जर तुम्हाला वाटत असेल की सुनील शेट्टी यांच्याकडे कुठलंच काम नाही,त्यांना सध्या कुठला चित्रपटही भेटत नाही म्हणून ते बाकीच्या अभिनेत्यापेक्षा कमी पैसे कमावतात. अस जर वाटत असेल तर तुम्ही चुकीचे आहात !
खरं तर अस काही नाही सुनील शेट्टी यांच्याकडे एवढे पैसे आहेत की त्यांना दुसरा अंबानी म्हंटल तरी वावगं ठरणार नाही. चला तर खासरेवर बघूया सुनील शेट्टी यांच्याकडे किती संपत्ती आहे आणि ती कुठून येते.
सुनील शेट्टी यांनी भारताचा अरनॉल्ड म्हंटल जात. त्यांचा अभिनय बाकीच्या अभिनेत्यापेक्षा वेगळा आहे. सुनील शेट्टी ने धाडकन, टक्कर, गोपी-किशन आणि मोहरा सारखे हिट सिनेमे दिलेत. त्यांनी जवळजवळ ११० चित्रपट केले आहेत. त्यांचं आजघडीला ५६ वय आहे. या व्यतिरिक्त त्यांनी मल्याळम, तामिळ आणि इंग्रजी चित्रपटात सुद्धा काम केलं आहे.
कधीकाळी त्यांचे वडील प्लेटा धुण्याच काम करत होते
एका इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी सांगितलं की त्यांचे वडील रेस्टॉरंट मध्ये प्लेटा साफ करण्याचं काम करत होते. आणि ज्या रेस्टॉरंटमध्ये त्यांचे वडील काम करत होते तेच रेस्टॉरंट सुनील शेट्टी यांनी २०१३ मध्ये विकत घेतले. हॉटेलच्या उदघाटन प्रसंगी त्यांनी सांगितलं होतं की, इथेच माझे काम करत होते.
बघा किती मोठा आहे त्यांचा व्यवसाय
पण ही गोष्ट खूप कमी लोकांना माहीत आहे की, ते एक चांगल्या अभिनेत्या व्यतिरिक्त एक यशस्वी उद्योगपती सुद्धा आहेत. व्यवसाया व्यतिरिक्त त्यांनी खेळांमधून सुद्धा बरेच पैसे कमावले आहेत. याचबरोबर त्यांनी सामाजिक काम सुद्धा करतात. आज जरी सुनील शेट्टी यांना कमी चित्रपट मिळतात पण ते दरवर्षी १०० कोटींपेक्षा जास्त कमावतात. सुनील शेट्टी रेस्टॉरंट व्यतिरिक्त पॉपकॉर्न एंटरटेनमेंट हे प्रोडक्शन हाऊस सुद्धा चालवतात.
खेळांना प्रोत्साहन देतात सुनील शेट्टी
चित्रपटांपासून दूर असलेले सुनील शेट्टी यांनी खेळावर आपल लक्ष केंद्रित केलं आहे.दुसऱ्या फिल्म स्टार्स सोबतच त्यांनी सुद्धा सेलिब्रेटी क्रिकेट लीग ची टीम विकत घेतली आहे आणि तेच स्वतः कॅप्टन आहेत.सुनील शेट्टी रेस्टॉरंट आणि प्रोडक्शन हाऊस व्यतिरिक्त बरेच व्यवसाय आहेत.सुनील शेट्टींनी बॉलिवूड बिझनेस कल्चरला एक नवीन रूप दिल आहे.त्यांच्याकडे बघून बऱ्याच सेलिब्रेटीनी स्वतःचा व्यवसाय चालू केला आहे.
लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
Leave a Reply