सर्पदंश झाल्यावर करायचा प्रथोमपचार… साप विषारी किंवा बिनविषारी कसे ओळखावे…

भारतात बिनविषारी सापांची संख्या जास्त आहे, मात्र सर्प दंश झाल्यानंतर अनेकवेळा रूग्ण दगावतात, प्रथमोपचार न केल्याने रूग्ण दगावतात असं म्हटलं जातं, अनेक ठिकाणी सर्प दंशावर औषधी उपलब्ध नसल्यानेही रूग्ण दगावतो. मात्र सर्प दंश झाल्यावर सर्वात महत्वाचं आहे ते रूग्णाने धीर धरणे, अनेक वेळा भीतीनेच रूग्ण दगावतात.

आवळपट्टी विषाचा प्रभाव रोखते

सर्पदंश झाल्यावर त्या जागी प्रचंड वेदना सुरू होतात. सर्प विषारी असेल तर त्याच्या दोन दातांचा चावा चटकन लक्षात येतो. सर्प बिनविषारी असेल अर्धलंबवर्तुळाकार दातांच्या पंक्ती दिसतात.

सर्प विषारी असो अगर बिनविषारी, वेदना प्रचंड असतात. अशा वेळी घाबरून न जाता ज्या ठिकाणी दंश झाला असेल त्या ठिकाणापासून साधारण तीन ते चार इंच अंतरावर आवळपट्टी बांधावी.

घरात असलेली रिबिन, कपड्याची पट्टी, दोरी यापैकी कशाचाही त्यासाठी उपयोग करता येतो. घट्ट आवळून बांधल्यामुळे विष शरीरात पसरण्यापासून रोखले जाते आणि वैद्यकीय उपचारांसाठी वेळ मिळतो. त्यामुळे पहिले काम आवळपट्टी बांधण्याचे केले पाहिजे.

नव्या ब्लेडने चिरा मारणे

ज्या ठिकाणी सर्पदंश झाला असेल त्या ठिकाणी नव्या ब्लेडने किंवा कोणत्याही स्वच्छ धारदार वस्तूने किमान दोन चिरा माराव्यात. लक्षात ठेवा चिरा जास्त खोल मारू नका नाहीतर विष आणखी शरीराच्या खोल उतरण्याचा धोका वाढतो.

चिरा मारल्याने रक्त आणि त्याबरोबर सापाचे विषही बाहेर निघते. अनेकदा दंश करणारा सर्प विषारी असेल तर दंश झालेले बोट तोडले तरी परवडते. कारण त्यामुळे प्राण वाचू शकतात. चिरा मारल्यामुळे होणारी जखम काही दिवसांत बरी होते; पण त्यामुळे व्यक्ती वाचण्याची शक्यता वाढते.

वाचा रात्रीची झोप पुर्ण होत नसेल तर होऊ शकतात हे आजार…

हे प्राथमिक उपचार संबंधित रुग्णाच्या नातलगांनी केले नसतील आणि औषधोपचाराला उशीर होत असेल तर वैद्यकीय कर्मचा-यांनीही करायला हवेत. हे प्राथमिक उपचार रुग्णालयातील कर्मचा-यांनी केले असते तर कदाचित लस मिळविण्यासाठी या वॉर्डातून त्या वॉर्डात फिरणा-या पालकांना आपल्या मुलीला वाचविता आले असते.

बिनविषारी दंशाची लक्षणे

दंशाच्या जागी वेदना होतात, रक्तस्राव होऊ लागतो, सूज येते, भीतीमुळे घाम येतो.

खायला काहीही न देणे

सर्पदंश झाल्याचे लक्षात आल्यावर रुग्णाला धीर दिला पाहिजे आणि तोंडावाटे खाण्यासाठी काहीही दिले जाणार नाही याचीही आवर्जून काळजी घेतली पाहिजे. मोकळी हवा त्याच्यापर्यंत पोहोचेल याची दक्षता घ्यावी. त्याला एकटे सोडू नये. कारण त्याला दंशानंतर काही वेळातच चक्कर येऊ लागतात.

विषारी दंशाची लक्षणे

दंशाच्या जागी मोठी सूज येऊन असह्य वेदना होतात. शरीराचा तो भाग काळानिळा पडतो. रुग्णाला उलट्या होतात. नाकावाटे रक्त येते, भोवळ येते. सर्प जर निमविषारी असेल तर त्याच्या दंशानंतर ती व्यक्ती बेशुद्ध पडते. काही वेळाने शुद्धीवर येते. वेदना होतात, मळमळ होते, चक्कर येतात.

हि माहिती अवश्य शेअर करा कदाचित कोणाचे प्राण वाचतील… सोबतच आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

वाचा ह्या दुखण्याचा संबंध असतो तुमच्या स्वभावासोबत….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.