सातारा हा पूर्वी काँग्रेसचा आणि नंतर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला आहे. स्वातंत्र्यानंतर अपवाद वगळताच इथे इतर कुठल्या पक्षाची सत्ता राहिली आहे. साताऱ्याचे विद्यमान खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उदयनराजे भोसले यांनी शुक्रवार १३ सप्टेंबर २०१९ च्या रात्री लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे आपल्या खासदारकीचा राजीनामा देऊन लगेचच आज सकाळी भाजप अध्यक्ष अमित शहांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
त्यांच्या रिकाम्या झालेल्या सातारा लोकसभेच्या जागेवर पोटनिवडणूक घेतली जाणार आहे. या पोटनिवडणुकीत उदयनराजेंच्या विरोधात आघाडी कडून कुणाला उमेदवारी मिळणार अशी उत्सुकता लोकांमध्ये दिसून येत आहे.
श्रीनिवास पाटलांचे नाव चर्चेत
१९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यानंतर २००४ च्या लोकसभा निवडणुकीत कराड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाणांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने निवृत्त IAS अधिकारी श्रीनिवास पाटलांना उमेदवारी दिली. श्रीनिवास पाटील आपल्या प्रचाराच्या भाषणात इतिहास, आठवणी, किस्से, विनोदापासून प्रशासकीय सेवेतील अनुभवांविषयी आणि त्यातून मतदारसंघाच्या विकासाविषयी भूमिका मांडत होते.
लोकांना हा चेहरा आश्वासक वाटला आणि त्यांनी श्रीनिवास पाटलांना निवडून दिले. त्यांनी २००९ पर्यंत लोकांची कामे केली. २००९ साली मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यांनतर कराडचा समावेश साताऱ्यात झाला. राष्ट्रवादीकडून उदयनराजे खासदार झाले. २०१३ मध्ये श्रीनिवास पाटील सिक्कीमचे राज्यपाल बनले. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून श्रीनिवास पाटलांना उदयनराजेंविरोधात उमेदवारी मिळू शकते अशी चर्चा आहे.
पृथ्वीराज चव्हाणांचेही नाव चर्चेत
दुसरीकडे पृथ्वीराज चव्हाणांनाही पूर्वीच्या कराड मतदारसंघात काँग्रेसतर्फे लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव आहे. ते राज्याचे मुख्यमंत्रीही राहिलेले आहेत. शिवाय दिल्लीत त्यांनी प्रधानमंत्री कार्यालयात काम केले आहे.
स्वच्छ प्रतिमेचे नेते अशी त्यांची ओळख आहे. खातेवाटपात राष्ट्रवादी काँगेसकडे असणारी साताराची जागा काँग्रेसला सोडल्यास पृथ्वीराज चव्हाणांना उदयनराजेंच्या विरोधात पोटनिवडणूक लढवण्याची संधी काँग्रेस देऊ शकते. काँग्रेसने तसे पृथ्वीराज चव्हाणांच्या नावाला सहमती दर्शवली आहे.
नरेंद्र पाटील पुन्हा लोकसभा लढवतील ?
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला होता. परंतु साताऱ्यात उदयनराजेंना टक्कर देण्यासाठी शिवसेना भाजपमध्ये समझोता होऊन नरेंद्र पाटलांनी भाजपच्या तिकिटावर उदयनराजेंना चांगली लढत दिली होती.
त्यात नरेंद्र पाटलांना चांगली मते मिळाली. भाजपने नरेंद्र पाटलांना आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नेमले आहे. आताच्या विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेना युती न झाल्यास पोटनिवडणुकीत नरेंद्र पाटील शिवसेनेकडून लोकसभा लढवू शकतात.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.