१ सप्टेंबरपासून नवीन मोटार वाहन कायदा अस्तित्त्वात आला आहे. तेव्हापासून लोकांकडून मोठ्या प्रमाणात दंड वसूल व्हायला सुरवात झाली आहे. लोकांना इतका दंड होतोय की अक्षरशः कर्ज घेऊन भरावा लागेल. सगळ्यात पहिली बातमी आली ती हरियाणाच्या गुरुग्रामची !
ज्या व्यक्तीच्या स्कुटीची किंमतच १५ हजार रुपये आहे, त्या व्यक्तील ट्रॅफिक पोलिसांनी २३ हजार रुपयांचा दंड ठोठावला. त्यांनतर दुसरी बातमीही गुरुग्राममधूनच आली. एका व्यक्तीला एका नव्हे तर दहा नियमांचा भंग केल्याप्रकरणी ट्रॅफिक पोलिसांनी ट्रॅफिक पोलिसांनी तब्बल ५९ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
या दहा नियमांचा भंग केल्याप्रकरणी ठोठावला ५९ हजारांचा दंड
गुरुग्राम ट्राफिक पोलिसांनी संबंधित व्यक्तीवर पुढील १० नियमांचा भंग केल्याप्रकरणी एकूण ५९ हजार रुपयांच्या दंडाची कारवाई केली आहे. १) वाहन चालवण्याचे लायसन्स नसणे. २) वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र नसणे. ३) वाहतुकीसाठी नादुरुस्त वाहन वापरणे.
४) थर्ड पार्टी विमा नसणे. ५) पोल्युशन अंडर कंट्रोल (PUC) सर्टिफिकेट नसणे. ६) धोकादायक वस्तूंची वाहतूक करणे. ७) धोकादायक पद्धतीने वाहन चालवणे. ८) पोलिसांच्या आदेशाचे पालन न करणे. ९) ट्राफिक सिग्नलचे पालन न करणे. १०) सिग्नलवरील पिवळ्या लाईटचे उल्लंघन करणे.
गुरुग्राम ट्रॅफिक पोलिसांच्या ट्विटरवर नजर टाकल्यास आपल्या लक्षात येईल की किती वेगाने लोकांकडून भयंकर दंड वसूल केला जात आहे. एका कारचालकालाही ५९ हजारांचा दंड ठोठावला आहे. आता नवीन नियम तर आले आहेत. मोठेमोठे दंड ठोठावले जात आहेत.
या दंडाच्या भरपाईपोटी एखाद्याच्या एक नव्हे तर दोन-तीन महिन्यांचि पगारा छूमंतर होऊ शकतो. आपल्याकडे यातून वाचण्याचा एकच मार्ग आहे. आपली गाडी अद्ययावत ठेवा. गाडीची सर्व कागदपत्रे योग्य, अपडेटेड आणि आपल्या सोबत ठेवा. तसेच हेल्मेटशिवाय गाडी चालवू नका.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.