श्रावण महिना जवळ येत आहे आणि या मध्येच शिव तांडव स्त्रोत गाणारी हि व्यक्ती सोशल मिडीयावर भयंकर वायरल होत आहे. अतिशय आर्त आवाज असलेला व्यक्ती कोण आहे या बाबत अनेक जण सोशल मिडीयावर पोस्ट करत आहे. अनेक मोठ मोठ्या सेलिब्रिटीनि त्यांच्या पोस्ट सोशल मिडीयावर शेअर केल्या आहे.
प्रत्येक श्रावण सोमवारी भगवान शंकराची वेगवेगळ्या ठिकाणी उपासना केली जाते. तर हे शिव तांडव स्त्रोत म्हणणारी व्यक्ती काली चरण महाराज आहे. हि माहिती त्यांच्या फेसबुक पेज वरून शेअर करण्यात आली आहे. ९ जुलैला हि फेसबुक पोस्ट शेअर करण्यात आली होती. आणि यावर लिहण्यात आले आहे “ॐ काली पूज्य महाराज साहब के मुखारविंद से शिव तांडव स्त्रोतम भोजपुर स्थित प्राचीन भोजेश्वर शिव मंदिर में…”
कालीचरण महाराज ज्या मंदिरात जातात तिथे त्यांच्या पद्धतीने देवाची उपासना करतात. कालीचरण महाराज महाराष्ट्राचे रहिवासी आहे, ते सध्या बजरंग सेनेचे राष्ट्रीय अनुशासन प्रभारी आहे. हा व्हिडीओ बॉलीवूड स्टार अनुपम खेर याने देखील शेअर केला आहे.
हा व्हिडीओ एमपी येथील रायसेन जिल्ह्यातील भोजपूर येथील मंदिरात शूट करण्यात आला होता. येथे विशाल शिवलिंग आहे परंतु या मंदिराचे बांधकाम अपूर्ण आहे. असे सांगण्यात येते कि या मंदिराची निर्मिती एका रात्रीतून करण्यात आली होती. काली चरण महाराज आपले शिष्य अमरीश राय सोबत २३ जून ला येथे दर्शना करिता गेले होते. मंदिरात गेल्यावर जोरदार पाउस सुरु झाला त्यानंतर कालीचरण महाराजांनी हे स्त्रोत गायले होते.
महर्षी अगस्त्य त्यांचे गुरु होते त्यांच्या तालमीत मी तयार झालो असे कालीचरण महाराज सांगतात, त्यांच्या मते त्या दिवशी शिव तांडव स्त्रोत म्हणायचे नियोजित नव्हते परंतु देवाची इच्छा असल्याने हे सर्व झाले आहे.