जाणून घ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर परखड मत मांडणारा छोटा पुढारी घनश्याम दरोडे विषयी

घनश्याम दत्तात्रय दरोडे वय वर्षे तेरा-चौदा. वय ऐकल्यावर तुमच्या मनात विचार येईल एखाद्या छोट्या खेळणारा बागडणाऱ्या मुलांबाबत. साहजिकच आहे प्रत्येक जण या वयाच्या मुलाबद्दल हाच विचार करू शकतो. पण घनश्याम च्या बाबतीत हे खोटं ठरतं. तो महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात चर्चेचा विषय बनला आहे. कारणही तसेच आहे, अवघ्या चौदा वर्षाचा हा वामनमूर्ती छोटा मुलगा आपल्या वक्तृत्व कौशल्याने चर्चेत आला आहे. छोटा घनश्याम आपल्या शाब्दीक बाणांनी सरकारसह अनेकांना घायाळ करत आहे. त्याची भाषणाची कला भल्याभल्यांना भुरळ घालणारी आहे. त्याचे भाषण सध्या सोशल मीडियावर चांगलेच वायरल झाले आहेत.

Chota pudhari

श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी लोणार या गावातील दत्तात्रेय दरोडे यांचा घनश्याम हा एकुलता एक मुलगा. घनश्याम सध्या नवव्या इयत्तेत शिक्षण घेत आहे. घनश्याम ला एक बहीण ही आहे. घनश्याम चा जन्म एका शेतकरी कुटुंबात झालेला आहे. घनश्याम चे वडील दत्तात्रय दरोडे परंपरागत शेती करतात. घनश्याम च्या घरची परिस्थिती तशी बेतातीच आहे. परिस्थितीमूळे घनश्याम ने घारगावच्या( ता. शिगोंदा) आश्रम शाळेतही शिक्षण घेतले आहे.

Ghanshyam

गावातील राजकारणापासून ते तालुका राज्यातील परिस्थितीवर जेव्हा तो बोलतो तेव्हा त्याच्या शाब्दिक फटकाऱ्यांनी अनेक जण निरुत्तर होतात. वीज, पाणी, शेती, सहकार, बाजारभाव, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, दुष्काळावर उपाय आदी अनेक प्रश्नावर त्याने एकदा बोलायला चालू केलं की भल्याभल्यांना तो घाम फोडू शकतो. सर्व प्रश्नांवर तो खूप बेधडकपणे बोलतो. मागे 2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या काळात त्याच्या भाषणाची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर चांगलीच वायरल झाल्याने घनश्याम चांगलाच प्रसिद्धीच्या झोतात आला होता. त्यातच अनेक इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी त्याच्या मुलाखती प्रसिद्ध केल्याने घनश्याम रातोरात स्टार बनला.

Ghanshyam Darode

घनश्यामने 2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राहुल जगताप यांचा प्रचार केला होता. माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या विरोधात प्रचारा दरम्यान घनश्याम च्या भाषणांना टाळ्यांचा अक्षरशा पाउस पडला होता. या निवडणुकीत पाचपुते यांचा पराभव झाला होता तर जगताप आमदार बनले होते.

घनश्यामला व्हायचे आहे कलेक्टर-

राज्यात आणि केंद्रात सत्ता बदलून सुद्धा शेतकऱ्यांची जैसे थे परिस्थिती असल्याची खंत एका मुलाखतीदरम्यान व्यक्त केली. आपण कोणी राजकीय पुढारी किंवा नेते नसल्याचे घनश्याम सांगतो. पण घनश्याम ला कलेक्टर बनून व्यवस्थेत बदल घडवण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. व्यवस्थेत बदल करणे तसं एकट्याचे काम नसल्याचे घनश्याम सांगतो पण एक घटक बनून तो यासाठी प्रयत्न करणार आहे. घनश्याम ने कलेक्टर होण्याचा चंग बांधला आहे. न तो होणारच असे तो ठामपणे सांगतो.

Small Ghanshyam

70% शेतकरी आज आत्महत्या करतात याचे कारण सरकार असल्याचे तो सांगतो. पाणी नाही, वीज गायब, पिकांवर पडणार रोग यातून शेतकऱ्यांच्या हातात काहीच पडत नाही. सरकारने सर्वसामान्यांचे प्रश्न गांभीर्याने सोडवले पाहिजे असे त्याचे मत आहे.

व्हिडिओ झाला आहे प्रचंड वायरल-

सध्या इंटरनेटवर घनश्याम चा व्हिडीओ प्रचंड वायरल होत आहे. ज्यामध्ये घनश्याम बोलतो कि, ‘शेतमालाला बाजार राहिला नाही, शेतकरी जास्त चेंगरून मेले आहेत. ATM च्या दारांमध्ये फुकट शेतकऱ्यांचा बळी गेला. सरकार नुसतं म्हणतंय कर्जमाफी देऊ कर्जमाफी देऊ, कुठेय कर्जमाफी. नुसते म्हणतंय अभ्यास चालू ये अभ्यास चालू ये, अरे अश्या कुठल्या गुरुजी कडे क्लास लावलेत तुम्ही. कर्जमाफी चे अर्ज भरू भरू आमच्या शेतकऱ्याचे गुडघे थकलेत पार. अरे कुठे गेला काळा पैसा, काळा पैसा बाहेर येणार होता. मोदींसाहेब म्हणाले आम्हाला 3 महिने द्या. बर ठीक ये नका का येईना काळा पैसा पण अजून मालाला हमीभाव कसा काय येईनात. अजून कर्ज माफ कसा काय होईनात…’
घनश्यामच्या तीव्र भावना या व्हिडिओ मध्ये बघायला मिळत आहे.

खासरे कडून घनश्याम दरोडेच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
वाचा: फक्त चहा विकणारे मोदीच नाही तरअतिशय गरीब कुटुंबात जन्‍मलेले झाले आहेत पीएम-सीएम…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.