आपल्याला माहिती आहे कि, जगतील सात आश्चर्य पैकी एक आश्चर्य ताज महल हे आहे. आपल्याला माहिती आये कि ते कोणी व कोणासाठी बांधले. भारता करिता ऐतिहासिक वास्तू आहे ताजमहल. आपल्याला ताज महल बद्दल बर्याच गोष्टी माहिती आहे परंतु ह्या गोष्टी नक्की माहिती नसेल
१. ताजमहलच्या छतावर एक छोटेसे छिद्र आहे. मुमताज महलच्या सरळ रेषेत हे छिद्र आहे.
लोक असे सांगतात कि ताजमहल बांधणाऱ्या कारागिरांना कळाल कि त्यांचे हात कापणार आहे म्हणून कारागिरांनी निर्दोष ताज महल मध्ये एक छोटीसी चूक ठेवली जेणे करून ती दुरुस्त करायला शाहजहान वेळ देईल. कुठलेही दोष नसलेल्या ताजमहल मध्ये हि एक चूक आहे.
२. ASI नि दुसर्या महा युद्धात ताज महल झाकून ठेवले होते. बॉम्ब पासून बचाव करण्याकरिता हा उपाय करण्यात आला होता.
मोठ्या ताडपत्रीने ताजमहाल ला झाकण्यात आले. बांबूच्या बना सारखे रूप या सुंदर इमारतीस देण्यात आले जेणे करून दुसर्या महायुध्दात यावर कोणी बॉम्ब वर्षाव करू नये. १९७१ साली झालेले भारत पाकिस्तान युध्द व ९/११ च्या हल्यानंतर ताजमहल हे हिरव्या कापडाने झाकण्यात आले.
३. ताजमहाल पहिल्यादा बघितल्या वर शाहजहान काय बोलला असेल ?
दोषी व्यक्तीने इथे शरणागती मागितली तर , त्याला इथे क्षमा केली जाते त्याप्रमाणे तो इथे आला तर पापमुक्त होतो. पापी माणूस ह्या हवेलीत गेला तर, त्याच्या सर्व पापे धुऊन जातात. या हवेलीची दृष्टी पाहून सुख निर्माण होतात आणि सूर्य आणि चंद्र त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. निर्मात्याचे गौरव दाखवायला या जगात हे बांधकाम झाले आहे.
४.कारागिराचे हात छाटले हि गोष्ट खोटी असू शकते कारण त्याच कारागिरांनी ठिकाणी काम केले आहे.
ताज महल बांधणाऱ्या कारागिराचा प्रमुख जो होता त्यानेच लाल किल्ल्याचे सुरवातीचे बांधकाम केले. उस्ताद अहमद लाहोरी हे कारागिराचे प्रमुख असू शकतात. शाह जहान यांनी लाल किल्ल्याच्या बांधकामासाठी पैसे दिल्याचा उल्लेख आढळतो यावरून लक्षात येते कि कारागिराचे हात शाबूत होते.
५. ताजमहाल च्या बाजूला असलेल्या मिनार (वास्तू) जर भूकंपात पडल्या तर त्या कधीही ताजमहल वर पडणार नाही.
जर तुम्ही बारकाईने बघितले तर चारही मिनार ताजमहालच्या बाहेरील बाजूस झुकलेल्या आहेत. असे बांधकाम हे नैसर्गिक आपत्ती पासून रक्षण करण्या करिता केलेले आहे. मिनार जर पडले तर ते घुमटावर पडणार नाही.
६. ताज महल अनेक वेळेस विकणार्या ठग नटवरलाल याचे मंदिर लोकांनी बांधलेले आहे.
नटवरलाल हा प्रसिध्द ठग होता. त्याने अनेक वेळेस ताजमहल विकायचा म्हणून लोकांना फसविले आहे. त्याचे मुळ गाव बांगरा (बिहार) येथील लोकांनी त्याचा पुतळा त्या ठिकाणी ठेवला आहे. जिथे त्याचे घर होते.
७.ताजमहल मधील भव्य दिव्यता कोणालाही आंधळ करू शकेल…
२८ प्रकारचे काही बहुमुल्य रत्न ताजमहाल मध्ये लावण्यात आलेले आहे. श्रीलंका,तिबेट,चीन आणि भारतातील काही ठराविक ठिकाणे येथून हि रत्ने आणण्यात आली होती. ब्रिटीश काळात बरेच रत्न चोरीला गेले. त्यानंतर १९ व्या शतकाच्या शेवटी परत ते लावण्यात आले.
८. ताजमहल हा कुतुबमिनार पेक्षाही उंच आहे.
ताज महल हा कुतुबमिनार पेक्षा ५ फुट जास्त उंच आहे. जगातील काही उंच इमारती तुम्ही बघू शकता व ताज महलाची तुलना करा.
९. ताज महल बांधायला किती खर्च आला.
शाह जहान ने ताज महल बांधायला इसविसन १६३२ ते १६५३ मध्ये ३२०० करोड रुपये खर्च केले. सध्या ह्या इमारतीची अंतराष्ट्रीय किंमत १,०६२,८३४,०९८ डॉलर एवढी आहे.
१०. ताजमहल मधील कारंजे अश्या पद्धतीने बनविण्यात आले कि प्रत्येक कारंज्यातून सारख्या प्रमाणात फवारे वर येईल.
प्रत्येक कारंज्यात सारख्या प्रमाणात दबाव राहण्या करिता विशेष पद्धती वापरण्यात आली आहे. फवार्याला पाईप न लावता प्रत्येक कारंज्याखाली एक तांब्याचे भांडे ठेवण्यात आले आहे. आणि त्या भांड्यात पहिले पाणी भरल्या जाते नंतर कारंज्यात पाणी येते.
११. जादुगार पी.सी. सरकारने २००० साली ताज महल गायब केला होता.
ताज महलला गायब करण्याची जादू सरकार यांनी ८ नोव्हेंबर २००० साली काछापुरा, आग्रा येथे हा कार्यक्रम झाला होता.
१२. रोज १२,००० लोक ताजमहलला भेट द्यायला येतात.
१३. शाह जहान याला अजून एक काळा ताज महल बांधायचा होता.
पत्नीच्या आठवणीत बांधलेला ताजमहल एक ताजमहल आणि त्याची प्रतिकृती त्याला नदीच्या दुसर्या बाजूला बनवायची होती. युरोपियन प्रवाशी तावेर्नीर याने लिहून ठेवले आहे कि स्वतः करिता शाहजहान ला अजून एक ताज महल बांधायचा होता. परंतु त्याला औरंगजेबाने नजरकैद केल्यामुळे हे स्वप्न अधुरे राहिले.
१४. ताजमहल सोबत पहिला सेल्फी जॉर्ज हर्रीसन याने घेतला होता. त्या करिता फिश आय लेन्स त्याने वापरली.
१५. प्रकाशानुसार ताज महल रंग बदलवितो.
ताज महल सकाळी गुलाबी , दुधी पांढरा सायंकाळी व रात्री चंद्र प्रकाशात सोनेरी दिसतो.
१६. ताजमहलची सुंदरता बघून अमेरिकन ग्रैमी पुरस्कार विजेता Henry Saint Clair Fredericks हा स्टेज वर आपले नाव ताजमहल असे वापरत होता.
१७. तुम्ही जसे ताजमहल च्या जवळ जासाल तसा ताज महल लहान होताना दिसेल.
ताजमहलच्या कारागिरांनी लोंकाना आकर्षित करण्या करिता हि क्लुप्ती लढवली होती. याचा अर्थ असाही होतो कि तुमच्या हृदयात ताजमहल सामावला पाहिजे या करिता हि क्लुप्ती वापरण्यात आली.
Comments 1