आपल्या दैनंदिन जीवनातील नेहमी कानावर पडणारे हे दोन शब्द आहेत. पण त्यांचा नेमका अर्थ काय असतो ते अनेकदा आपल्यालाच माहित नसतो. तुम्हाला माहीत आहे की एकच लेन असणाऱ्या रस्त्यावर केवळ काही वाहनेच धावू शकतात, तर तीन लेन असणाऱ्या रस्त्यावर एकाचवेळी अनेक वाहने धावू शकतात. असेच काहीसे सिंगल फेज आणि थ्री फेज कनेक्शनच्या बाबतीत असते. चला तर मग आज त्याच्याबद्दलचा जाणून घेऊया…
सिंगल फेज आणि थ्री फेजमध्ये फरक काय ?
आपल्या घरात आणि व्यवसायाच्या ठिकाणी वापरली जाणारी सर्व उपकरणे विजेवरच चालतात. पॉवर ग्रिडमधून येणारी वीज ही अल्टरनेटिव करंट (AC) असते. सिंगल फेज कनेक्शनमध्ये हा करंट एका वायरद्वारे पाठविला जातो तर थ्री फेज कनेक्शनमध्ये तीन वायरद्वारे पाठविला जातो. दोन्हीमध्ये एक न्यूट्रल वायर असते.
त्यामुळे सिंगल फेज कनेक्शनपेक्षा थ्री फेज कनेक्शनमध्ये विद्युत भार वाहून नेण्याची क्षमता जास्त असते. थोडक्यात आपल्या गावातील डीपीला येणारी वीज ही थ्री फेज असते, तर त्या डीपीवरुन आपल्या घरात येणारी वीज सिंगल फेज असते. सिंगल फेजमध्ये २२० व्होल्ट तर थ्रीफेजमध्ये ४४० व्होल्ट करंट असतो.
कुठे वापरली जाते सिंगल फेज आणि थ्री फेज वीज ?
बहुतांश आपल्या घरातील उपकरणे छोटी असतात, त्यामुळे त्यामुळे आपल्यां घरात सिंगल फेज लाईट असते. मोठ्या उपकरणांसाठी थ्री फेज लाईटची आवश्यकता असते.
उदा. आपल्या घरात ०.५ एचपी मोटर असेल तर ती सिंगल फेज लाईटवर चालू शकते, परंतु आपल्या शेतातील ५ एचपी मोटर चालवण्यासाठी आपल्याला थ्री फेज लाईटची आवश्यकता असते. थ्री-फेज कनेक्शनचा फायदा असा असतो की, विद्युत भार तीन टप्प्यात विभागला जातो, कुठल्या कारणाने एखादी फेज बंद झाली तर उर्वरित दोन फेजमुळे संपूर्ण विद्युतपुरवठा खंडित होण्यापासून वाचवले जाते.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.