पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महात्मा गांधीजींच्या सोबत ते एक सर्वोच्च नेते म्हणून पुढे आले होते.
पंडित जवाहरलाल नेहरूंना भारतीय बच्चे कंपनी ‘चाचा नेहरू’ या नावाने ओळखत असे.
पंडित जवाहरलाल नेहरुजींचा जन्म उत्तर प्रदेशातील इलाहाबाद या शहरात झाला होता.
जवाहरलाल नेहरू हे मूळचे काश्मीर पंडित होते.त्यामुळे त्यांना ‘पंडित नेहरू’ या नावानेही ओळखले जात असे.
पंडित नेहरुंना आधुनिक भारताचे एक समाजवादी, धर्मनिरपेक्ष शिल्पकार मानले जाते.
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणुन काँग्रेस पक्ष्याकडून निवड झाली होती.
1950 साली भारताचे संविधान लागू झाल्यानंतर त्यांनी आर्थिक, सामाजिक आणि राजकिय सुधारणांना वाव देण्यासाठी अनेक महत्वकांक्षी योजना सुरू केल्या.
नेहरुजींच्या नेतृत्वाखाली काँगेसने राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर झालेल्या निवडणूकींमध्ये विजयी रथ चालू ठेवत 1951, 1957 आणि 1962 मध्ये सलग विजय मिळवला.
त्यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये राजकिय संघर्ष आणि 1962 मध्ये झालेल्या भारत-चीन च्या युद्धात अयशस्वी होऊनही ते भारतीयांमध्ये कायम लोकप्रिय राहिले.
भारतामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंचा जन्मदिवस बाल दिन म्हणून साजरा केला जातो.
पंडीत जवाहरलाल नेहरूंचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 ला ब्रिटिश भारतातील इलाहाबाद मध्ये झाला होता.
पंडितजींचे वडील मोतीलाल नेहरू, एक धनी बॅरिस्टर होते, जे काश्मीर पंडित समुदायातील होते.
स्वातंत्र्य लढ्याच्या वेळेस पंडीत नेहरू दोन वेळा राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष बनले होते.
पंडित नेहरूंची आई स्वरूपरानी धुस्सु या लाहोरच्या एका प्रसिद्ध काश्मिरी ब्राह्मण परिवारातून होत्या. त्या मोतीलाल यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या.पहिली पत्नी बाळंतपणात मरण पावली होती.
जवाहरलाल नेहरू तीन भावंडामध्ये सर्वात मोठे होते. त्यांना 2 छोट्या बहिणी होत्या. एक बहीण विजयालक्ष्मी या पुढें संयुक्त राष्ट्र महासभा च्या पहिल्या महिला अध्यक्ष बनल्या. तर सर्वात छोटी बहीण कृष्णा हटिसिंग एक सुप्रसिद्ध लेखिका बनल्या.
जवाहरलाल नेहरू यांनी जगभरातील अनेक सुप्रसिद्ध विश्वविद्यालय मध्ये शिक्षण घेतले होते. त्यांनी आले शालेय शिक्षण हैरो मध्ये तर कॉलेजचे शिक्षण ट्रिनिटी कॉलेज लंडन येथे पूर्ण केले होते. नंतर लॉ डिग्री त्यांनी केम्ब्रिज विश्वविद्यालयातून पूर्ण केली.
पंडित नेहरूंनी गांधीजींच्या उपदेशाने आपल्या परिवारात पण अनेक बदल स्वीकारले होते. जवाहरलाल आणि मोतीलाल यांनी पाश्चिमात्य कपडे आणि संपत्तीचा त्याग केला होता. ते एक खादी कुर्ता आणि गांधी टोपी घालत असत.
पंडित नेहरू लहानपणीपासून इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकले होते. त्यांनी गावा-गावामध्ये फिरल्याने हिंदी भाषा बोलण्यास जमायची.
सन 1947 साली भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर भावी पंतप्रधान निवडण्यासाठी कॉंग्रेस मध्ये मतदान झाले होते. त्यामध्ये सरदार पटेल यांना सर्वाधिक मते मिळाली होती. त्यानंतर आचार्य कृपलानी यांना मते मिळाली होती. परंतू गांधीजींच्या म्हणण्यानुसार या दोघांनी आपले नाव वापस घेतले व जवाहरलाल नेहरू यांना पंतप्रधान बनवण्यात आले.
पंडित जवाहरलाल नेहरूनी जोसीप बरोज पिंटो आणि अब्दुल गमाल नासिर यांच्या सोबत मिळून आशिया आणि आफ्रिकेतील उपनिवेशिकता संपवण्यासाठी एक चळवळ सुरू केली.
पंडितजींना पाकिस्तान आणि चीन सोबत मात्र संबध सुधारण्यात यश आले नाही. पाकिस्तान सोबत समझोता करण्यात काश्मीर चा प्रश्न आणि चीन सोबत मित्रता करण्यासाठी सीमावाद आडवा आला. नेहरूंनी चीन कडे मित्रतेचा हाथ पण दिला पण त्यांनी 1962 मध्ये धोका देऊन आक्रमण केले.
चीन सोबत हार जवाहरलाल नेहरूंसाठी एक मोठा झटका होता. कदाचित हेच त्यांच्या मृत्यूचे कारणही बनले. 27 मे 1964 ला त्यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यु झाला.
जवाहरलाल नेहरूंच्या नावाने एक युनिव्हर्सिटी सुद्धा आहे, जी आपण JNU या नावाने ओळखतो.
जवाहरलाल नेहरू लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवणारे पहिले व्यक्ती होते.
बोलले जाते की चंद्रशेखर आझाद यांनी रुस ला जाण्यासाठी पंडित नेहरूंकडून 1200 रुपये उधार मागितले होते.
जवाहरलाल नेहरू यांनी 20 वर्षे सुभाषचंद्र बोस यांची जासुसी करायला लावली होती.
जवाहरलाल नेहरू यांनी सरदार पटेल यांना अंधारात ठेवून काश्मिरसाठी कलम 370 बनवले होते.
फेब्रुवारी 1950 रोजी पिलानी(राजस्थान) मध्ये पंडितजींच्या स्वागतासाठी भाज्या आणि गाजर-मुळ्यांच प्रवेशद्वार बनवण्याते आले होते.ज्यावर नाराज होत पंडितजींनी तो सर्व भाजीपाला गरिबांना वाटला.
पंडितजींच्या अंतिम संस्काराला 15 लाख लोक सामील झाले होते.
नेहरूंना गांधीजींचे राजकिय उत्तराधिकारी मानले जायचे.
नेहरुंनी 1959 साली तिबेट मधून पळालेल्या दलाई लामा यांना भारतात शरण दिली.
नेहरूंनी अमेरिका आणि रशिया पासून वेगळा रस्ता बनवण्यासाठी प्रयत्न केले व गट निरपेक्ष देशांचे संघटन निर्माण केले.
पंडित नेहरूंनी 1920 मध्ये उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यात पहिल्या शेतकरी मोर्चाचे आयोजन केले होते.
1920-22 मध्ये असहयोग आंदोलनात त्यांना 2 वेळा जेलमध्ये सुद्धा जावे लागले.
1929 मध्ये नेहरूंना भारतीय राष्ट्रीय संमेलन लाहोर सत्राचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले होते.
नेहरुजींना 1930-35 च्या दरम्यान सत्याग्रह आंदोलन व काँग्रेसच्या अन्य आंदोलनामुळे जेलमध्ये जावे लागले.
1935 मध्ये जेलमधून सुटल्यानंतर नेहरुजी आपल्या आजारी पत्नीला भेटण्यासाठी स्वित्झर्लंड ला गेले. नंतर 1936 मध्ये त्यांनी लंडन चा दौरा केला.
सेवादलाच्या सदस्यांच्या रूपात खाकी पोशाखात पंडित नेहरू.
1890 च्या दशकामधील नेहरूंच्यापरिवाराचा फोटो.
जनतेला संबोधित करताना पंडित जवाहरलाल नेहरू.
सैनिकांसोबत हस्तांदोलन करताना पंडित जवाहरलाल नेहरू.
एकदा कार्यक्रमात सत्कार स्वीकारल्यानंतर नेहरूजी आणि त्यांची मुलगी इंदिरा गांधी.
सरदार पटेल व पंडित जवाहरलाल नेहरू..
हैदराबाद येथील एका मंदिरास भेट दिल्यानंतर पंडित नेहरू आणि त्यांची बहिण.
निजोजन आयोगाच्या मिटिंग दरम्यान नेहरूजी
प्रचंड जन्सामुदायला संबोधित करताना पंडित नेहरू.
पंडित नेहरू आपल्या पत्नीसोबत
महात्मा गांधीजीसोबत एका आंदोलनादरम्यान पंडित नेहरू.
महात्मा गांधीजी आणि पंडित नेहरू.
फोटो आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
जाणून घ्या गांधीजींबद्दल आपणास माहिती नसलेल्या काही अज्ञात गोष्टी
वाचा: भारतीय पहिल्या स्वातंत्र दिनाचे व लढ्यातील काही घडामोडीचे दुर्मिळ फोटो..
Comments 1