फ्रान्सकडून खरेदी करण्यात आलेल्या चर्चित ३६ राफेल विमानांपैकी पहिल्या ५ राफेल विमानांची तुकडी २९ जुलै २०२० रोजी भारतात पोहोच झाली आहे. हरियाणातील अंबाला हवाई तळावर या विमानांचे यशस्वी लँडिंग झाले आहे.
राफेलच्या आगमनाने तब्बल २२ वर्षानंतर प्रथमच देशाला नवीन लढाऊ विमाने मिळाली आहेत. आज भारताकडे असणाऱ्या राफेल आणि सुखोई लढाऊ विमानांची जोडी ही जगातील सर्वात खतरनाक कॉम्बिनेशन मानले जात आहे. पाहूया या जोडीची खासियत…
भारतीय वायुसेनेकडे किती लढाऊ विमाने आहेत ?
भारतात हवाई दलात तब्ब्ल १७२० विमाने असून त्यापैकी ९०० विमाने लढाऊ प्रकारातली आहेत. भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात असणाऱ्या सुखोई एसयु-30 एमकेआई, तेजस, मिराज 2000, मिग-29, मिग-21 आणि जॅग्वार या सहा लढाऊ विमानांच्या जोडीला आता सातवे राफेल विमान आल्याने वायुसेनेच्या ताकतीत चांगलीच वाढ झाली आहे. वायुसेनेकडे २७२ सुखोई, १७ तेजस, ४५ मिराज, ६५ मिग-29, ५४ मिग-21 आणि ११० जॅग्वार विमाने आहेत. त्यात ३६ राफेल विमानांची भर पडणार आहे.
भारताचे राफेल-सुखोई हे कॉम्बिनेशन जगातील सर्वात विध्वंसक का आहे ?
सुखोई : रशियन बनावटीचे सुखोई विमान सध्या भारतीय वायुसेनेकडे असणारे सर्वात घातक विमान आहे. सुखोईला डबल इंजिन असून उड्डाणावेळीच त्यात इंधन भरले जाते. तब्बल १२ टन युद्धसामग्री वाहून नेण्याची क्षमता असणारे सुखोई एका दमात ३००० किमी पर्यंत उड्डाण भरु शकते. लांबी, पल्ला आणि अण्वस्त्र वाहून नेण्याच्या क्षमतेबाबत सुखोई हे अमेरिकेच्या F-१६ पेक्षा ताकतवर आहे. यात असणाऱ्या सॅटेलाईट नेव्हीगेशनमुळे दिवस आणि रात्री अशा दोन्ही वेळी हे विमान काम करु शकते.
राफेल : राफेल हे देखील डबल इंजिन असणारे विमान असून कमीत कमी २८ आणि जास्तीत जास्त १९१५ किमी/तास इतक्या वेगाने ते धावू शकते. हवा आणि जमिनीवरुन हल्ला करण्यात राफेल सक्षम आहे. पाकिस्तान आणि चीनकडे असणाऱ्या F-१६ लढाऊ विमानांपेक्षा राफेल अत्यंत ताकतवर आहे.
२४.५ टन युद्धसामग्री वाहून नेण्याबरोबरच ३७०० किमी पर्यंत उड्डाण भरण्याची क्षमता राफेलला इतरांपेक्षा अधिक शक्तिशाली बनवते. अशा वैशिष्ट्यांमुळे राफेल-सुखोई हे जगातील सर्वात घातक कॉम्बिनेशन भारताकडे असणार आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.