जीवन हे आपण म्हटल्याप्रमाणे चालत नाही अनेक संघर्ष करून यामध्ये यश प्राप्त करावे लागते. कधी कधी वाईट वेळ येतो आणि अचानक काहीतरी चांगले होताना आपल्याला दिसते. असेच काही जीवन आहे आपल्याला संयम आणि जिद्द सोडता कामा नये. विश्वास असल्यास आपण जीवन बदलवू शकतो.
तेजसच्या वडिला सोबत असेच काही झाले त्यांचा मोठा व्यवसाय अचानक कोसळला आणि त्याचे जीवन बदलून गेले. जेव्हा तो दहाव्या वर्गात होता तेव्हा त्यांच्या वडीलचा व्यवसाय बंद पडला घर विकून ते छोट्या घरात राहायला गेले आणि बाकी सर्व खर्च त्यांनी बंद केले. जीवनात या धक्यातून निघतो का नाही असे त्याला वाटत होते.
आपल्या कुटुंबावर आलेले संकट बघून तेजसने वेटरची नौकरी करण्याचा निर्णय घेतला. मित्राने त्याला इवेंट मध्ये वेटरचे काम करण्याचा सल्ला दिला रोज २५० रुपये होता. घरी खोटे बोलून तो कामाला जात असे. त्या वेळेस तेजस फक्त १५ वर्षाचा होता.
तिथे त्याला भांडे उचलायचे काम भेटले परंतु एवढा मोठा इवेंट त्याने आयुष्यात बघितला नव्हता आणि आयुष्यात काय व्हायचं हे त्याच दिवशी तेजसनि ठरविले. इवेंट्स कसे करायचे याची माहिती मिळवत काम करत तो शिकत होता. त्याच्या घरच्यांना देखील तो काम करत आहे याची कल्पना आली परंतु यावेळेस घरच्यांनी त्याला साथ दिली.
शेवटी त्याच्या वडिलाला नौकरी मिळाली आणि तेजसने इवेंटमध्ये काम करणे सोडून आपल्या शिक्षणावर लक्ष दिले. त्यानंतर त्याला सुध्दा एका फायनन्स कंपनीत नौकरी लागली परंतु त्याचे मन तिथे रमत नव्हते. त्याला इवेंट्सच्या जगाचा हिस्सा व्हायचं होत.
नौकरी सोडून परत इवेंट्सच्या जगात परतला. प्रियंका चोप्रा आणि निक जोनसच्या लग्नात सुध्दा त्याने सध्या काम केले आहे. अंबानीच्या लग्नात देखील त्याने काम केले आहे. आज तो अनेक अंतराष्ट्रीय इवेंट्स मध्ये काम करतो. तो सांगतो कि कुठलेही काम लहान मोठे नाही हेच काम तुम्हाला यशाच्या शिखरावर पोहचविते.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.