जाणून घ्या ATM बद्दल माहिती नसलेल्या काही रंजक गोष्टी…

आपल्या नियमित आयुष्यात ATM एक महत्वाची गोष्ट बनलं आहे. बऱ्याच व्यक्तींच्या ATM रोज वापरात येणारी गोष्ट आहे. तुम्ही कदाचित ATM वापरले जरी नसेल तर पाहिले तर नक्की असणार. खूप कमी व्यक्तींना ATM विषयी संपुर्ण माहिती असते. आज आपण खासरेवर तुमच्या माहिती साठी जाणून घेऊया ATM बद्दलच्या काही रंजक गोष्टी-

1. ATM चा फुलफॉर्म Automated Teller Machine आहे.

2. विशेष म्हणजे ATM चा शोध लावणाऱ्या व्यक्तीचा जन्म भारतातच झाला होता. ATM बनवणारे जॉन शेफर्ड बैरन यांचा जन्म 23 जून 1925 रोजी मेघालयातील शिलॉंग मध्ये झाला होता. त्यावेळी त्यांचे स्कॉटिश असणारे वडील विलफ्रिड बैरन हे चितगाव पोर्ट कमिशनर्स चे मुख्य अभियंता होते.

3. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जॉन यांना ATM बनवण्याची आयडिया अंघोळ करताना सुचली होती. त्यांनी विचार केला की जर चॉकलेट आपोआप देणारे मशीन असू शकते तर मग पैशाचे का नसावे. ज्यामुळे आपण कधीही पैसे काढू शकू. यानंतर त्यांनी ATM मशीन तयार केली.

4. जगातील पहिले ATM मशीन 27 जून 1967 ला लंडनच्या बारक्लेज बँकेत लावण्यात आले.

5. पुर्ण जगभरात जवळपास 30 लाख ATM आहेत ज्यामधील 2.5 लाख ATM भारतात आहेत.

6. भारतात पहिले ATM सन 1987 मध्ये लावण्यात आले होते. भारतातील पहिले ATM हॉंगकॉंग अँड शांघाय बँकिंग कॉर्पोरेशन(एचएसबीसी) ने मुंबई मध्ये लावले होते.

7. ATM बनवणारे बैरन यांनी कधीच आपल्या शोधाचे पेटंट नाही बनवले. ते आपल्या या शोधाला सिक्रेट ठेवू इच्छित होते. त्यांनी जर पेटंट केले असते तर त्यांना त्यांची कोड सिस्टीम पेटंट करणाऱ्या कंपन्यांना सुपूर्द करावी लागली असती. त्यामुळे त्यांनी ATM चे पेटंट ना करण्याचा निर्णय घेतला.

Bairan

8. विशेष म्हणजे बैरन हे ATM चा पिन 6 अंकाचा असावा या मताचे होते. परंतु त्यांच्या पत्नीने त्यांना सांगितले मी 6 अंक खूप जास्त होतात, त्यामुळे लोकांना ते ध्यानात ठेवायला अडचणी येतील. यामुळे त्यांनी मग 4 अंकाचा ATM पिन बनवला. आजही सर्वत्र चार अंकाचा पिन वापरात आहे.

9. तुमचे बँकेत खाते नसेल तरीही तुम्ही ATM चा वापर करू शकता, पण ही सुविधा अजून भारतात उपलब्ध नाहीये. युरोपमधील रोमानिया या देशात 84% लोकांकडे बँकेत खाते नाहीये तरी सुद्धा तर ATM वापरतात.

10. पहिले तरंगणारे ATM केरळच्या कोचिमध्ये लावण्यात आले होते. हे मशीन स्टेट बँक ऑफ इंडिया ने लावले होते. या ATM ची मालकी Kerala Shipping and Inland Navigation Corporation (KSINC) ही कंपनीची होती.

11. ATM मधून फक्त पैसेच निघतात असे नाही. ATM मधून सोने सुद्धा निघते. जगातील पहिली गोल्ड प्लेट काढायची मशीन अबू धाबीच्या अमिरात हॉटेलच्या लॉबी मध्ये लावण्यात आली. यामधून 320 प्रकारचे वेगवेगळे आयटम काढू शकतो.

12. जगातील सर्वात उंच ATM नाथू-ला मध्ये आहे. हे ATM समुद्र सपाटीपासून 14300 फूट उंचीवर आहे. हे ATM भारत आणि चीनच्या बॉर्डरवर आर्मी साठी लावण्यात आले आहे.

13. जगात एक असेही ठिकाण आहे जिथे फक्त एकच ATM आहे. अंटार्क्टिका मध्ये फक्त एकच ATM मशीन बसवलेले आहे.

14. ब्राझीलमध्ये बँकेचे व्यवहार आणि पासवर्ड जास्त सुरक्षित करण्यासाठी बायोमेट्रिक ATM चा उपयोग केला जातो. या ATM मध्ये पैसे काढण्यासाठी पिन ऐवजी फिंगरप्रिंट चा उपयोग केला जातो.

15. बरेच वेळा चोर पैसे निघत नाहीत म्हणून पूर्ण ATM मशीनच उचलून घेऊन जातात. अशावेळी ते जास्त दूर जाऊ शकत कारण ATM मध्ये GPS ला जोडलेली एक छोटी चिप बसवलेली असते. यामुळे ATM चा शोध घेणे खूप सोपे होते.

16. भारतात सर्वात जास्त पैसे शुक्रवारी काढले जातात.

17. ATM वापरणाऱ्या 11% लोकांचा पिन हा 1234 आहे. म्हणजे प्रत्येक दहाव्या व्यक्तीचा पिन हा 1234 आहे. आणि सर्वात कमी वापरला जाणारा पिन हा 8068 आहे.

18. बरेच लोकं म्हणतात की काही धोकादायक परिस्थिती ओढवली तर ATM चा पिन उलटा टाकायचा, यामुळे जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये माहिती कळते. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो ही गोष्ट पुर्णपणे खोटी आहे.

माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
वाचा: गाव नमुना सात बारा (7/12) म्हणजे काय ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.