बॉलीवूडमधील अनेक अभिनेत्यांना आणि अभिनेत्रींना मोठमोठ्या जीवघेण्या आजारांना सामोरं जावं लागत असल्याचे अनेक मोठमोठे उदाहरण समोर आहेत. मागील २ वर्षात अनेकांना कँसर सारख्या मोठ्या आजाराला सामोरं जावं लागलं. राजकुमार या अभिनेत्याला, अभिनेत्री नर्सिगला, अभिनेत्री मनिषा कोईराला, क्रिकेटपटू युवराज सिंग, लिसा रे, इरफान खान यांनाही कॅन्सर झाला.
जीवनशैलीमुळे अनेक आजारांचा सामना करावा लागतो. सेलेब्रिटी आपल्या फिटनेसची काळजी घेतात देखील. पण त्यांना अनेकदा आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. असंच काहीसं अभिनेत्री सुश्मिता सेनच्या बाबतीत घडलं होतं.
सुश्मिता सेन फिटनेसची अतिशय काळजी घेते. तिचे वर्कआऊटचे व्हिडीओ आणि फोटो अनेकदा समोर येतात. पण एकेकाळी सुश्मिता इतकी आजारी पडली होती की, जिवंत राहण्यासाठी दर आठ तासांनी तिला स्टेरॉइड घ्यावे लागायचे. तिने एका मुलाखतीत हा धक्कादायक खुलासा केला आहे.
२०१४ मध्ये सुश्मिता आजारी पडली होती. त्यावेळी ती आपल्या निरबाक या बंगाली चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त होती. नेमकंच शूटिंग पूर्ण झालं आणि ती अचानक आजारी पडली. तिचा आजारही गंभीर होता. एक दिवशी सुश्मिता अचानक बेशुद्ध झाली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथं काही तपासण्या केल्यानंतर समोर आलं कि अॅड्रेनल ग्लॅण्ड्स (Adrenal Glands) या ग्रंथींमधील कोर्टिसोल (Cortisol) नावाचे हार्मोन्स तयार होणे बंद झाले होते.
या आजारामुळे तिच्या शरीरातील अवयव हळूहळू निकामी होण्यास सुरुवात झाली होती. यातून वाचण्यासाठी तिच्यासमोर असलेला पर्याय देखील सोपा नव्हता. तिला दर आठ तासांनी hydrocortisone हे स्टेरॉइड घेण्यास सांगण्यात आले.
सुश्मिताने आजाराशी लढण्याचा निर्धार केला. ती उपचारासाठी लंडन जर्मनीला देखील गेली. योगसाधना केली आणि शरीरावर चांगलीच मेहनत घेतली. २०१६ मध्ये तिची तब्येत चांगलीच बिघडली होती.त्यावेळी अबूधाबीच्या एका रुग्णालयात दाखल केल्याचे तिने सांगितले. तिथे टेस्ट झाल्यानंतर तिला परत स्टायरोइड घेण्याची गरज नसल्याचे सांगण्यात आले.
ती आता या जीवघेण्या आजारातून बाहेर पडली होती. तिच्या शरीरात कोर्टिसोल बनणे सुरु झाले होते. कितीही गंभीर आजार असला तरी त्याच्याशी लढलं तर आपण बरे होऊ शकतो हे सुश्मिताने दाखवून दिले होते.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.