विलास दगडोजीराव देशमुख जन्म २६ मे १९४५, राजकारणातील राजहंस असे लोक प्रेमाने त्यांना म्हणायचे चला बघूया काही विलासराव यांच्या बद्दल खासरे माहिती…
तीन विषयात पदवी असलेले विलासराव देशमुख हे वयाच्या २९ व्या वर्षी बाभळगावचे (लातूर) सरपंच झाले. राजकीय कारकीर्द सुरु झाली.
युवक काँग्रेसचे नेते, तेव्हाच्या एकत्रित उस्मानाबाद बँकेचे संचालक, पंचायत समितीचा उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य असे करीत करीत ते इ.स. १९८० मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले.
आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये अवघ्या दोन वर्षात मंत्रिपद मिळालेल्या विलासरावांनी नंतर मागे वळून पाहिले नाही.
दोन वेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि केंद्रात अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम खात्याचे केंद्रीय मंत्री होते.
इ.स. १९९५ साली शिवाजीराव कव्हेकर यांनी विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव केला. हा त्यांच्या कारकीर्दीतला सर्वात मोठा हादरा होता.
विशेष हे कितीही कामात विलासराव देशमुख हे त्यांना आलेले फोन स्वतः उचलायचे. परिवाराने अनेक वेळेस विलासरावांना विनंती केली कि आमच्या करिता खाजगी नंबर ठेवा परंतु त्यांनी साफ इन्कार दिला होता.
त्यांना कला,संगीत,नृत्य,नाटक आणि सिनेमा या विषयात खास रुची होती.
२००९ मध्ये सत्ता आल्यास आम्ही कर्जमाफी देऊ हा मुद्दा विलासरावांनीच सुचविला यावरून त्यांची चाणाक्ष बुद्धिमत्ता लक्षात येते.
Manjara Charitable Trust हे त्यांनी स्थापन केलेले आहे आज त्यांची मुंबई मध्ये अनेक महाविद्यालये आहे. मराठवाडा मित्र मंडळ सुध्दा त्यांनी स्थापन केलेले आहे. उस्मानाबाद युवक कॉंग्रेस असताना त्यांनी पाच सूत्री कार्यक्रम पक्षाला सुचविला.
त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा २६/११ च्या मुंबई हल्ल्या नंतर दिला.
चेन्नइला त्यांचे लिवर ट्रान्सप्लांट करण्याकरिता नेण्यात आले परंतु ज्याचे लिवर द्यायचे होते तो व्यक्ती १ दिवसा अगोदर वारला आणी विलासरावांची प्राणज्योत १४ ऑगस्ट २०१२ ला माळवली.
विलासराव देशमुखांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त पुण्यात शरद पवार यांच्या हस्ते ’आठवणीतील विलासराव’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले.
Contact Us
info@KhaasRe.Com
We are miss you saheb