बदलत्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावरही दिसतो. आज वेरीकोज व्हेंन्स गंभीर आजार म्हणून समोर येत आहे. या आजारापासून आराम मिळण्यासाठी इंजेक्शन थेरिपी उपलब्ध आहे. पण तुम्हाला माहित आहे का की, या आजाराला नैसर्गिक उपचार पद्धतीने बरे करता येऊ शकते. व्हेरिकोज व्हेन्सचं दुखणं फारच त्रासदायक असतं. म्हणूनच तुमच्या या नियमित सवयी नकळत व्हेरिकोज व्हेन्सचा धोका कसा वाढवतात. वेरीकोज व्हेंन्स या आजारामुळे मांसपेशिंमध्ये पायांमध्ये जडपणा आल्यासारखे वाटते यामुळे चालताना त्रास होतो. आज खासरे वर बघूया व्हेरिकोज व्हेन्स कशामुळे होतो व काही अश्या पद्धती सांगत आहोत ज्यामुळे तुम्हाला आराम मिळण्यास मदत होईल.
काय आहे वेरीकोज व्हेंन्स
या नसा लांब आणि सुजलेल्या असतात. या नसांचा रंग वांग्याप्रमाणे होत जातो. साधारण या व्हेन्स पाय आणि गुडघ्यादरम्यान असलेल्या आतील भागात असतात. या नसांची निर्मिती तेव्हा होते जेव्हा नसांमध्ये वॉल्व ( जे रक्त हृदयापर्यंत पोहोचवण्याचे काम करते) योग्य प्रकारे काम करणे बंद करते. यामुळे नसांमध्ये रक्त एका ठिक़ाणी जमा होते आणि यामुळे नसा फुगतात.
फार काळ उभं राहणं
काहींना नोकरीचा एक भाग म्हणून सतत उभं रहावं लागतं. एकाच जागेवर उभे राहिल्यामुळे व्हेरिकोस व्हेन्सचा त्रास वाढतो. एकाच जागी उभं राहण्यापेक्षा थोडं चाला, फिरा यामुळे हा आजार टाळता येऊ शकतो. अन्यथा पायांवर ताण येतो. रक्त साखळण्याचा धोका वाढतो. हळूहळू रक्तवाहिन्यांमधील व्हॉल्वचेही नुकसान होते.
फार काळ बसणं
जसं एकाच ठिकाणी उभं राहणं त्रासदायक आहे तसेच बसून राहणंदेखील आरोग्याला नुकसानकारकच ठरते. डेस्क जॉब असणार्यांना हा त्रास अधिक जाणवतो. फार काळ बसून राहिल्याने लठ्ठपणा वाढण्यासोबतच व्हेरिकोज व्हेन्सचा त्रासही वाढतो. त्यामुळे ठराविक वेळाने उठून इतरत्र काही वेळ फिरा.
हाय हिल्स
आज काल हाय हिल्सची फैशन आली आहे पण त्यामुळे आरोग्यावर नकळत काही परिणाम होऊ शकतो. हिल्स घालून चालल्याने रक्तवाहिन्यांच्या कार्यात अडथळा येतो. परिणामी व्हेरिकोस व्हेन्सचा त्रास बळावतो. त्यामुळे हाय हिल्स म्हणजेच उंच टाचेच्या सँडल वापरू टाळाव्या किंवा वापरूच नये.
पाय क्रॉस करून बसणं
पायांवर पाय ठेवून बसण्याच्या सवयीमुळे पायांवर आणि हिप्सवरही ताण येतो. यामुळे रक्तवाहिन्या फुगतात. हळूहळू जाळं वाढतं.
मीठ अति खाणं
अति मीठ सेवन शरीरास नेहमीच हानिकारक आहे. चीनमध्ये तर काही लोक मिठात योग्य प्रमाणात पाणी टाकून रोज पितात हे स्लो पॉयझनचे काम करत व आत्महत्या करतात. वेफर्स, लोणचं, पापड यामध्ये मीठ अधिक असते पण त्याचा आहारात अधिक प्रमाणात समावेश केल्यास व्हेरिकोस व्हेन्सचा त्रास वाढू शकतो. मीठामुळे शरीरात पाणी साचून राहते आणि त्याचा ताण रक्तवाहिन्यांवर येतो.
अजून काही कारणे
प्रेग्नेंसीच्या काळात होणारे हारमोनल बदल, बर्थ कंट्रोल पिल्सचे अतिसेवन , टाइट अंडरगारमेंट्स अथवा नसांना मार लागल्याने हा आजार होतो. हा आजार जेनेटिक सुध्दा आहे.
काही घरगुती उपाय ज्यामुळे आराम मिळेल.
रोज फिरायला जा, मॉर्निंग वॉक करा. यामुळे पायांच्या नसा मजबूत होतील. फाइबरयुक्त आहाराचा सामावेश करा. पण मैदा, पास्ता हे पदार्थ खाणे टाळा. झोपताना पाय उंचावर ठेवा. जर तुम्ही रोज योगा करत असाल तर यामध्ये सर्वागासन शामिल करा. यामुळे व्हेरीकोज व्हेंन्स विकसित होणार नाही द्राक्षाच्या बीपासून तयार करण्यात आलेल्या तेलाने मालिश करा. यामध्ये ऍन्टी इंफ्लेमेटरी तत्व असल्याने सूज कमी होण्यास मदत होते.
झेंडूच्या फुलचा रस नसांवर लावल्याने फायदा होईल. व्हेरीकोज व्हेंन्सचा त्रास कमी करणारे फ्लैवोनॉइड या फुलामध्ये असल्याने याचा फायदा होतो. या फुलाची पेस्टकरुन नसांवर लावल्याने आराम मिळतोद्राक्षाच्या बीपासून तयार करण्यात आलेल्या तेलाने मालिश करा. यामध्ये ऍन्टी इंफ्लेमेटरी तत्व असल्याने सूज कमी होण्यास मदत होते. स्मोकिंग करणे टाळा. कारण स्मोक केल्याने नसा फुगण्यास सुरुवात होते. व्हेरीकोज व्हेंन्सचा त्रास असणा-यांसाठी सिगरेट पिणे धोकादायक ठरू शकते.
जर तुम्हाला हि माहिती आवडल्यास नक्की शेअर करा म्हणजे इतरांच्याही कामी येईल व आमचे Khaasre.com पेज लाईक करण्यास विसरू नका