हि भाजी वर्षातून एकदाच म्हणजेच पावसाळ्याच्या दिवसात मिळते. करटोली या भाजीला ‘कारटोली’, ‘कंटोली’, ‘रानकारली’, ‘कर्कोटकी’, ‘करटुली़’ या नावानी देखील ओळखले जाते. तर इंग्रजीमध्ये या भाजीला ‘वाइल्ड करेला फ्रूट’ असे म्हंटले जाते.
करटोलीचे वेल कोकण, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम घाट व पश्चिम महाराष्ट्र परिसरात आढळतात. कोकण, दक्षिण महाराष्ट्र आणि गुजरात या ठिकाणी करटोलीची काही प्रमाणात शेतात लागवड करतात.
कारल्यासारख्या दिसणाऱ्या या भाजीच्या सेवनाने शरीर लोखंडासारखे मजबूत होते. करटोली हि जगातील सर्वाधिक औषधी गुणधर्म असणाऱ्या भाजींपैकी एक आहे. चवीला स्वादिष्ट असण्यासोबत या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते. यामध्ये फायटो केमिकल्स असतात जे आरोग्यवर्धक असतात.
अँटीऑक्सिडन्ट, तंतूंचे भरपूर प्रमाण यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवणे, वजन घटविणे, पोट साफ ठेवणे, पचनक्रिया सुधारणे यासाठी ती उपयुक्त आहेच पण त्यातील ल्युटेन सारखे कॅरोनाइड्स डोळ्याचे रोग, हृदय रोग तसेच कॅन्सरला प्रतिबंध करतात.
तसेच करटोली हे डोकेदुखीवरील उत्तम औषध आहे. डोकेदुखीत पानांचा अंगरस, मिरी, रक्तचंदन आणि नारळाचा रस एकत्र करून चोळतात. करटोलीचे भाजलेले कंद मूळव्याधीत रक्तस्राव थांबविण्यास आणि आतड्यांच्या तक्रारीत उपयोगी आहे. कंद कफोत्सर्जक आणि थंडी वाजून येणाऱ्या तापात उपयुक्त आहे.
अति लाळ सुटणे, मळमळ, हृदयाचे त्रास यातही करटोली गुणकारी आहे. करटोलीच्या फळांची भाजी कारल्यासारखीच असून, पावसाळ्याच्या अखेरीस ही भाजी बाजारात काही ठिकाणी येते. ही भाजी रुचकर असून, पोट साफ होण्यासाठी, यकृतातून पित्ताचा स्राव नीट होण्यासाठी उपयुक्त आहे.
मधुमेहाच्या रुग्णांनी या भाजीचे नियमित सेवन केल्यास रक्तातील साखर कमी होते, त्याचबरोबर लघवीतील शर्कराही नियंत्रित होते.
त्वचारोग होऊ नयेत म्हणून ही भाजी अवश्य खावी. सर्दी, खोकला, ताप या पावसाळ्यातील विकारांवर करटोलीची भाजी खूप फायद्याची आहे. १०० ग्राम भाजीत फक्त १७ कॅलरी असतात त्यामुळे तिचे सेवन वजन कमी करण्यासाठी उपयोगी आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.