सुशांतच्या मृत्यूला महिना होऊन सुध्दा चर्चा काही थांबायचे नाव नाही घेत आहे. आता नवीन दावा अमेरिकन शास्त्रज्ञ स्टीव ह्फ्फ यांनी केला आहे. स्टीव ह्फ्फ हा प्रसिद्ध पैरानॉर्मल शास्त्रज्ञ आहे. त्याच्या म्हणण्यानुसार त्यांनी हा व्हिडीओ सुशांत सिंगच्या चाहत्यांनी त्याला शकडो कमेंट मेल केली त्यानंतर त्यांनी हा व्हिडीओ बनविला आहे. युट्युबवर त्यांनी हे दोन व्हिडीओ अपलोड केले आहे.
Huff Paranormal नावाने तो आपले युट्युब चैनल चालवतो त्यावर त्यांनी हा व्हिडीओ अपलोड केला आहे. या व्हिडीओ मध्ये स्टीव ह्फ्फ यांनी एक स्पिरीट बॉक्स तयार केला आहे ज्यामध्ये तो बाहेरच्या जगातील लोकांचे आवाज ऐकू शकतो. व्हिडीओ च्या सुरवातीला सुशांत सिंग यांच्या आवाज सारख्या आवाज आहे. स्टीव त्याला विचारतो ” टू प्रकाशात आहे का ?” त्यावर उत्तर येते कि “स्टीवला सांग मी प्रकाशात आहे” पुढे स्टीव बोलतो “काल रात्री तू प्रकाशात होता का ?” त्यावर उत्तर “हो मी मध्ये होतो”
पुढे स्टीव बोलतो कि “सुशांत मी तुला ओळखत नाही, परंतु तुझ्या चाहत्यांनी मला खूप विनंती केली त्यामुळे मी तुझ्या सोबत बोलत आहो, तुझे चाहते तुझ्यावर खूप प्रेम करतात” त्यानंतर तो त्याला विचारतो “तुला आठवते का तुझा मृत्यू कसा झाला ?” यावर स्पिरीट बॉक्स मधून उत्तर येते कि “ते सगळे वैद्यकीय कारणे दाखवतील”
त्यानंतर स्टीव ह्फ्फ यांनी दुसरा भाग देखील अपलोड केला आहे. त्यामध्ये स्टीव प्रश्न विचारतो कि “तूझा जेव्हा मृत्यू झाला त्या अगोदर काय झाले होते?” यावर उत्तर येते कि “मोठ्या माणसासोबत माझे भांडण झाले होते”
पुढे स्टीव विचारतो कि “तुला मारण्यात आले होते का ?” त्यावर उत्तर येते “त्यांनी खिळे आणले होते” असे अनेक खळबळजनक दावे या दोन्ही व्हिडीओ मध्ये करण्यात आले आहे. अनेकांच्या मते हे शक्य नाही. परंतु स्टीव ह्फ्फ दोन्ही व्हिडीओ मध्ये सांगतो कि हे काम तो मागील दहा वर्षापासून करत आहे. यामध्ये कुठलिही गोष्ट खोटी नाही आहे.
वर दिलेल्या व्हिडीओ मध्ये आपण दोन्ही भाग बघू शकता. आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.