अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्यावर सुशांत सिंग राजपूत यांचे वडील के के सिंग यांनी गंभीर आरोप लावले आहे. त्या संबंधित त्यांनी गुन्हा देखील नोंद केला आहे. सुशांत सिंग यांचा मृत्यू होऊन काळ लोटून गेला परंतु नेहमी नवीन माहिती आपल्या पुढे येत आहे. एका वर्षा अगोदर सुशांत सिंग यांच्या खात्यात १७ करोड रुपये होते त्यापैकी १५ करोड रियाने वेगवेगळ्या खात्यात वळविले असा आरोप देखील करण्यात येत आहे.
याच आरोपां विषयी इंडिया टुडे या चैनलला सुशांत सिंगचे सीए संदीप श्रीधर याच्या सोबत चर्चा करण्यात आली. मागील वर्षापासून ते सुशांत सिंग याचे खाते हाताळत होते. त्यांनी सांगितले आहे कि सुशांत आणि रिया यांच्या मध्ये फार मोठे व्यवहार नाही झाले आहे. एका सामान्य व्यक्ती प्रमाणे सुशांत सिंग यांचा खर्च होता. त्यांचा खर्च विदेश दौरा असताना होत असे.
त्यांना सुशांत सिंग याच्या खात्यात किती पैसे आहे ? हे विचारल्यावर त्यांनी सांगितले कि हा आकडा गोपनीय आहे. पोलिसाकडे सर्व कागदपत्र देण्यात आली आहे. ते या विषयावर लक्ष ठेऊन आहे. त्यांचा स्टेटमेंट मध्ये या गोष्टी आहे.
रियाच्या खात्यावर किती पैसे पाठविण्यात आले ? या प्रश्नावर संदीप सांगतात कि “ते दोघे सोबत राहत होते, तेव्हा खर्च त्या दोघाच्या संमतीने झाला आहे. परंतु मागील वर्षी मोठी रक्कम ट्रान्स्फर झालेली त्यांना दिसली नाही.” इंडिया टुडे च्या रिपोर्ट नुसार जानेवरी २०२० ते जून २०२० पर्यंत खालील प्रमाणे सुशांत सिंग यांच्या खात्यातून पैसे खर्च करण्यात आले होते.
2.78 करोड़ रुपये GST आणि इनकम टैक्ससाठी खर्च झाले, 61 लाख रुपए क्वान यांना पेमेंट करण्यात आले जी एक टैलेंट मैनेजमेंट कंपनी आहे. दोन करोड़ रुपए कोटेक महिंद्रा बैंक मध्ये टर्म डिपोज़िट स्वरुपात आहे. 60 लाख रुपए घरभाड्यात, 3.87 लाख रुपए एस्टेट एजेंट ला, 26.40 लाख रुपए लोनावळा फार्म हाउसचे रेंट, 4.87 लाख रुपए दोघे (रिया व सुशांत) फिरायला गेल्यावर खर्च झाले. 50 लाख रुपए परदेश टूर, 2.5 करोड़ रुपए असम व केरल टूरवर खर्च झाले व नऊ लाख रुपए मिलापला डोनेशन देण्यात आले.
विशेष गोष्ट हि आहे कि, सुशांत सिंग राजपूत यांचा सीए देखील रियाने ठेवला होता असे त्यांच्या वडिलाने मिडियाला सांगितले आहे. सुशांत आणि तिचे वाद झाल्यानंतर तिने सुशांत यांच्या घरून दागिने, लैपटॉप, पासवर्ड, क्रेडिट कार्ड, त्यांचे पिन नंबर,इलाजाचे सर्व कागदपत्रे घेऊन चालली गेली. त्यानंतर तिने सुशांतचा नंबर ब्लॉक केला.
आपल्याला वरील माहिती आवडल्यास अवश्य आमचे पेज लाईक करा व शेअर करायला विसरू नका.