SPG बद्दल थोडक्यात माहिती
Special Protection Group (SPG) म्हणजेच विशेष सुरक्षा दल हे भारतातील सर्वात प्रशिक्षित आणि अत्याधुनिक साधनांनी सज्ज सुरक्षा दल आहे. SPG मधील जवानांना सर्वात बहादूर मानले जाते. माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधींच्या हत्येनंतर २ जून १९८८ संसदेने SPG ची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. SPG केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत काम करते. त्याचे मुख्यालय दिल्लीमध्ये स्थित आहे. ते केंद्रीय सुरक्षा दलाचे महत्वाचे एक अंग आहे.
असे आहे भारताचे विशेष सुरक्षा दल
SPG मधील जवानांची निवड BSF, CISF, ITBP, CRPF यामधून केली जाते. त्यांच्याकडे FNF-2000 सारख्या स्वयंचलित गन असतात. कमांडोकडे ग्लोक-१७ नावाचा एक पिस्तूल असतो. SPG चे जवान स्वतःच्या सुरक्षेसाठी बुलेटप्रूफ जाकीट वापरतात. त्यांच्या डोळ्यांवर एक विशेष चष्मा असतो. आपल्या सहकारी जवानासोबत बोलण्यासाठी ते कानात इअरफोन किंवा वॉकीटॉकीचा वापर करतात.
त्यांचे शूजदेखील जमिनीवर घसरणार नाहीत अशा खास पद्धतीने बनवलले असतात. त्यांच्या हातात खास प्रकारचे मोजे असतात, जे हाताला दुखापत होण्यापासून वाचवतात. भारतात ३००० हुन अधिक SPG जवान आहेत.
भारतात ही सुरक्षा कुणाला दिली जाते ?
भारतीय प्रधानमंत्र्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेची जबाबदारी SPG च्या जवानांवर असते. त्याशिवाय माजी प्रधानमंत्री आणि त्यांच्या कुटुंबियांना ही काही कालावधीसाठी सुरक्षा दिली जाते. सुरुवातीला प्रधानमंत्री पद सोडल्यानंतर एक वर्षासाठी मिळणारी ही सुविधा राजीव गांधींच्या मृत्यूनंतर दहा वर्षे करण्यात आली होती.
अटलबिहारी वाजपेयींनी त्यात घट करून ती एका वर्षांची केली आणि दरवर्षी आढावा घेऊन त्यात वाढ करण्याची व्यवस्था केली. पण याच वाजपेयींना २००४ पासून २०१८ पर्यंत SPG सुरक्षा होती हा भाग वेगळा.
सध्या या चार लोकांनाच मिळणार SPG सुरक्षा
नुकतीच मनमोहनसिंग यांची SPG यांची सुरक्षा कमी करून Z+ करण्यात आली आहे. त्यामुळे भारत आता चारच लोकांना ही सुरक्षा मिळणार आहे. त्यामध्ये भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, काँग्रेस हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वडेरा यांचा समावेश आहे. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर गांधी कुटुंबातील तीन लोकांना ही सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.