आपल्या शहिद पतीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दहशतवाद्यांशी लढेल
लेफ्टनंट स्वाती महाडिक
जम्मू-काश्मीरमधील उरी दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले कर्नल संतोष महाडिक यांची पत्नी स्वाती शनिवारी लेफ्टनंट झाल्या. चेन्नई ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीमध्ये (उटी) येथे ट्रेनिंग करीत असताना, एका वर्षात कठोर मेहनत घेऊन त्या ट्रेनिंग परेड पास आउट झाल्या . स्वाती म्हणाल्या की आर्मी युनिफॉर्म आणि युनिट हे कर्नल महडिक यांच प्रथम प्रेम आणि स्वप्न होते. म्हणूनच मी सुद्धा हा आर्मी युनिफॉर्म परिधान करण्याचा निर्णय घेतला. आता मला पतीप्रमाणे दहशतवाद्यांबरोबर लढायचे आहे. कर्नल महडिकच्या हौतात्म्यानंतर, स्वातीने सैन्यदलामध्ये सामील होण्याची इच्छा व्यक्त केली. वयाचा अडथळा होत होता.
स्वाती (32 वर्ष) यांनी 11 महिन्यांपूर्वी सर्व्हिस सिलेक्शन कमिशनच्या अंतिम यादीत स्थान मिळविले. त्यानंतर, प्रशिक्षणासाठी चेन्नईतील अधिकारी प्रशिक्षण अकादमीत गेल्या.
स्वातीने पतीच्या अंत्यसंस्काराच्या वेळी सांगितले होते की, आपल्या पतीच्या पश्चात त्यांच्या जबाबदाऱ्या पूर्ण करणार. त्यासाठी, स्वातीने सैन्यात काम करण्याची मागणी केली नाही तर तिने स्वतःला एसएसबी परीक्षा उत्तीर्ण करून सिद्ध केले आहे. तिने सर्व पाच फेऱ्या पूर्ण केल्या. पण त्यांच्या ध्येयामध्ये वयाची अडचण ही एक मोठा अडथळा होता. सैन्याच्या नियमांनुसार, 32 व्या वर्षी प्रवेश दिला जात नाही. स्वाती च्या इच्छेवर माजी लष्करप्रमुख जनरल दलबीर सिंग यांनी वयात सूट देण्याची शिफारस केली होती. तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी ती शिफारस मान्य केली.
दहशतवाद्यांशी घेणार बदला
पतीप्रमाणे, स्वातीला दहशतवाद समाप्त करण्याची इच्छा आहे.ती नेहमी आपल्या पतीच्या हौतात्म्यचा बदला घेण्याची इच्छा बाळगते.
स्वाती म्हणाल्या की, “पती शाहिद झाल्यामुळे मी सध्या कुठल्याच दुःखात नाही.आणि जेव्हा मी यातून बाहेर आली तेव्हा स्वत:ला अगोदरपेक्षा जास्त कणखर वाटत गेलं. पती ज्या कामावर होते, ते काम आता पूर्ण करण्याची जबाबदारी मला घ्यायला हवी. मुलं सध्या लहान आहेत, ते देखील सैन्यात भरती झाले तर आवडेल. ”
“माझ्यासाठी सैन्यदलात सामील होणे एक भावनिक निर्णय आहे. कुपवाडामधून मी माझ्या पतीची शरीर सताऱ्याकडे आणत होतो तेव्हा माझ्या मनात फक्त एकच विचार आला होता. पण आता मी त्यांचा ड्रेस घालते तेव्हा ते मला त्यात दिसतात. ”
मुलांना बोर्डिंग शाळेत पाठवाव लागलं
शहीद कर्नल महडिक व स्वाती यांना 12 वर्षांची मुलगी आणि आणि सहा वर्षांचा मुलगा आहे.दोन्ही मुलांना प्रशिक्षणामुळे बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवावे लागले. स्वातीने मुलीला डेहराडून आणि मुलाला पाचगणीतील बोर्डिंग शाळेत टाकले.
स्वातीने पुणे विद्यापीठात एम.ए. केले आहे. त्या सेंट्रल स्कूलमध्ये शिक्षिका होत्या. आपल्या पतीचे प्रेम आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने नोकरी सोडण्याचा आणि सैन्यात सामील होण्याचा निर्णय घेतला.
कर्नल संतोष महाडिक कोण होते?
कर्नल महडिक (३९वर्षे) महाराष्ट्रातील सातारा येथील रहिवासी होते. ते ४१ राष्ट्रीय रायफल्सचे कमांडर होते. कर्नल संतोष २१ पॅरा विशेष कमांडो युनिटमध्ये होते आणि त्यांनी अनेक ऑपरेशन पूर्ण केली होती.
२०१५ मध्ये, कुपवाडायेथील हाजी नाका परिसरात दहशतवाद्यांशी लढताना तो गांभीररित्या जखमी झाले आणि नंतर उपचारादरम्यान शहीद झाले. उत्तर-पूर्व विभागातील २००३ मध्ये ऑपरेशन राइनोच्या काळात त्यांच्या शौर्यासाठी सैन्य शूरता पदक मिळविले होते.
Leave a Reply