कार्ड पाठवले. यानंतर हे कार्ड प्रचंड व्हायरल झाले. गीता मावशींना प्रचंड फोन येत असल्यामुळे त्या वैतागल्या आहेत.
गीता काळे यांचा नवरा बिगारी काम करतो. तर त्यांनी तीन लेकरं आहेत. पण कार्डमुळं कटकट झाली आहे. मी मोबाइल क्रमांक टाकायला नको होता. मी त्यापेक्षा पत्ता टाकला असता तर शांतता राहीली असती. मला काही लिहिता वाचता येत नाही. म्हणून कार्ड छापून काम मिळेल ही आशा होती. असे गीता मावशी म्हणाल्या.
परंतु या गोष्टीमुळे आपणास हे नक्की माहिती झाली आहे कि whatsapp हे एक बिजनेस साठी प्रभावी माध्यम आहे. व्हॉट्स अॅप हे मॅजिकल मल्टीप्लायर आहे, हे मात्र नक्की. त्यामुळं फायदा होऊ शकतो. पण तोटाही ….
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.