हे आहेत जगातील सर्वात लहान देश, काही देशाची लोकसंख्या फक्त २७ नागरिक..

जगात असे ही लहान देश आहेत ज्यांचे क्षेत्रफळ प्रचंड कमी आहे. या देशांची तुलना भारताशी केली तर यातील अनेक देशांचे क्षेत्रफळ एक शहर किंवा राज्यातील एका जिह्याच्या आकारएवढे आहे. या देशाचे क्षेत्र जरी लहान असले तरी या देशात पर्यटकाची संख्या भरपूर आहे. पर्यटकामुळे हे देश प्रसिध्द आहे. आज खासरे वर बघूया जगातील काही सर्वात छोटे आणि प्रसिद्ध देश

व्हेटिकन सिटी हा जगातील सर्वात छोटा देश आहे. याचे क्षेत्रफळ 0.44 चौरस किलोमीटर आहे. येथील लोकसंख्या 800 आहे. दिवसा काम करणा-या लोकांची संख्या एकूण 1000 असते. या देशात अनेक उंच इमारती आहेत ज्या आकर्षणाचे केंद्र आहेत. इटलीतील वॅटीकन सिटी क्षेत्रफळ, लोकसंख्या यां सर्व बाबतीत जगातली सर्वात लहान ठिकाण आहे. लहान असले तरी सुंदर अशा या जागेला भेट देण्यासाठी अनेक पर्यटक येतात.

मोनाको मोनॅको या युरोपीय देशाची लोकसंख्या केवळ ३७,८०० आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात लहान देश अशी याची ओळख आहे. यूरोपचे मोनाको जगातील दुसरा सर्वात छोटा देश आहे. २० वर्षांपासून सतत समुद्री लाटांमुळे आता या देशाचे क्षेत्रफळ केवळ २.०२ चौरस किलोमीटर राहिले आहे. हा देश पर्यटनाच्या दृष्टीने उत्कृष्ट आहे.

नौरु जगातील तिस-या क्रमांकावर असलेले सर्वात छोटा देश नौरुचे क्षेत्रफळ २१.३ चौरस किलोमीटर आहे. या देशाकडे सुरक्षेसाठी कोणतीच मिलिट्री नाहीये. नौरु या देशाची लोकसंख्या ९४८८ एवढी आहे. याचे क्षेत्रफळ २१ स्क्वेअर किलोमीटर आहे.

तुवालु हा जगातील चौथ्या नंबरचा छोटा देश आहे. २६ चौरस किलोमीटरमध्ये पसरलेला हा देश १९७८ मध्ये ब्रिटनपासून स्वतंत्र्य झाला होता. तुवालु देशाची लोकसंख्या केवळ १०.६४० इतकीच आहे.

सैन मॅरिनो सैन मॅरिनो जगातील पाचव्या क्रमांकावरील सर्वात छोटा देश आहे. ६१ चौरस किलोमीटरमध्ये पसरलेल्या या देशांचा शोध एडी ३०१मध्ये झाला होता. सॅन मरिनो देशाची लोकसंख्या केवळ ३२,००० आहे. हा सर्वात प्राचीन देश म्हणून ओळखला जातो.

लिक्टनस्टीन यूरोपचे हा देश स्वित्झरलँड आणि ऑस्ट्रीयाच्या मधोमध आहे. हा जगातील ६व्या क्रमांकाच सर्वात छोटा देश आहे. याचे क्षेत्रफळ १६०.४ चौरस किलोमीटर आहे. स्वित्झर्लंडच्या पश्चिमेस असणारा लिचटेनस्टीन देश आहे.

सेंट किट्स एवम नेव्हिस सेंट किट्स एवम नेव्हिसचे क्षेत्रफळ २६१ चौरस किलोमीटर आहे. पूर्व कॅरेबिअन समुद्राच्या परिसरात वसलेल्या या देशाचे अर्थिक बाजू पर्यटन आणि शेतीमुळे मजबूत आहे. वेस्ट इंडिज येथे असलेले सैंट किट्स अॅण्ड नेवीस या दोन आईसलँडला मदर कॉलनी ऑफ वेस्ट इंडिज असे ओळखले जाते.

मालदीव हिंदी महासागरातील मालदीवसुध्दा छोट्या देशांमध्ये सामील आहे. क्षेत्रफळच्या बाबतीत हा जगातील नववा छोटा देश आहे. याचे क्षेत्रफळ २९८ चौरस किलोमीटर आहे. पर्यनटनासाठी या देशाची ओळख आहे. सुंदर निसर्गसृष्टी लाभलेला आईसलँड म्हणजेच मालदिव देश पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे.

माल्टा क्षेत्रफळाच्या दृष्टीने हा जगातील सातव्या क्रमांकाचा देश आहे. याचे एकूण क्षेत्रफळ ३१६ चौरस किलोमीटर आहे.

ग्रेनेडा या देशाचे क्षेत्रफळ ३४४ किलोमीटर स्क्वेअर आहे. हा देश अमेरिकेपासून वेगळा होऊन १९८६मध्ये अस्तित्वात आला होता. परंतु याच्या सुरक्षेची जबाबदारी आजसुध्दा अमेरिकेकडेच आहे. या देशाला मसाल्यांचा देश असेही म्हटले जाते.

आता बोनस मध्ये एक अजब गजब देश बघूया जगात एक असा देश आहे की, तो दोन पिलर्सवर आहे. या देशाची लोकसंख्या केवळ २७ आहे. इंग्लंडमधील सफोल्क समुद्र किनाऱ्यापासून १० किमी अंतरावर हा देश आहे. या देशाचे नाव आहे सीलॅंड. हा देश समुद्र किल्ल्याच्या दोन पिलर्सवर आहे. रॉय बेट्स नावाची व्यक्ती या देशाचे राष्ट्रपती आहेत. या देशाला पंतप्रधान आणि मालक ही आहे.

९ ऑक्टोबर २०१२ मध्ये बेट्स यांनी स्वत:लाच सीलॅंड या देशाचे मालक म्हणून घोषित केले. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलगा मायकल या देशाचे प्रशासन संभाळत आहे. या देशाला रफ फोर्ट म्हणूनही म्हटले जाते. याची बांधणी दुसऱ्या युद्धाच्यावेळी ब्रिटनने केली. या देशाला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळालेली नाही. या देशाकडे साधन संपत्ती नाही. मात्र, या देशाचे चलन आणि स्टॅम्प तिकीट आहे. दरवर्षी हा देश डोनेशनच्या माध्यमातून निधी गोळा करतो. पहिल्यावेळी हा देश असल्याचे समजले त्यावेळी मोठ्याप्रमाणात डोनेशन मिळाले. या देशाला पाहण्यासाठी लोक ये-जा करत असतात.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.