लोकसभा निवडणुकीच्या वेळी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमुळे काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवारांना १५ ठिकाणी फटका बसला होता हे आपल्या सर्वांना माहित आहे. लोकसभा निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडीत फूट पडून एमआयएम पक्ष बाजूला झाला. काँग्रेससोबत आघाडीची बोलणी फिसकटल्यामुळे वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत वंचित फॅक्टर किती प्रभाव पाडणार याची अनेकांना धाकधूक होती.
विधानसभेचे निकाल हाती आल्यानंतर आपण बघू शकतो की वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी निर्णायक मते घेतल्याने जवळपास २५ ठिकाणचे उमेदवार पराभूत झाले आहेत. चला तर पाहूया कोण कोण आहेत ते उमेदवार…
१) पुणे कॅन्टोन्मेंट : भाजपच्या सुनील कांबळे यांनी काँग्रेसच्या रमेश बागवे यांचा ५०१२ मतांनी पराभव केला. वंचितच्या लक्ष्मण आरडे यांना १००२६ मते मिळाली. २) जिंतूर : भाजपच्या मेघना बोर्डीकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजय भांबळे यांचा ३७१७ मतांनी पराभव केला. वंचितच्या मनोहर वाकळे यांना १३१७२ मते मिळाली.
३) खडकवासला : भाजपच्या भीमराव तापकीर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सचिन दोडके यांचा २५९५ मतांनी पराभव केला. वंचितच्या आप्पा आखाडे यांना ५९३१ मते मिळाली. ४) दौंड : भाजपच्या राहुल कुल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रमेश थोरात यांचा ७४६ मतांनी पराभव केला. वंचितच्या तात्यासाहेब ताम्हाणे यांना २६३३ मते मिळाली.
५) शिवाजीनगर : भाजपच्या सिद्धार्थ शिरोळे यांनी काँग्रेसच्या दत्त बहिरट यांचा ५१२४ मतांनी पराभव केला. वंचितच्या अनिल कुऱ्हाडे यांना १०४४२ मते मिळाली. ६) गेवराई : भाजपच्या लक्ष्मण पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयसिंह पंडित यांचा ६७९२ मतांनी पराभव केला. वंचितच्या विष्णू देवकाते यांना ८३०६ मते मिळाली.
७) तुळजापूर : भाजपच्या राणाजगजितसिंह पाटील यांनी काँग्रेसच्या मधुकरराव चव्हाण यांचा २३१६९ मतांनी पराभव केला. वंचितच्या अशोक जगदाळे यांना ३५३८३ मते मिळाली. ८) उस्मानाबाद : शिवसेनेच्या कैलास घाडगे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजय निंबाळकर यांचा १३४६७ मतांनी पराभव केला. वंचितच्या धनंजय शिंगाडे यांना १५७५५ मते मिळाली.
९) सांगोला : भाजपच्या शाहजीबापू पाटील यांनी शेकापच्या डॉ.अनिकेत देशमुख यांचा ७६८ मतांनी पराभव केला. वंचितच्या विष्णू यलमार यांना १०४१ मते मिळाली. १०) माळशिरस : भाजपच्या राम सातपुते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उत्तमराव जानकर यांचा २५९० मतांनी पराभव केला. वंचितच्या राज कुमार यांना ५५३८ मते मिळाली.
११) चेंबूर : शिवसेनेच्या प्रकाश फातर्पेकर यांनी काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरे यांचा १९०१८ मतांनी पराभव केला. वंचितच्या राजेंद्र माहुलकर यांना २३१७८ मते मिळाली. १२) चांदिवली : शिवसेनेच्या दिलीप लांडे यांनी काँग्रेसच्या मोहमद अरिफ खान यांचा ४०९ मतांनी पराभव केला. वंचितच्या अबुल खान यांना ८८७६ मते मिळाली.
१३) चिखली : भाजपच्या श्वेता महाले यांनी काँग्रेसच्या राहुल बोन्द्रे यांचा ६८१० मतांनी पराभव केला. वंचितच्या अशोक सुराडकर यांना ९६६१ मते मिळाली. १४) खामगाव : भाजपच्या आकाश फुंडकर यांनी काँग्रेसच्या ज्ञानेश्वर पाटील यांचा १६९६८ मतांनी पराभव केला. वंचितच्या शरद वसातकर यांना २५९५७ मते मिळाली.
१५) आर्णी : भाजपच्या प्रभाकर धुर्वे यांनी काँग्रेसच्या शिवाजीराव मोघे यांचा ३१५३ मतांनी पराभव केला. वंचितच्या निरंजन मसराम यांना १२३०७ मते मिळाली. १६) अकोला पश्चिम : भाजपच्या गोवर्धन शर्मा यांनी काँग्रेसच्या साजिद खान यांचा २५९३ मतांनी पराभव केला. वंचितच्या मदन भरगड यांना २०६८७ मते मिळाली.
१७) धामणगाव रेल्वे : भाजपच्या अरुणभाऊ अडसाड यांनी काँग्रेसच्या वाल्मिकीराव जगताप यांचा ९५१९ मतांनी पराभव केला. वंचितच्या ताराचंद विश्वकर्मा यांना २३७७९ मते मिळाली. १८) चिमूर : भाजपच्या बंटी भांगडिया यांनी काँग्रेसच्या सतीश वारजूकर यांचा ९७५२ मतांनी पराभव केला. वंचितच्या अरविंद सांडेकर यांना २४४७४ मते मिळाली.
१९) राळेगाव : भाजपच्या अशोक उईके यांनी काँग्रेसच्या वसंत पुरके यांचा ९८७५ मतांनी पराभव केला. वंचितच्या झिंगराजी कोहळे यांना १०७०५ मते मिळाली. २०) चाळीसगाव : भाजपच्या मंगेश चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजीव देशमुख यांचा ४२८७ मतांनी पराभव केला. वंचितच्या मोरसिंग राठोड यांना ३८४२९ मते मिळाली.
२१) पैठण : शिवसेनेच्या आसाराम भुमरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दत्तात्रय गोर्डे यांचा १४१३९ मतांनी पराभव केला. वंचितच्या अंबादास चव्हाण यांना २०६५४ मते मिळाली. २२) उल्हासनगर : भाजपच्या कुमार ऐलानी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्योती कलानी यांचा २००४ मतांनी पराभव केला. वंचितच्या साजन लबाना यांना ५६८९ मते मिळाली.
२३)फुलंब्री : भाजपच्या हरिभाऊ बागडे यांनी काँग्रेसच्या कल्याण काळे यांचा जवळपास १५ हजार मतांच्या फरकाने पराभव केला. वंचितच्या जगन्नाथ रिठे यांनी येथे १५ हजार मते घेतली.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.