एक स्त्री जी गुरूग्राम मध्ये 3 कोटींच्या घरात राहते आणि एका एसयूवी ची मालकीण आहे, तिला आपण रस्त्याच्या कडेला हाथगाड्यावर छोले कुलचे विकताना बघितले तर नवल वाटू देऊ नका. तळपत्या उन्हात आणि खूप घामात त्यांचा नेहमी प्रयत्न असतो की त्यांच्या व्यवसायात कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये. आज त्यांच्याकडे फक्त खाण्याची गाडीच नाही तर गुडगाव मध्ये त्या हॉटेल पण चालवत आहेत.
या महिला आहेत उर्वशी यादव. उर्वशी बोलतात की त्यांच्या परिवाराला सुरक्षित भविष्याची गरज आहे. खरं तर त्यांच्या पतीसोबत झालेल्या एका दुर्घटनेनंतर अचानक त्यांच्या परिवारामध्ये अनेक बदल झाले आहेत.
सहा वर्षात त्यांच्या पतीला डॉक्टरांनी दुसऱ्या वेळेस हिप रिप्लेसमेंट करण्यास सांगितले. अपघातानंतर उर्वशी आपल्या परिवाराच्या भविष्याविषयी खूप चिंताग्रस्त होती. कुटुंबाला आर्थिक सहाय्य व्हावे म्हणून त्यांनी संपूर्ण जबाबदारी स्वतःवर घेतली.
कसा सुरु झाला हा व्यवसाय-
काही काळ उर्वशी या एका नर्सरी स्कुल मध्ये शिक्षक म्हणून काम करून आपलं कुटुंब चालवले. पण त्या यामध्ये समाधानी नव्हत्या. त्यांना वाटले की त्या या एवढ्या कमी पगारात काही बचत नाही करू शकणार. मग त्यांनी आपला छोले कुलचे चा हाथगाडा लावण्याचा निर्णय घेतला. उर्वशीच्या मते, आज आपण आर्थिकदृष्ट्या कमकुवत नाहीयेत पण भविष्यासाठी जोखीम नाही घेऊ शकत. स्थिती खराब होण्याअगोदरच मी ती सावरणे चालू केले. मला स्वयंपाक करायला आवडते तर का मी यांच्यातच गुंतवणूक करावी.
उर्वशीचे पती अमित यादव हे एका अग्रगण्य उत्पादन कंपनीमध्ये कार्यकारी अधिकारी म्हणून काम करतात तर त्यांचे सासरे हे वायुसेनेचे निवृत्त विंग कमांडर आहेत. 31 मे 2016 रोजी अमित सेक्टर 17 ए मध्ये पडले. डिसेंबर मध्ये डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रिया करण्यास सांगितले. अपघातानंतर दुसऱ्याच दिवशी उर्वशी यांनी सेक्टर 14 मध्ये एका झाडाखाली आपला एक गाडा लावून व्यवसाय सुरू केला. 300 sq ft च्या जागेत राहणाऱ्या उर्वशी यांनी सांगितले की, आर्थिक अडचणीमुळे माझ्या मुलाना त्यांची शाळा बदलावी लागू नये असे मला वाटायचं. मी दररोज 2500 ते 3000 रुपये कमावते व मी माझ्या माझ्या या कमाईवर खुश आहे.
कठीण मार्ग आणि प्रचंड मेहनत-
त्यांना मिळालेलं यश हे बिना संघर्षाचे नाही आहे. उर्वशी या एक सनातक आहेत व त्या शुद्ध इंग्लिश भाषेत बोलतात. आपला गाडा लावण्याचा निर्णयामुळे त्यांना कुटुंबाच्या विरोधाचा ही मुकाबला करावा लागला होता. ते म्हणायचे की आपलं स्टेटस तर बघ, तू एवढी शिकलेली, उच्च राहणीमान असणारी आणि तू रोडवर छोले कुलचे विकणार. तू जो हा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहे तो तुझ्या परिस्थितीला जुळत नाही.
उर्वशीच्या मते, हा त्यांच्या सारख्या स्त्रीसाठी हा खूप मोठा बदल होता. एक स्त्री जी नेहमी एसी मध्ये राहते, ती रोडवर जेवण विकण्यासाठी निघाली आहे. आणि माझ्या परिवारासाठी सोपं ही नव्हतं की महिंद्रा स्कॉर्पिओ आणि ह्युंडई क्रेटा ची मालकीण रस्त्याला हाथगाडा लावतेय. माझ्या सासऱ्यानी दुकान उघडण्यासाठी आर्थिक मदत देऊ केली होती पण मी ती स्वीकारण्यास नकार दिला. मी जेव्हा हा स्टॉल सुरू केला होता तेव्हा कुटुंबातील व्यक्तींना वाटले होते की तो 3 दिवसाच्या पुढे चालणार नाही. पण दीड महिन्यातच माझा स्टॉल त्या परिसरात हिट झाला.
उर्वशीच्या स्वप्नांनी उभारी घेतली असून आता त्यांच्या स्टॉल एक हॉटेल बनला आहे. त्यांनी याच स्टॉलमधून आलेल्या कमाईने एक फूड ट्रक पण खरेदी केला आहे. गुडगाव मध्ये त्यांचे हॉटेलही सुरू आहे. त्यांनी आपल्या मेनुमध्ये अनेक वेगवेगळे पदार्थ ही जोडले आहेत. त्यांच्याकडे हॉटेल चालवण्याचे लायसन्स सुद्धा आहे. हे त्यांना एखाद्या विजयापेक्षा कमी नाहीये. उर्वशी यांनी स्वतःला सिद्ध करण्यासोबत इतर लोकांनाही कोणतेच काम छोटे किंवा मोठे नसते हे शिकवले आहे.
लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
लिज्जत पापड: फक्त ८० रुपये उधार घेऊन ७ महिलांनी सुरु केलेला उद्योग आज उलाढाल ३०० करोडची