मराठीमध्ये एक म्हण प्रसिद्ध आहे, “संपूर्ण रामायण सांगून झालं तरी म्हणे रामाची सीता कोण ?” ही म्हण आठवण्यामागचे कारण देखील तसेच आहे. सध्या भारत, नेपाळ आणि श्रीलंका या तीन देशांमध्ये रामायण सुरु आहे. नाही म्हणलं तरी यापूर्वीच भारत आणि नेपाळ देशात राम हा चर्चेचा विषय बनला होता, हे कमी म्हणून की काय आता श्रीलंकेतही रावण हा विषय चर्चेचा बनला आहे.
५ ऑगस्टला भारतात राममंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम असल्याने भारतात राम चर्चेचा विषय बनला आहे. नेपाळच्या प्रधानमंत्र्यांनी राम भारतीय नसून नेपाळी होता असे वक्तव्य केल्याने नेपाळमध्येही राम चर्चेचा विषय बनला आहे. आता श्रीलंकन सरकारने रावणानेच पहिले विमान उडवले असल्याचा दावा केल्याने श्रीलंकेत रावण हा चर्चेचा विषय बनला आहे. तसं तर रावण हा श्रीलंकन नागरिकांसाठी एक महान राजा होता. त्यांच्याकडे रावणाला चक्क पुजले जाते.
श्रीलंकन सरकारच्या पर्यटन व उड्डाण मंत्रालयाने तर वर्तमानपत्रात जाहिरात देऊन रावणाविषयी लोकांकडे कुठले दस्तऐवज किंवा ऐतिहासिक पुस्तके असतील, तर ते पाठवण्याचे आवाहन केले आहे. त्यावरुन श्रीलंकन सरकारला रावण हा पौराणिक राजा आणि त्याचा हरवलेला वारसा यावर संशोधन करायचे आहे.
पुढच्या पाच वर्षात ते रावनानेच कसे पहिले विमान उडवले होते ही गोष्ट पुराव्यानिशी सिद्ध करुन दाखवणार आहेत. परंतु आज आम्ही तुम्हाला राम किंवा रावणाविषयी सांगणार नाही. आज आपण सीतेविषयी एक वेगळी माहिती जाणून घेणार आहोत.
श्रीलंकेच्या पहिल्या विमान कंपनीचे नाव सीता एअरलाइन्स का ठेवले होते ?
श्रीलंकन सरकारने जरी रावणाला पहिले विमान उडवण्याचे श्रेय दिले असले तरी श्रीलंकेच्या पहिल्या विमान कंपनीचे नाव मात्र सीतामाईच्या नावावरुन ठेवण्यात आले होते. “सीता एअर” नावाने श्रीलंकेने आपली पहिली विमासेवा सुरु केली होती. श्रीलंकेतील लोकांबरोबरच श्रीलंकन सरकारचे देखील असे मानणे आहे की भारतातून सीतामाताच सर्वात पहिल्यांदा विमानात बसून श्रीलंकेला आल्या होत्या. त्या विमानाचा स्वतः चालक रावण होता. त्यामुळेच श्रीलंकेच्या पहिल्या एअरलाईन्सला “सीता एअरलाईन्स” हे नाव देण्यात आले होते.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.