पूजा वैश्य हिला २९ ऑगस्ट २०१७ रोजी कल्पनाही नसेल कि आज काय घडणार आहे. ती नेहमीप्रमाणे तिच्या कामाकरिता जायला निघाली. त्या दिवशी मुंबईला जोरदार पाउस सुरु होता परंतु मुंबईकरांना हे नवीन नाही. परंतु हा पाउस थोडा वेगळा होता. संपूर्ण मुंबई या पावसाने थांबवली होती. आणि तीही या पावसाने एका ठिकाणी अडकली. समुद्राच्या काठावर असलेली मुंबापुरी अचानक पावसाच्या पाण्याने ओसंडून वाहत होती. आणि पूजा तिच्या कामाला जाण्याकरिता निघालेल्या गाडीने समस्त मुंबईकरा सोबत पाण्यात फसली.
त्यानंतर काय हाहाकार उडाला हे संपूर्ण जगाला माहिती आहे. परंतु या पावसात मुंबईचे जिंदादिल रूपाचे प्रत्यत सर्वाना आला लोकांनी अनोळखी लोकांना थांबायला निवारा दिला.
झोपडपट्टीतल्या लोकांनि अनेक लोकांना नाश्ता पाण्याची व्यवस्था केली . या पाण्यात अडकलेल्या प्राण्यांनाहि लोकांनी सुखरूप बाहेर काढले.
पूजाचीही कथा अशीच आहे तिला मदत केली ओला कार चालकाने त्याचे नाव सिकंदर खान.. एकूण १० तासाचा प्रवासात त्याने पूजा व इतर प्रवाश्याची ज्या प्रकारे काळजी घेतली ती प्रशंसनीय आहे. परेल ते हिंदमाता फ्लायओवर या दरम्यान हा सर्व माणुसकीची प्रचीती देणारा प्रसंग घडला. संपूर्ण प्रवासात त्याने पाणी,अन्न व त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये हि काळजी घेतली.
तिने ओलाला पत्र लिहिले आहे त्याचा मराठी अनुवाद आपल्या समोर देत आहो.
मी कृतज्ञता व्यक्त करू इच्छिते व आज सकाळच्या माझा कॅब चालकाला बक्षीस देण्याची विनंती करते. त्याचे नाव सिकंदर खान आहे. आज मुंबईतील पूर परिस्थितीच्या काळात त्यांनी आपल्या मानवतेचे आणि मदतीचे अप्रतिम उदाहरण दिले आहे.
आम्ही अत्यंत खराब पूर प्रीस्थिती असलेल्या परिसरात सकाळी १० वाजल्या पासून जवळपास १० तासापेक्षाही अधिक काळ हिंदमाता उड्डाणपूलावर, परेल येथे अडकलो होतो. या परिस्थितीमध्ये जेव्हा मी टॅक्सीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तेव्हा मला त्याची छत्री दिली परंतु पाणी छातीपर्यंत असल्याचे मला बाहेर पडल्यावर कळले आणि त्याने मला मधेच थांबायची विनंती केली. त्यांनी मला खात्री दिली की कितीही पूर असुद्या मी तुम्हाला घरापर्यंत सुखरूप पोहचवेल. दुपारच्या सुमारास आम्हाला खूप भूक लागली सोबत काहीही नव्हते तेव्हा तो एक तासाकरिता गायब झाला आणि गरम पिझ्झा घेऊन परत आला त्याला पैसे देण्यासाठी तर त्याने पैसे घेण्यास नकार दिला. 8 वाजता अंधार पडण्यास सुरुवात झाली आणि मी जवळचे हॉटेल शोधण्याच्या प्रयत्नान होती (मी फ्लायओव्हरवर असलेल्या एका कॅबमध्ये रात्र घालवू इच्छित नव्हती), तेव्हा त्याने आपली कॅब सोडली आणि अक्षरशः माझा हात धरून जवळपास एक किलोमीटर अंतरावर असलेल्या एका हॉटेलमध्ये त्या छातीपर्यंतच्या पाण्यातून मला सुखरूप पोहचविले. पोहोचण्यास अर्धा तास लागला. त्याने पैसे घेण्यास नकार दिला, पण जेव्हा मी आग्रह केला तेव्हा शेवटी स्वीकारले देव या माणसाचे भले करो त्याला तिथे परत पोहचायला काय हाल सोसावे लागले असेल हे देवच जाणो जर तो नसता तर मी नक्की त्या पाण्यात वाहून गेले असते. अभिनंदन ओला त्याने मला वाचविले त्याला योग्य बक्षीस द्या…
३० ऑगस्ट रोजी तिने ओलाच्या फेसबुक पेजवर तिचा अभिप्राय लिहिला आहे. आणि हा अभिप्राय सगळीकडे वायरल झाला आहे.
सिकंदर खानच्या ह्या मदतीकरिता खासरे तर्फे त्याला सलाम..
वाचा १० भारतीय खरे हिरो ज्यांना कोणतीही पुरस्कार नको..
Comments 1