प्रत्येक स्त्रीला आपले केस लांब आणि घनदाट असावेत असे वाटते. पुरुष सुध्दा यात मागे राहिले नाही आहे. त्यासाठी अनेक उपाय करतो. काही वेळेस काही घरगुती उपायांनी तर अनेकदा बाजारात मिळणारी विविध उत्पादने वापरुन केस जास्तीत जास्त चांगले कसे राहतील यासाठी प्रयत्न केला जातो. केसांचे आरोग्य चांगले राहण्यामध्ये वातावरण, केस धुण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी, आहार, केसाला लावली जाणारी शॅम्पू, कंडिशनर, तेल इत्यादी गोष्टीची आपण काळजी घेतो. हे केस लांब आणि सिल्की, चमकदार राहण्यासाठी आपणही वापरू शकता करता येतील असे काही सोपे व घरगुती उपाय खासरे वर ..
केस हलकेपणे कोरडे करा
केस धुतल्यानंतर साधारणतः ते अतिशय हलक्या हाताने कोरडे करणे गरजेचे असते. जोर लावून केस पुसल्यास ते तुटण्याची शक्यता जास्त असते. अतिशय पातळ टॉवेल किंवा जुना टी-शर्ट केस पुसण्यासाठी वापरावा पाणी सोकून घेईल असा कपडा वापरावा अगदी सोम्य हाताने . अनेकींना केस जोरजोरात झटकण्याचीही सवय असते हि सवय चुकीची आहे. त्यामुळे केस तुटू शकतात. तसेच ओले केस विंचरु नयेत. हातांनी हे केस तुम्ही सारखे करु शकता मात्र विंचरल्याने ते तुटण्याची शक्यता असते.
नियमित केसांची मसाज करा
केस असो या अवयव मसाज हा चांगलाच असतो. केसांच्या मुळांशी योग्य पद्धतीने मसाज फायदेशीर असतो. शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मसाजचा फायदा होतो. मसाज कराची पद्धती खालील प्रमणे आहे. खोबरेल तेल किंवा बदाम तेलाने मुळांना मसाज केल्यास केसांची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. यामध्ये तुम्ही तुमच्या हाताने मसाज करुन घेऊ शकता. कुटुंबातील व्यक्तीकडून किंवा मित्र-मैत्रीणींकडूनही डोक्याला मसाज करुन घेऊ शकता. याशिवाय सध्या पार्लरमध्येही मसाज करण्याचा पर्याय उपलब्ध आहे.
रोज केस धुणे टाळा
केसांमध्ये नैसर्गिकरित्या तयार होत असते आणि हे तेल केसांच्या आरोग्यासाठी आवश्यक असते. अनेकांना विशेषतः मुलींना केस चांगले दिसावेत यासाठी रोज केस धुण्याची सवय परंतु हि सवय धोकादायक आहे . अशामुळे केसात निर्माण होणारे नैसर्गिक तेल नष्ट होते आणि केसांची गुणवत्ता खराब होते नैसर्गिक केस हेच उत्तम केस असतात.
तेल आठवड्यातून दोनदा लावा
शरीराच्या अवयवांप्रमाणेच केसांनाही योग्य पद्धतीने पोषण होणे अतिशय गरजेचे असते. केसांच्या मूळांना तेल लावल्याने केसांच्या वाढीसाठी आवश्यक ती पोषकद्रव्य मिळतात. त्यामुळे केस लांब आणि मजबूत राहतात. केसांना कोमट तेल लावल्यानंतर केसांच्या मूळांना हलक्या हाताने मसाज करावी. तेल लावल्यानंतर टॉवेल गरम पाण्यात टाकून तो पिळून केसांना बांधा. असे १० मिनिटांसाठी केल्यास केसांमध्ये तेल योग्य पद्धतीने मुरण्यास मदत होईल. दोन तासांनी केस शाम्पूने धुवून टाकायचे. ह्या पद्धतीने तेल लावल्यामुळे रक्तप्रवाह चांगला होण्यासही मदत होते.
प्रत्येकवेळी कंडीशनर वापरा
केस चांगले ठेवायचे असतील तर कंडीशनर वापरणे अतिशय आवश्यक असते.शाम्पू रोज वापरायचा नाही परंतु कंडीशनरमुळे केसात आर्द्रता राहण्यास मदत होते आणि कोरडेपणा कमी होतो. प्रदूषण आणि धूळ यांपासून केसांचे रक्षण होण्यास मदत होते. आपल्या केसांचे गुणवत्ता लक्षात घेऊन योग्य तो शॅम्पू आणि कंडीशनर यांची निवड करणे हेही महत्त्वाचे आहे. बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे शाम्पू व कंडीशनर मिलतात.
वरील गोष्टीची काळजी घेतल्यास आपणाला मिळेल सुंदर दाट आणि लांब केस…..