टीव्ही ते बॉलिवूड असा यशस्वी प्रवास करणारा अभिनेता सुशांत सिंग राजपूतने मुंबईत आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. प्राप्त माहितीनुसार, नोकराने फोन करून पोलिसांना घटनेची माहिती दिली. यानंतर पोलिस सुशांतच्या घरी पोहोचले आहेत. त्याच्या आत्महत्येच्या बातमीने बॉलिवूडमध्ये खळबळ माजली आहे.
३ दिवसा अगोदर त्याची मॅनेजर दिशा सलीन हिने देखील आत्महत्या केल्याची कळते. दिशा बॉलिवूडमध्ये पब्लिक रिलेशन मॅनेजर होती. सुशांत सिंग राजपूतशिवाय तिने रिहा चक्रवर्तीसह अनेक कलाकारांसोबत काम केले होते.मात्र निशाच्या मृत्यूने अनेकांना धक्काच बसला आहे. दिशाचा मृत्यू सुरुवातीला आत्महत्या असल्याचं सांगण्यात आलं होतं. गेल्या काही दिवसांपासून ती नैराश्यात होती. म्हणून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे चर्चा होती.
दिशाचा दारूच्या नशेत तोल गेला आणि तिचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. रोहित रॉय यांच्या घरी पार्टी सुरु असताना हि घटना झाली आहे. परंतु नक्की माहिती याची पुढे येऊ शकली नाही. दोघाचाही काही दिवसात मृत्यू होणे हे संशयास्पद आहे. लवकरच या संबंधित माहिती पुढे येणारच.