10 भारतीय हिरो ज्यांचा कधीही गौरव केला गेला नाही.
भारतीय महिलांच्या सुधारणेसाठी काम करणारे ईश्वर चंद्र विद्यासागर आपल्या लक्षात आहेत का? किंवा डॉ बी आर आंबेडकर जे सामाजिक भेदभाव विरोधात लढले? किंवा मदर तेरेसा ज्यांची समाजातील दुर्लक्षित लोकांसाठी केले.
या लोकांनी आपल्या समाजात चांगली जागा बनविण्याच्या प्रयत्न केला आहे. परंतु हजारो लोक असे आहेत जे कुठलीही अपेक्षा न करता समाजासाठी काम करतात.
70 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त, आम्ही अनोळखी नायकांच्या कथा आणत आहोत जे आपल्या समाजात काही विलक्षण गोष्टी करत आहेत. काही अल्पवयीन मुलांच्या कल्याणासाठी काम करत आहेत, काही प्राण्यांसाठी, काही लोकांचे पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी कार्यरत आहेत तर काही जण आरोग्यसेवा सुधारण्यासाठी काम करत आहेत.
चला त्या बद्दल जाणून घेऊ..
थिरु व्ही. कल्याणसुंदरम
द हिंदू वर्तमान पत्रानुसार,जेव्हा ते तुतिकोरिन येथील कुमारकरूपा कला महाविद्यालयात ग्रंथपाल होते, तेव्हा त्यांनी आपल्या पूर्वजांच्या मालमत्तेची विक्री केली व ती रक्कम गरीब बालकांना दिली.
1998 मध्ये, सेवानिवृत्तीनंतर त्यांनी पालम (ब्रिज) बनवला, भारतातील पहिला दाता-प्राप्तकर्ता सामाजिक सेवा अभियान. “आम्ही वापरलेल्या किंवा न वापरलेल्या जुने वर्तमानपत्र, कपडे आणि भांडीे घेतो,” असे कल्याणसुंदरम म्हणतात. अमेरिकन संस्थेद्वारे त्यांना ‘मॅन ऑफ द मिलेनियम’ या पुरस्कारासाठी निवडले गेले. त्यांनी 30 कोटी रुपये धर्मादायतेसाठी दिले.
करीम भाई
हैदराबादमधील एक व्यक्ती, जो गरीब मुलांना वृत्तपत्र वितरीत करतो, त्यांना सुशिक्षित आणि जागरूक व्यक्ती म्हणून वाढण्यासाठी मदत करतात.
बाबर अली
Wired नुसार, बाबर अली यांना “जगातील सर्वात तरुण मुख्याध्यापक” असे म्हटले जाते. 2009 मध्ये बीबीसीने हे शीर्षक त्यांना दिले तेव्हा ते 16 वर्षांचे होते. ते पश्चिम बंगालमध्ये राहतात, आणि 9 वर्षांच्या वयापासून त्यांनी दुर्लक्षित असलेल्या मुलांसाठी एक शाळा चालविणे सुरु केले.
अरुणीमा सिन्ह
2011 मध्ये अरुणिमा सिन्हाला तिच्या गळ्यातील सोन्याच्या हार देण्यास नकार दिल्यामुळे एका रेल्वे गाडीतून खाली फेकण्यात आले. या दुर्घटनांमुळे,तिने पाय गमावला..!
वन इंडिया च्या अहवालात म्हटले आहे की, अरुणिमा सिन्हा आता माउंट एव्हरेस्टवर चढत असलेल्या पहिल्या अपंग महिला आहेत. तिला आणखी पाच शिखरांवर चढायचे आहे तिचे ध्येय सर्व खंडांच्या सर्वोच्च शिखरांवर चढणे आणि त्यांच्यावरील भारताचा ध्वज ठेवण्याचे आहे. तिचा हा उत्साह एक प्रेरणाच आहे.
व्यंकटरमण
2007 मध्ये, एका वृद्ध महिला आपल्या बिहारी पतीसाठी (जो शासकीय रुग्णालयात होता)इडली खरेदी करण्यासाठी एएमव्ही या घरगुती मेसचा मालक वेंकटरामनला भेटली, शासकीय रुग्णालयात गरीबांच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर वेंकटरामन यांनी शासकीय रूग्णालयातील रुग्णांना 1 रुपयात टिफिन व जेवण देण्याचा निर्णय घेतला.
शालिनी अगरवाल
शालिनी अगरवाल (वय 44) यांनी रस्त्यांवर जखमी झालेल्या प्राण्यांवर उपचार केले. त्यानंतर जखमी प्राण्यांना पुनर्वसनासाठी घेतले. ती उत्तर प्रदेशातील बरेली गावातील रहिवासी आहे.
काही जनावरांना त्यांच्या घरी आश्रय दिला जातो, तर काहीना आश्रय ‘प्रेम आश्रम’ इथं दिला जातो.तिच्याकडे 30 कुत्रे, बैल, चार घोडे आणि एक जंगली मांजर आहे. एक उत्साही प्राण्याचे प्रेमी म्हणून तिने एच.टी. वूममन एनिमल केअर पुरस्कार जिंकला आहे.
ओंकारनाथ कथारिया
ओंकारनाथ कथारिया दिल्लीमध्ये रिक्षा-चालक असून ते वाहतूक सिग्नल वर पाणी आणि अन्न पॅकेट मोफत वितरित करतात. ते जखमींना हॉस्पिटलला नेण्यासाठी मोफत सवारी देखील देतात.यासाठी आता तो एक छोटा दानपेटी ही ठेवतो.
श्याम कुमार
एक रिक्षा चालक एम. श्याम कुमार हे,त्यांचे वडिल आणि त्यांच्या पत्नीसह गेल्या 19 वर्षांपासून संरक्षण संवर्धनाच्या कार्यावर आहेत. त्यांनी परिसरात लोकांना प्रेरणा दिली आणि 23,000 पेक्षा जास्त रोपे लावले आहेत. यापैकी, 90% आता सावली देणारे आणि फळे देणारे करणारे झाडं आहेत.
डॉ.रवींद्र कोल्हे
डॉ.रविंद्र कोल्हे कुपोषण, शेतकरी आत्महत्या आणि अन्य विषयांसाठी महाराष्ट्रातील गरीब आदिवासी भागाचा मेळघाटमध्ये कार्य करतात. ते प्रति रुग्ण दर एक रुपये शुल्क आकारतात आणि 400 रुग्णांवर उपचार करतात. जेव्हा त्यांनी 1985 मध्ये प्रथम भेट दिली तेव्हा मेळघाटच्या अर्भक मृत्यु दर सुमारे 200 होती, परंतु आता ती प्रति हजार मुलांमागे 40 आहे.
निशा नायर
निशा नायरने आर्ट स्पार्क्स फाउंडेशनची स्थापना केली, जी विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात सृजनशीलता वाढवण्यासाठी आहे.ही संस्था समस्या सोडवणे, नवोपक्रम, आणि लवचिक विचार करण्याची क्षमता विकसित करण्यास मदत करते.
निशा यांनी अमेरिकेत दोन दशके घालवले असून न्यूयॉर्कमधील 70 शाळांमधील शिक्षण गुणवत्ता सुधारण्यासाठी त्यांनी काम केले आहे. बंगळूरू ला जन्मलेल्या निशाला भारतात बदल करण्याची इच्छा होती. त्यामुळे ती परत आली.
आर्ट स्पार्क्स फाऊंडेशन 630 विद्यार्थीना आणि 165 शिक्षकांना सेवा देत आहे. “समाजाच्या भल्यासाठी योगदान देणा-या लोकांची माहिती ऐकल्यामुळे नेहमीच हृदय हेलावून जाते.”
महात्माजींनी एकदा म्हटले होते, “मानवतेवर चा विश्वास गमावू नये.” मानवता एक महासागर आहे; जर महासागरात काही थेंब खराब असतील तर महासागर गलिच्छ नाही. ” तर आपण आपल्या सभोवतीच्या लोकांच्या भल्यासाठी एक पाऊल उचलूया.मला विश्वास ठेवा, एक दिवस तो तुम्हाला परत मिळेल.
Contact us at
info@khaasre.com
Salute them mimdlly