२४ फेब्रुवावरी २०१८ यादिवशी अभिनेत्री श्रीदेवी हे जग ओडून गेली. केवळ भारतातच नव्हे तर भारताबाहेरही तिचे चाहते होते. सिंगापूरच्या मॅडम तुसाद म्युझियमने श्रीदेवीचा एक मेणाचा पुतळा बनविला आहे.
हा पुतळा इतक्या सुंदर पद्धतीने बनविला गेला आहे की असे वाटते स्वतः श्रीदेवी आपल्या समोर उभी आहे. नुकतेच त्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी बोनी कपूर, जान्हवी कपूर आणि ख़ुशी कपूर हे श्रीदेवीचे कुटुंब सिंगापूरमध्ये दाखल झाले होते.
अनावरणाचा पडदा हटताच कुटुंब झाले भावुक
मॅडम तुसाद संग्रहालयातील श्रीदेवीच्या पुतळ्याचे अनावरण सुरु झाले. अनावरणाचा पडदा हतला. समोर श्रीदेवीचा पुतळा पाहून संपूर्ण कुटुंब भावूक झाले. श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर तिच्या आईकडे एकटक पाहतच राहिली. जान्हवी कधी त्या पुतळ्याला हात लावून बघायची, तर कधी नुसते उभे राहून पुतळ्याकडे टक लावून बघायची.
संपूर्ण कुटुंबाच्या म्हणजेच जान्हवी, खुशी आणि बोनी कपूर यांच्या चेहर्यावर निराशा स्पष्टपणे जाणवत होती. तिघेही भावूक झाले होते. हा क्षण इतका नाजूक होता की त्यावर बोलताना बोनी कपूरच्या डोळ्यात अक्षरशः अश्रू आले.
संबंधित व्हिडिओ पहा :
I could practically hear the heartbreak in #boneykapoor ‘s voice. Such tremendous love he had for #Sridevi ❤️? pic.twitter.com/5lnXrTvUj4
— ? (@allthatisshals) September 4, 2019
कसा आहे श्रीदेवीचा मॅडम तुसाद संग्रहालयातील पुतळा ?
हा पुतळा बनविण्यासाठी २० कलाकारांना ५ महिन्यांहून अधिक कालावधी लागला. याप्रसंगी श्रीदेवीचा पुतळा तयार करताना कारागिरांनी किती बारकाव्याने तिच्या बोटांची नखे सजविली, ड्रेस तयार केला याबद्दलचा व्हिडीओ बोनी कपूरने शेअर केला आहे.
श्रीदेवीच्या “मिस्टर इंडिया” चित्रपटातील “हवा-हवाई” गाण्यात तिने घातलेला ड्रेस तुम्हाला आठवत असेल. हुबेहूब तसाच ड्रेस, तोच लुक, त्याच प्रकारचा सोन्या रंगाचा “ताज” श्रीदेवीचा पुतळा बनवण्यासाठी मॅडम तुसाद म्युझियमने निवडला आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.