मृत्यू आधी सुशांत सिंग राजपूतला करायच्या होत्या या ५० गोष्टी त्याने हि यादी सोशल मिडीयावर शेअर केली होती. टू डू लिस्ट म्हणून हि यादी स्वतः सुशांत सिंग याने प्रसिध्द करण्यात आली होती.
१) विमान उडवायला शिकायचे होते. २) आयरनमॅन ट्रायअथलॉन स्पर्धेसाठी प्रशिक्षण घ्यायचे होते. ३) डावखुऱ्या शैलीत क्रिकेट सामना खेळायचा होता. ४) मॉर्स कोड पद्धत शिकायची होती. ५) मुलांना अंतराळाबद्दल शिकण्यासाठी मदत करायची होती. ६) चॅम्पियनसोबत टेनिस खेळायचे होते. ७) पुशअप्स मारताना चार टाळ्या वाजवून दाखवायच्या होत्या. ८) एक आठवड्यासाठी चंद्र, मंगळ, गुरु आणि शनी यांच्या मार्गाचा टाकता बनवायचा होता. ९) सागरातील निळ्या गुहेत डायविंग करायचे होते. १०) फिजिक्समधील डबल स्लिट प्रयोग करायचा होता.
११) १००० झाडे लावायची होती. १२) माझ्या दिल्ली इंजिनिअरिंग कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये सायंकाळ घालवायची होती. १३) १०० मुलांना इसरो/नासाच्या कार्यशाळेसाठी पाठवायचे होते. १४) कैलास पर्वतावर ध्यानधारणा करायची होती. १५) चॅम्पियनसोबत पोकर गेम खेळायची होते. १६) पुस्तक लिहायचे होते. १७) युरोपियन न्यूक्लिअर रिसर्च ऑर्गनायझेशन संस्थेला भेट द्यायची होती. १८) अरोरा बोरिआलिस (पृथ्वीच्या ध्रुवांजवळ दिसणारा विविध रंगछटा असणारा पॅटर्न) रंगवायचा होता. १९) नासाच्या इतर कार्यशाळेत भाग घ्यायचा होता. २०) सहा महिन्यात सिक्स पॅक ऍब्स बनवायचे होते.
२१) सिनोट (भूमिगत जलकुंभ) मध्ये पोहायचे होते. २२) दृष्टिहीन लोकांना कोडिंग शिकवायचे होते. २३) जंगलामध्ये एक आठवडा घालवायचा होता. २४) वैदिक ज्योतिषशास्त्र शिकायचे होते. २५) डिज्नेलँड पार्कमध्ये जायचे होते. २६) लेझर इंटरफेरोमीटर गुरुत्वतरंग वेधशाळेला भेट द्यायची होती. २७) चार घोडे वाढवायचे होते. २८) किमान १० नृत्यप्रकार शिकायचे होते. २९) मोफत शिक्षणासाठी काम करायचे होते. ३०) एका शक्तिशाली दुर्बिणीच्या साहाय्याने देवयानी आकाशगंगेचा शोध घ्यायचा होता.
३१) क्रिया योगा शिकायचा होता. ३२) अंटार्क्टिकाला भेट द्यायची होती. ३३) महिलांना स्वसंरक्षण शिकवायचे होते. ३४) जिवंत ज्वालामुखीचे चित्रण करायचे होते. ३५) शेती कशी करायची हे शिकायचे होते. ३६) लहान मुलांना नृत्य शिकवायचे होते. ३७) दोन्ही हातांना कौशल्य असणारा धनुर्धारी बनायचे होते. ३८) रेझनिक -हॅलिडेचे भौतिकशास्त्राचे पुस्तक पूर्ण वाचून संपवायचे होते. ३९) पॅसिफिक महासागरातील पॉलिनेशियन लोकांचे ज्योतिषशास्त्र शिकायचे होते. ४०) माझ्या आवडीच्या ५० गाण्यांसाठी गिटारचे कॉर्ड्स शिकायचे होते.
४१) चॅम्पियनसोबत बुद्धिबळ खेळायचे होते. ४२) स्वतःची लॅम्बोर्गिनी गाडी घ्यायची होती. ४३) व्हिएन्नातील सेंट स्टीफन चर्चला भेट द्यायची होती. ४४) सायमॅटिक्स (तरंगशास्त्र)चे प्रयोग करायचे होते. ४५) भारतीय संरक्षण दलात जाण्यासाठी विद्यार्थ्यांना तयारी करण्यामध्ये मदत करायची होती.
४६) स्वामी विवेकानंद यांच्यावर डॉक्युमेंट्री बनवायची होती. ४७) लाटांवर स्वार व्हायला (सर्फिंग) शिकायचे होते. ४८) आर्टिफिशल इंटेलिजन्स आणि घातांकीय तंत्रज्ञान शिकायचे होते. ४९) कॅपोऐरा (आफ्रो-ब्राझिलियन मार्शल आर्ट) शिकायची होती. ५०) संपूर्ण युरोपात ट्रेनने फिरायचे होते.