१०x१० ची खोली ते १००० करोड रुपयाच्या कंपनीचे मालक हणमंतराव गायकवाड…

“मी ध्रुवावर जायचं पक्क केलं होतं. कसं? कधी? माहीत नव्हतं. खिशात पैसा नव्हता, पण जायचं होतं, हे निश्चित!” हे शब्द आहे स्वकर्तुत्वाने एका गरीब कुटुंबातून येऊन १००० कोटींच्या कंपनीचे मालक बनलेले प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व BVG ग्रुपचे सर्वेसर्वा हणमंतराव गायकवाड यांचे. छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद या दोन महान व्यक्तींना प्रेरणास्रोत मानणाऱ्या हणमंतराव गायकवाड यांचा आज पर्यंतचा प्रवास अविश्वसनीय आहे. हणमंतराव भारताच्या विकासाचा आदर्श चेहरा बनले आहेत. सर्व थरातील लहानमोठ्या लोकांमध्ये वावरणारे हणमंतराव गायकवाड यांचे राजकिय व्यक्ति, अध्यात्मिक गुरू, प्रशासकीय अधिकारी सर्वांशी अगदी सलोख्याचे संबंध आहेत. लोकांचा विचार करत गेलं की अपोआप पैसा मिळतो. कोणाचं वाईट चिंतायच नाही, कोणाला फॉलो करायचं नाही, कोणाशी स्पर्धा करायची नाही हा मूलमंत्र घेऊन हणमंतराव आजपर्यंत यशस्वी वाटचाल करत आले आहेत. कौतुक करावं तेवढं कमीच आहे आहे, या माणसाचं! संसद भवन, राष्ट्रपती भवन, पंतप्रधान निवासस्थान, सुप्रीम कोर्ट अशा सर्वचं ठिकाणी त्यांची ‘माणसं’ काम करतात, असे साताऱ्याचे सुपुत्र BVG चे हणमंतराव गायकवाड यांची प्रेरणादायी कहाणी आज आपण बघणार आहोत खासरेवर-

हणमंतरावांचा जन्म आणि शिक्षण-

हणमंतरावांचा जन्म सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर या गावी झाला. अत्यंत गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील सातारच्या न्यायालयात क्लार्क म्हणून नोकरी करायचे. आई-वडील भाऊ असे छोटे कुटुंब एका १०×१० च्या भाड्याच्या खोलीत राहायचे. अत्यंत हलाखीचे जीवन ते जगायचे. त्यांच्या राहत्या खोलीत अक्षरशः लाईट सुद्धा नसायची. हणमंतरावांना लहानपणापासून अभसाची प्रचंड आवड होती. गणितासारख्या अवघड विषयात ते पैकीच्या पैकी गुण मिळवत असत. पुढे त्यांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून वडिलांनी साताऱ्याला जायचं ठरवलं. चौथीमध्ये असताना त्यांना राज्यसरकारची शिष्यवृत्ती मिळाली. या शिष्यवृत्तीमूळे त्यांचा आत्मविश्वास बळावला. एकट्या वडिलांच्या पगारावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असे. घरच्या नाजूक परिस्थितीमुळे त्यांनी लहनपणीपासूनच खूप संघर्ष केला. त्यांनी अगदी रेल्वे स्टेशनवर आंबे विकण्यापासून ते अनेक कामं केली आहेत. वडिलांनी पुढे त्यांना शिक्षणासाठी पुण्याला आणलं. वडीलांना जिल्हा परिषदमध्ये नोकरी मिळाली. आईला सुद्धा शिक्षकेची नोकरी मिळाली. त्यातच त्यांच्या वडिलांना आजारांनी ग्रासले. हणमंतरावांच पुढील शिक्षण मॉडर्न हायस्कुलला झालं. त्यांना दहावीत चांगले मार्क्स मिळाले. पुढे त्यांनी गव्हरमेन्ट पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये डिप्लोमा ला प्रवेश घेतला. याच काळात त्यांचे वडील गेले. त्यावेळी त्यांचे वय अवघे १८ वर्षे होते. त्यांना इंजिनिअर बनायचं होतं. व्हीआयटी कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला व आपले शिक्षण पूर्ण केले.

कसा सुरू झाला बिव्हिजीचा प्रवास-

वडील वारल्यानंतर त्यांना थोडीशी विरक्ती आली. वडील गेल्यानंतर त्यांनी ठरवलं की काही तरी वेगळं, इतरांसाठी करायचं. त्यांनी ‘भारत विकास प्रतिष्ठान’ (बिव्हीजी) या नावाची संस्था स्थापन केली. त्या माध्यमातून दानशूर लोकांकडून देणग्या घेऊन गरीब मुलांना शिक्षणासाठी मदत करणं सुरू केलं. शिक्षण सुरू असतानाच क्लास घेणे, सॉस जॅमच्या बाटल्या विकणे, घरे रंगवून देणे अशी कामं हणमंतरावांनी सुरू केली. कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी हे सर्व कामे सुरू केली होती. तेव्हा बालेवाडीच्या शिवछत्रपती स्टेडियमचं काम सुरू होतं. एका एजन्सीकडे सिव्हीलची कामं होती. त्यांचं शिक्षण त्यावेळी इलेक्ट्रिकलचे चालू होते आणि ते काम होतं सिव्हिल- काँक्रिटचा रस्ता करण्याचं. हणमंतरावाना त्यावेळी घर बांधण्याचा थोडा अनुभव होता. त्यांनी ते काम ७ दिवसाचं काम पाचच दिवसात पूर्ण करून दिले. मजुरांचा तुटवडा जाणवत होता म्हणून त्यांनी जास्त पैसे देऊन मजूर ठेवले. त्याच दरम्यान जडत पाऊस झाला व तो रस्ता वाहून गेला. त्यांच्याकडून रास्ता लेव्हल न करण्याची चूक झालीये हे त्यांच्या लक्षात आले होते. त्यावेळी मजूर त्यांच्या मदतीला धावून आले व तो रस्ता पुन्हा बनवला. आणि नंतर त्यांना पैसे मिळाले. १९९४ मध्ये त्यांना बिटेकची पदवी मिळाली. टेल्को मध्ये ७ हजार महिन्याची नोकरी त्यांना मिळाली. तिथे नोकरी करत असताना त्यांची घरं रंगवून द्यायची कामं सुरूच होती.

दरम्यान त्यांच्या गावाकडील मुलं कामाच्या आशेने त्यांच्याकडे येत होती. पण ते नोकरी करत असल्याने त्यांना कामाचे कंत्राट घेण्यास अडथळे येत होते. मग त्यांनी भारत विकास प्रतिष्ठान द्वारे कामं घेण्यास सुरुवात केली. १९९७ मध्ये त्यांनी प्रतिष्ठान तर्फे एक हाऊसकिपिंगच काम घेतलं. इंडीका गाडीचा प्रकल्प त्या दरम्यान उभा राहत होता. तो स्वच्छ ठेवण्याचं काम त्यांच्या भारत विकास प्रतिष्ठानने घेतले. त्यानंतर मात्र त्यांनी मागे वळून बघितलेच नाही. त्यांना यामध्ये उमेश माने या मित्राची साथ मिळाली. कंत्राट मिळवणे हे त्यांचे काम असायचे तर ते करून घेणे उमेश यांची जबाबदारी असायची. त्यांच्या प्रतिष्ठानची पहिल्या वर्षाची उलाढाल ८ लाख होतीपुढच्याच वर्षी ती ५६ लाखावर पोहचली. गुणवत्ता, प्रामाणिकपणा, विश्वास आणि वेळेच्या आधी पूर्ण होणारं काम यामुळे त्यांच्या भारत विकास प्रतिष्ठानला खूप प्रसिध्दी मिळत गेली. पुढे त्यांना चेन्नई हैदराबाद अशा इतर शहरामध्ये कामं मिळाली. रेल्वे स्थानक, विमानतळ, रुग्णालयाच्या स्वच्छतेचे कामं त्यांनी घेतली.

१९९७ मध्ये पाहिलं कंत्राट मिळालं तेव्हाच त्यांनी स्वप्न पाहिलं होतं की आपल्याला जर संसदेचे काम मिळाले तर? बिव्हीजी चे नाव वाढतच गेलं. त्यांना संसदेच्या ग्रंथालायच कंत्राट मिळालं. त्यांच्या कामावर खुश होऊन पुढे त्यांना लोकसभा आणि राज्यसभेच्या स्वच्छतेची कामं मिळाली. पण सुरक्षेच्या कारणास्तव आत प्रवेश मिळाला नाही. पण बाहेरचा परिसर स्वच्छ पाहून त्यांना सभापतींनी आत परवानगी दिली. मग पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रपती भवन, सर्वोच्च न्यायालय.. दिल्लीतल्या प्रत्येक महत्वाच्या ठिकाणी बिव्हीजीची सेवा मिळू लागली. आज एकट्या दिल्लीत बिव्हीजीचे नऊ हजार कर्मचारी काम करतात. ऑगस्ट २०१६ मध्येकंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या होती ६५ हजार. भारत विकास ग्रुपने आता परदेशातही विस्तार करण्यास सुरुवात केली आहे. भारत विकास ग्रुप देशातील २० राज्यांमध्ये ८०० हुन अधिक ठिकाणी आपली सेवा प्रदान करत आहे. टाटा समूह, हिंदुस्तान लिव्हर, फॉक्सवॅगन सारख्या आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट कंपन्यांना सुद्धा ते हाऊसकिपिंग ची सेवा देतात. लँडस्केप गार्डनिंग, टेक्निकल सर्व्हिसेस, सुरक्षा सेवा, औद्योगिक सेवा, सोलर पार्क, एलईडी लायटिंग, सोलर पंप, प्लॅस्टिकपासून इंधन, फूड पार्क आशा अनेक क्षेत्रात बिव्हीजी सध्या जम बसवत आहे. बिव्हीजीने नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन सोबत भागीदारी केली आहे. त्याद्वारे त्यांनी विविध व्याधींवरील चहा, आरोग्यदायी उत्पादने, शेळीचे दूध, उंटणीचे दूध, जैविक खते, जैविक कीटकनाशके अशा अनेक उत्पादनामध्ये प्रवेश केला आहे.

सामाजिक कार्याची आवड-

हणमंतराव गायकवाड यांना सामाजिक कार्याची सुद्धा प्रचंड आवड आहे. त्यांच्या सामाजिक कामासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यांना २०११ मध्ये लोकमतचा महाराष्ट्रीयन ऑफ द इयर हा अवार्ड मिळाला. त्यांच्या कार्याबद्दल त्यांचा रश्मी बन्सल यांच्या कनेक्ट द डॉट्स या पुस्तकात सुद्धा उल्लेख करण्यात आला आहे. १ जुलै २०१६ ला त्यांना एबीपी माझा कडून एबीपी माझा सन्मान पुरस्कार मिळाला. त्यांच्या बिव्हीजी ग्रुपकडून महाराष्ट्रात आतापर्यंत ७५० अंबुलन्स दिल्या आहेत. १७००० डिलिव्हरी त्यांच्या अंबुलन्स मध्ये झाल्या आहेत. मध्यप्रदेश पोलिसांना २५० वाहने, आंध्रप्रदेश सरकारला ५०० गाड्या त्यांनी दिल्या आहेत.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
आईने मजुरी केली तेच शेत विकत घेणारा उद्योजक…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.