मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटांमध्ये यादगार भूमिका साकारनारे रंगभूमीवरील नटसम्राट श्रीराम लागू यांचं काल वृद्धापकाळाने निधन झालं. ‘कुणी घर देता का घर’ अशी आर्त विनवणी करीत रसिकांचे हृदय आपल्या अभिनयातून हेलावून टाकणारा रंगभूमीवरचा ‘नटसम्राट’ काळाच्या पडद्याआड गेला. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
डॉ. श्रीराम लागू यांनी 1969 साली वसंत कानेटकर लिखित ‘इथे ओशाळला मृत्यु’ या नाटकातून अभिनय कारकीर्दीला प्रारंभ केला. मराठी चित्रपट आणि रंगभूमी गाजविल्यावर हिंदी चित्रपटसृष्टीतही डॉ. श्रीराम लागू यांनी आपली छाप उमटविली. व्ही. शांताराम यांच्या ‘पिंजरा’ चित्रपटातील मास्तरच्या भूमिकेद्वारे त्यांचे रुपेरी पडद्यावर आगमन झाले. १९७२ मधील या चित्रपटात त्यांनी वठवलेली शिक्षक ते तमाशाचा फडावरचा एक उपरा पुरुष ही प्रवाही भूमिका लक्षणीय आहे, याचा प्रत्यय आजच्या चित्रपट रसिकांनाही येतो.
श्रीराम लागू यांचा जन्म सातारचा. त्यांनी पुण्यात शिक्षण घेतले. सुरुवातीला भावे स्कुलमधून शिक्षण घेतलेले लागू यांनी पुढे फर्ग्युसन महाविद्यालयात आणि नंतर बी.जे. मेडिकल महाविद्यालयामध्ये त्यांनी डॉक्टरकीचे शिक्षण घेतले. डॉ. लागू यांच्या पश्चात पत्नी दीपा लागू आणि मुलगा आनंद लागू तसेच चुलत भाऊ उदय लागू असा परिवार आहे. त्यांचा मुलगा आनंद हा अमेरिकेमध्ये असतो.
श्रीराम लागू यांच्या आयुष्यात एक मोठा आघात १९९४ मध्ये झाला होता. त्यांनी आयुष्यात अनेक चढ उतार बघितले पण हा आघात ते शेवटपर्यंत पचवू शकले नाहीत. श्रीराम लागू यांना आनंदशिवाय दुसरा एक मुलगा होता. त्यांच्या दुसऱ्या मुलाचे नाव तन्वीर होते. १९९४ मध्ये तन्वीर मुंबई-पुणे ट्रेनने प्रवास करत होता. या प्रवासादरम्यान त्याचा एक अपघात झाला.
झोपडपट्टीतील एका मुलाने ट्रेनवर दगड मारला आणि तो दगड थेट तन्वीरला लागला. तन्वीरला हा आघात एवढा जबर बसला कि तन्वीरचे यातच अपघाती निधन झाले. मुलाच्या निधनाने श्रीराम लागू अक्षरश: आतून उन्मळून पडले होते. त्याच्या स्मरणार्थ 2004 पासून श्रीराम लागू आणि त्यांच्या पत्नीने ज्येष्ठ रंगकर्मींसाठी ‘तन्वीर सन्मान’ हा पुरस्कार देण्यास सुरुवात केली.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.