शाहरुख खान-गौरीच्या लग्नानंतर मुंबईत पहिल्याच रात्री हेमा मालिनीमुळे अशी आली अडचण

शाहरुख खान आणि गौरीच्या लव्हस्टोरीबद्दल तुम्ही बरेच वाचले असेल. आज आम्ही आपल्याला त्यांच्या लग्नाच्या पहिल्या रात्री घडलेला किस्सा सांगणार आहोत, ज्याबद्दल खूप कमी लोकांनाच माहिती आहे. होय, शाहरुख आणि गौरीच्या लग्नानंतर मुंबईतील त्यांची पहिलीच रात्री अत्यंत वाईट गेली, परंतु हीच घटना शाहरुखला त्याच्या सुपरस्टार पर्यंतचा प्रवास पूर्ण करण्यासाठी अत्यंत उपयोगी पडली.

चित्रपटात येण्यापूर्वी शाहरुखला केवळ त्याच्या करिअरमध्येच नाही, तर वैयक्तिक आयुष्यातही खूप संघर्ष करावा लागला होता. अनेक अडचणींचा सामना केल्यानंतर शेवटी शाहरुख जिला मिळवण्यासाठी प्रयत्न करत होता, ती गौरी त्याच्या आयुष्यात आली.

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये नशीब आजमावण्यासाठी धडपड करणाऱ्या शाहरुखचे गौरीवरील प्रेम कुटुंबापासून जास्त लपून राहिले नाही आणि त्यांनी या लग्नाला संमती दिली. शाहरुखच्या आयुष्यातील हा असा क्षण होता, ज्याची तो बर्‍याच वर्षांपासून वाट पाहत होता. दोघांचे लग्न झाले.

सांगितले जाते की लग्नानंतर लगेचच त्यांना मुंबई गाठावी लागली आणि दोघे एका हॉटेलात मुक्कामासाठी थांबले. त्यावेळी शाहरुखच्या मनामध्ये काहीतरी विचार आला आणि त्याने हेमा मालिनीला फोन करून आपण मुंबईत असल्याचे सांगितले. त्यावेळी शाहरुख हेमा मालिनी निर्मित “दिल आशना है” चित्रपटाचे शूटिंग करीत होता.

शाहरुख मुंबईत असल्याची बातमी समजताच हेमाने त्याला लगेचच आपल्या चित्रपटाच्या सेटवर बोलावलं आणि सांगितले की जर धर्मेंद्रजी सेटवर येणार आहेत, त्यांचीही भेट घे. हे ऐकून शाहरुख गौरीसमवेत सेटवर पोहोचला. दोघेही एका खोलीत बसून धर्मेंद्रची वाट बघत बसले.

धर्मेद्रजींना भेटायचे म्हणून गौरी पूर्णपणे नटूनथटून हातात बांगड्या घालून बसली होती. परंतु काहीवेळाने त्यांना समजले की, समजले की धर्मेंद्रला यायला वेळ लागेल. मग गौरीला तसेच खोलीत सोडून शाहरुख त्याच्या शूटिंगसाठी निघून गेला.

शाहरुख सकाळी ६ वाजेपर्यंत शूटिंग करत राहिला आणि गौरी त्या डास चावत असलेल्या खोलीत खुर्चीवरच झोपी गेली. शाहरुखला अपमानित झाल्यासारखं वाटलं आणि त्यादिवशी तो खूप रडला. या घटनेने शाहरुखच्या कारकीर्दीला मोठे वळण मिळाले.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.