बाळासाहेबांनी आपले खाजगी आयुष्य कोणासमोर लपवून ठेवले नाही. संपूर्ण आयुष्य ते बिनधास्त जगले आणि वागले सुध्दा त्यामुळेच बाळासाहेबांचा संपूर्ण महाराष्ट्रात चाहता वर्ग आहे. अनेक खाजगी गोष्टी ते बिनधास्त बोलत असे अनेक मुलाखतीत त्यांनी त्यांच्या आवडीचा खुलासा देखील केला आहे.
बाळासाहेबांना घरचे बनविलेले पदार्थ आवडत असे. तसेच चर्चगेट येथील गॉर्डन रेस्टोरेंट येथील पास्ता हा त्यांचा आवडीचा पदार्थ होता. येथून त्यांच्या साठी नेहमी पास्ता बोलवल्या जात होता. त्या सोबत बाळासाहेब सिगारचे देखील शौकीन होते. मार्को पोलो, थ्री नन्स आणि हेनरी ब्रैंड या त्यांच्या आवडत्या सिगार ब्रैंड आहे.
आणि बाळासाहेबांची आवडती बियर Heineken या कंपनीची आहे परंतु हि बियर थंड न पता ते गरम पीत होते. म्हणजे बियर ते फ्रीज मध्ये ठेवत नसे. बियर मध्ये जास्त कैलरी असल्यामुळे त्यांनी उतारवयात वाईन घेणे पसंद केले. Sham Chougule’s Chantili वाईन हि वाईन ते रोज घेत असे.
परंतु सार्वजनिक ठिकाणी बाळसाहेब कधीही बियर किंवा सिगार घेत नसे. महाग पाईप आणि सिगार त्यांचे मित्र त्यांना विदेशात अनेकदा गिफ्ट आणत असे. परंतु उद्धव ठाकरे यांचे शौक बाळासाहेबांच्या विरुद्ध आहे. असाच एक किस्सा आहे.
‘द कझिन्स ठाकरे’ या पुस्तकाचे लेखक धवल कुलकर्णी सांगतात, “१९९० च्या दशकातली गोष्ट असेल, सामनाच्या वर्धापन दिनाची पार्टी होती. अनेक मान्यवर जमले होते. लोकांनी आग्रह केला म्हणून उद्धव ठाकरेंनी शॅम्पेनचा एक घोट घेतला. तिथे उपस्थित असणारे लोक सांगतात की त्यानंतर त्यांना प्रचंड ठसका लागला. त्यांना दारूची चव अजिबात सहन झाली नाही.”
उद्धव ठाकरे आजही निर्व्यसनी आहेत. त्यांना दारूची चव देखील सहन होत नाही. उद्धव ठाकरे आपल्या तब्बेती कडे कडेकोट लक्ष देतात. व्यायाम करणे हि त्यांची रोजची दिनचर्या आहे. राज ठाकरे यांचे वडील श्रीकांत ठाकरे यांचा जीव उद्धव ठाकरे वर खूप होता.
उद्धव यांना राजकारणात येण्याची प्रेरणा देणारी त्यांची पत्नी रश्मी ठाकरे आहे असे या पुस्तकात सांगण्यात येते. उद्धव ठाकरे यांच्या बागेत अनेक प्रकारचे प्राणी पक्षी आहे आणि याचा सांभाळ त्यांचा मुलगा तेजस करत असतो.
आपल्याला हि माहिती आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@Khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकतो.