छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासारखा राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातील प्रमुख नेता भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहे, हि चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरु होती. ते प्रवेश करतील किंवा नाही याबाबतीत त्यांनी अनेक विधाने केल्यामुळे संभ्रम कायम होता.
परंतु आज त्यांनी १४ सप्टेंबर २०१९ रोजी दिल्लीमध्ये भाजप अध्यक्ष अमित शहा, जे पी नड्डा, मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
मात्र पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातील हा नेता भाजपला सहजासहजी मिळालेला नाही. भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी उदयनराजेंनी भाजपकडे दोन अटी घातल्या होत्या अशी माहिती मिळत आहे. काय आहेत त्या अटी पाहूया…
पहिली अट :
गेल्या अनेक दिवसांपासून उदयनराजे भाजपमध्ये प्रवेश करणार अशा नुसतीच चर्चा होती पण निश्चित मुहूर्त सापडत नव्हता. यामागे कारण होते. आपण खासदार पदाचा राजीनामा दिल्याच्या नंतर महाराष्ट्रात ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या सोबतच सातारा लोकसभा जागेची पोटनिवडणूक घेण्यात यावी अशी उदयनराजेंची अट होती.
इतक्या कमी कालावधीत अगदी काही आठवड्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीसोबत लोकसभेची पोटनिवडणुक घेणे शक्य नसल्याचे भाजप नेत्यांचे म्हणणे होते. त्यामुळे या मुद्द्यावरून उदयनराजेंचा प्रवेश लांबला होता
दुसरी अट :
उदयनराजेंच्या दुसऱ्या अटीविषयी उघडपणे नसली तरी राजकीय सूत्रांच्या वर्तुळात दबक्या आवाजात याबद्दल चर्चा सुरु आहे. ती अट अशी की लोकसभा पोटनिवडणुकीतील निकालाचा अंदाज अद्याप कुणालाच अंदाज वर्तवता आला नाही.
सातारा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे, मात्र उदयनराजे राष्ट्रवादी सोडून गेल्यास किती लोक त्यांच्यासोबत भाजपची वाट धरतात याचा अद्याप अंदाज आला नाही. तसेच पोटनिवडणुकीत कोणत्या उमेदवाराविरोधात त्यांना लढावे लागेल याबाबतही काही चित्र स्पष्ट नाही.
अशावेळी खासदारकीच्या चालू पदावरून राजीनामा देऊन होणाऱ्या पोटनिवडणूकीत पराभव झाल्यास पर्याय म्हणून आपल्याला राज्यसभेवर खासदार करावे अशी अट उदयनराजेंनी भाजपकडे घातली आहे अशी राजकीय वर्तुळातील चर्चा आहे.
या दोन्ही अटी मान्य झाल्यामुळेच उदयनराजे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत असे सांगण्यात येत आहे
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.