‘कौन बनेग करोडपती 11’ कार्यक्रमात एका सोप्या प्रश्नासाठी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला लाईफलाईन घ्यावी लागल्याने ती ट्रोल होत आहे. सोनाक्षी एका स्पेशल एपिसोडमध्ये रुमा देवी यांना सोबत देण्यासाठी आली होती. परंतु या कार्यक्रमात एका प्रश्नामुळे सोनाक्षी चांगलीच ट्रोल झालेली आहे.
रुपा देवी यांचे शिक्षण आठवीपर्यंत झाले आहे. त्यामुळे त्यांना इतर स्पर्धकांपेक्षा केबीसीमध्ये खेळणे थोडे कठिण झाले होते. म्हणून या स्पर्धेसाठी त्यांनी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाची पार्टनर म्हणून निवड केली. सोनाक्षीने अमिताभ यांनी विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे देत रुपा यांची मदत केली. मात्र अमिताभ यांनी विचारलेल्या रामायणातील प्रश्वाचे उत्तर सोनाक्षीने पटकन दिले नसल्यामुळे नेटकऱ्यांनी तिची फिरकी घेतली आहे.
रामायणात हनुमानाने संजीवनी बुटी कुणासाठी आणली होती? असा प्रश्न अमिताभ बच्चन यांनी सोनाक्षीला विचारला. त्यासाठी A. सुग्रीव B. लक्ष्मण C. सीता D. राम असे चार पर्याय देण्यात आले होते. मात्र पर्याय पाहूनही सोनाक्षी या प्रश्नाचं उत्तर देऊ शकली नाही. त्यावेळी तिने खेळाच्या नियमानुसार लाईफलाईन वापरण्याचा निर्णय घेतला. सोनाक्षीने तज्ज्ञांचा सल्ला घेत योग्य उत्तर दिलं. त्यावेळी अमिताभ बच्चनही थोडे आश्चर्यचकित झाले होते.
सोनाक्षी आणि रामायणाचा आहे असा संबंध
सोनाक्षीला दोन भाऊ आहेत आणि त्यांची नाव रामायणातील आहे. लव आणि कुश हे तिच्या भावाचे नाव आहे. लव आणि कुश प्रभू श्रीराम चंद्राची अपत्य आणि सोनाक्षीचे वडील शत्रुघ्न सिन्हा यांचे नाव देखील रामायणातील पात्राचे आहे. शत्रुघ्न हे प्रभू रामचंद्राचे भाऊ आहेत. काकांची नावं लक्ष्मण, भरत हे आहेत. अशावेळी रामायणाशी संबंधित अगदी सोप्या प्रश्नाचं उत्तर सोनाक्षीला आलं नाही, याचं सर्वांना आश्चर्य वाटत आहे.
सोनाक्षीला ट्रोल करत नेटकऱ्यांनी ‘अनन्या पांडे आणि आलिया भट्टला आणखी एक टक्कर’, ‘आत्ताच्या स्टार किड्सना आपल्या संस्कृतीची माहिती नाही’ असे म्हटले आहे.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता.