महान गायिका लता मंगेशकर ह्या आज ८८ वर्षाच्या झाल्या. भारताची गाणं कोकिळा म्हणून ओळखल्या जाणा-या या गायिकेने १९४२ साली आपल्या कारकीर्दीची सुरूवात केली.
लतादीदींनी हिंदी,मराठी भाषेत तर गाणी गायलीच आहेत पण ३६ हुन अधिक प्रादेशिक व विदेशी भाषेत सुद्दा गाण्याचे रेकॉर्डिंग केले.
१९८६ साली त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा हिंदी सिनेमातील सर्वोच्च सन्मान होता.
दिदीच्या आयुष्यातील एक महत्वाचा प्रसंग २७ जानेवारी १९६३ रोजी त्यांनी ‘ये मेरे वतन के लोगो’ हे गीत गाऊन भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित-जवाहरलाल नेहरू यांच्या डोळ्यात अश्रू आणले.
एम.एस. सुब्बलकक्ष्मी यांच्या नंतर लतादीदी दुसऱ्या गायिका आहेत की ज्यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
लता दिदीना आशा भोसले, हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर आणि मीना मंगेशकर हे भाऊ बहिण..
आज दिदींचा वाढदिवस, त्यानिमित्त खासरेवर आपल्या समोर लता “दिदी” बद्दच्या काही रंजक व माहिती नसलेल्या गोष्टी देत आहोत..
वयाच्या १३ व्या वर्षी लता मंगेशकर यांचे वडील दीनानाथ मंगेशकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आणि या किशोरवयीन मुलीच्या खांद्यावर कुटूंबाचा उदरनिर्वाह करण्याचा मोठा भार आला. परंतु कलेनी त्यांना या प्रसंगातुन तारले..
१९४२ ते ९८ च्या दरम्यान सुमारे ८ चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. वसंत जोगळेकर यांनी १९४२ साली त्यांना “किती हसाल” या चित्रपटात पहिल्यांदा गायन करायची संधी दिली. मात्र, “नाचू या गडे, खेलु सारी मणी हौस भारी” हे गाणे नंतर चित्रपटातून वगळण्यात आले होते.
आणि शेवटी नवयुग चित्रपट निर्मित “पहिली मंगळागौर” या चित्रपटात त्यांना छोटासा रोल मिळाला, त्यांनी “नटली चैत्राची नवलाई” हे गाणे या चित्रपटात गायले.
पटियाला घराण्याचे उस्ताद अमानत अली खान यांनी भारतीय शास्त्रीय गायानाचे त्यांना प्रशिक्षण दिले. पण ते फाळणी नंतर पाकिस्तानात गेले आणि लताजींनी अमानत खान देवसवळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे प्रशिक्षण चालू ठेवले.
याव्यतिरिक्त त्यांचे शिक्षक उस्ताद बडे गुलाम अली खानचे शिष्य पंडित तुलसीदास शर्मा हे सुद्दा होते.
त्यांचे खरे नाव हेमा हार्डीकर होते. त्यांच्या वडिलांनी आडनाव बदलून मंगेशकरला केले,तर हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश करताना लताचे नाव बदलण्यात आले.
“लतीका” हे त्यांच्या वडिलांचे नाटक ‘भाऊ बंधन’ मधील एक लोकप्रिय चरित्र आहे.यावरूनच त्यांचं नाव “लता” ठेवण्यात आलं.
बॉलिवूडच्या संगीतकारांनी लताजींच्या आवाज खूप बारीक आहे या कारणावरून सुरुवातीला त्यांना नाकारण्यात आले होते.
लताजींनी लहानपणीच शाळा सोडली कारण काय तर वर्गशिक्षिकेने त्यांना त्यांच्यासोबत १० महिन्याची बहीण आशा (भोसले) यांना सोबत आणण्यास नकार दिला होता.
बॉलिवूडमध्ये त्यांनी “दिल मेरा तोडा” या गाण्याने “१९४८” मजबूर या चित्रपटातून पदार्पण केले. त्यांना प्रसिध्दी मिळाली ती १९४९ मध्ये महल या चित्रपटात “आयेगा आणेवाला” या गाण्याने, हे गाणे त्यांनी प्रसिध्द अभिनेत्री मधुबालासाठी गायले होते.
परंतु ग्रामफोन कंपनी ऑफ इंडियाने तिला त्या गाण्याचे श्रेय दिले नाही कारण त्या त्यावेळी लोकप्रिय नव्हत्या.
पण, मधुबाला त्यांच्या आवाजाने प्रभावित झाल्या होत्या त्यांनी त्यांच्या सर्व चित्रपटात गाणे गायनाकरीता करार करून घेतला.
अनुभवी अभिनेता दिलीप कुमार यांनी त्यांना स्थानिक भाषेतील उच्चार जमत नसल्या कारणाने सहमती दिली नाही पण लतादीदी नी बरीच मेहनत घेऊन शफी या शिक्षकाकडून उर्दू अवगत केली.
बालपणापासून त्या गायक-अभिनेते के. एल. सैगल यांच्या प्रशंसक आहेत. त्या १८ वर्षांच्या असताना रेडिओ खरेदी केली. परंतु त्यांनी यावर पहिली बातमी ऐकली ती सैगलच्या मृत्यूची.
लंडनमधील रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये गायणाऱ्या त्या पहिल्या भारतीय आहेत.
त्यांना अज्ञात व्यक्तीकडून विष(Slow Poison) दिल गेल, ज्यासाठी त्या जवळजवळ ३ महिन्यांपर्यंत आजारी होत्या परंतु ह्या प्रसंगातुन त्या सुखरूप बचाविल्या.
एका मुलाखतीत त्यांनी आपल्या दोन अपूर्ण इच्छा प्रकट केल्या, त्या म्हणजे दिलीप कुमार आणि के. एल. सैगल यांच्यासाठी गायन करण्याच्या इच्छा अपूर्णच आहे.
त्यांनी जवळपास ५०,००० गाणी गायली आहेत आणि ते सुद्धा १४ पेक्षा अधिक भाषांमध्ये आहेत.
भारतरत्न लतादिदींना खासरे तर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा !