रणरणत्या उन्हात घरातून बाहेर पडायचा विचार जरी मनात आला तरी आपल्याला घाम फुटतो. तुम्ही जर मराठवाडा विदर्भात राहत असाल तर मग बोलायलाच नको. बाहेरच्याउन्हातून घरात आले की, आपल्याला एसीचा थंडावा घेण्याची इच्छा होते. पण समजा बाहेरच्या रणरणत्या उन्हातही तुम्हाला एसीचा थंड अनुभव घेता आला तर कसे राहील ?
आपल्याला अशीच काहीतरी भेट देण्याचा शास्त्रज्ञ विचार करत आहेत. शास्त्रज्ञांनी असे एक उपकरण तयार केले आहे, जे तुम्हाला कडक उन्हातही गारवा देईल. डिझाइनर या उपकरणाला “मिनी एसी” म्हणतात, जे तीव्र उन्हातदेखील शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यास मदत करेल.
कसा आहे हा मिनी एसी ?
हा मिनी एअर कंडिशनर लिथियम बॅटरीवर कार्य करते. त्याची बॅटरी दोन तासात चार्ज होते आणि सुमारे ३ तासांचा पॉवर बॅकअप देते. स्मार्टफोन प्रमाणेच दिसणाऱ्या या उपकरणासोबत एक टीशर्ट सुद्धा लाँच करण्यात आला आहे.
त्या टीशर्टच्या मानेच्या पाठीमागे एक छोटा खिसा देण्यात आला आहे. हे उपकरण त्या खिशात ठेवून तुम्ही आरामात उन्हात बाहेर पडू शकता. हे उपकरण ब्लूटूथद्वारे स्मार्टफोनशी कनेक्ट करता येते. आपल्या स्मार्टफोनमधील एका ऍप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही हा मिनी एसी ऑपरेट करू शकता.
किती आहे किंमत ?
पुरुषांसाठी SONY कंपनीने खास तयार केलेल्या या मिनी एसीची किंमत अंदाजे ९००० रुपये आहे आणि आपल्याला हे उपकरण जवळपास सर्व आकारांमध्ये उपलब्ध होईल. हे तंत्रज्ञान यापूर्वी कारमध्येही वापरण्यात आले आहार. तिथूनच कंपनीला या चालत्या फिरत्या एसीची कल्पना सुचली.
बर्याचदा लोक घरात एसी बसविण्यास घाबरत असतात कारण त्यांना असे वाटते की यामुळे विजेचे बिल बरेच जास्त येईल, परंतु आपल्याला हे उपकरण चार्ज करण्यात जास्त खर्च करावा लागणार नाही आणि एसीचा आनंद घेण्यासही ते सक्षम असतील. सध्या हा टी-शर्ट केवळ जपानमध्ये उपलब्ध आहे. अमेझॉन वरुन तो खरेदी करता येईल.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.