सातवीतील काम्या बनली माउंट एकांकागुआ सर करणारी जगातील सर्वात युवा गिर्यारोहक

काम्या कार्तिकेयन ही १२ वर्षांची विद्यार्थिनी माउंट एकांकागुआ सर करणारी जगातील सर्वात युवा गिर्यारोहक बनली आहे. अर्जेंटिनाच्या अँडीज पर्वतरांगांमध्ये स्थित असणारे माउंट एकांकागुआ दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात उंच शिखर आहे. रविवारी १ फेब्रुवारी रोजी काम्याने ६९६२ मित्र उंच शिखरावर यशसवी चढाई करुन भारताचा तिरंगा फडकावला. काम्य ही मुंबईमधील नेव्ही चिल्ड्रेन स्कुलमध्ये सातव्या इयत्तेत शिकते. एवढ्या लहान वयात ही कामगिरी करणाऱ्या काम्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

काम्याने २४ ऑगस्ट २०१९ रोजी लडाखमध्ये ६२६० मीटर उंच मेंटोक कांग्री द्वितीय यावर यशस्वी चढाई केली होती. ती कामगिरी करणारी देखील ती सर्वात लहान गिर्यारोहक होती. या गिर्यारोहण अभियानाशी संबंधित अधिकाऱ्याने सांगितले की, “अनेक वर्षांपासुन करत असलेल्या शारीरिक आणि मानसिक तयारीसह साहसी खेळांमध्ये नियमित सहभाग घेतल्यामुळे काम्याला कठीण परिस्थितीतदेखील शिखर सर करण्यामध्ये मदत झाली,”

काम्याचे वडील एस.के.कार्तिकेयन भारतीय नौदलात कमांडर आहेत, तर तिची आई लावण्या कार्तिकेयाने शिक्षिका आहेत. काम्या ३ वर्षांची असताना तिने लोणावळा (पुणे) येथे असणाऱ्या बेसिक ट्रॅकवर चढाई करण्यास सुरुवात केली होती. ९ वर्षांची असताना काम्याने आपल्या आईवडिलांसह हिमालयाची अनेक उंच शिखरे सर केली. त्यामध्ये उत्तराराखंडच्या रुपकुंडचा समावेश आहे. वयाच्या दहाव्या वर्षी काम्या नेपाळमधील एव्हरेस्ट बेस कॅम्प (५३४६ मी.) पर्यंत पोहोचली. २०१९ मध्ये तिने लडाखच्या माउंट स्टोक कांग्री (६१५३ मी) शिखर सर केले.

काम्याने आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर माउंट किलिमंजारो (५८९५ मीटर), युरोपमधील सर्वोच्च शिखर माउंट एल्ब्रुस (५६४२ मीटर) आणि ऑस्ट्रेलियातील सर्वोच्च शिखर माउंट कोसुझको (२२२८ मीटर) सर करण्यामध्येही यश मिळवले आहे. पुढच्या वर्षी काम्याला एक्सप्लोरर्स ग्रँड स्लॅम पूर्ण करण्याची इच्छा आहे. त्यासाठी तिला सर्व खंडातील सर्वोच्च शिखरे सर करावी लागतील.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला आपल्याकडील खास माहिती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.