शिवाजीमहाराज आग्र्यात औरंगजेबाच्या कैदेत असताना अस्सल राजस्थानी पत्रव्यव्हाराचे मराठी भाषांतर

शिवाजीमहाराज आग्र्यात औरंगजेबाच्या कैदेत असताना त्यांनी रचलेल्या राजकारणाचा तसेच योजलेल्या युक्त्या-कुलपत्यांचा वृतांत कथन कराणार्या अस्सल राजस्थानी पत्रव्यव्हाराचे मराठी भाषांतर.(सारांश स्वरूपात)

•••बारा मे १६६६•••
(परखलदास कडून कल्याणदास यांस)

शिवाजीमहाराज रामसिंगाला उद्देशून : मी कशाप्रकारचा माणूस आहे हे तुम्ही पाहीले, तुमच्या वडीलांनी पाहीले, मला मुद्दामच इतका वेळ उभे करण्यात आले. मी तुमची मनसब टाकून देतो मी उभे रहावे अशी तुमची इच्छा होती तर मला योग्यतेनुरूप उभे करावयचे होते. माझे मरण ओढवले आहे. एक तुम्ही तरी मला मारा नाहीतर मी स्वताला मारून घेईन.
मोगल सरदार मुल्तफाखान व मुखिलखान यांना उद्देशून : मी वस्त्रे घेणार नाही. बादशहाने मला मुद्दामच जसवंतसिंगाच्या पाठी इभे केले. मला मारायचे असेल तर मारा, कैदेत टाकायचे असेल टाका. मी वस्त्रे घालाणार नाही.
तळावर परतल्यावर सायंकाळी रामसिंगाने शिवाजीमहाराजांची समजूत घातल्यावर महाराज म्हणाले ठिक आहे मी आपल्या मुलाला( संभाजीला) माझ्या भावाबरोबर( रामसिंग₹ पाठविन. मीहि दोन दिवसानंतर येईन.शिवाजीमहाराज रामसिंगाला उद्देशून : मी कशाप्रकारचा माणूस आहे हे तुम्ही पाहीले, तुमच्या वडीलांनी पाहीले, मला मुद्दामच इतका वेळ उभे करण्यात आले. मी तुमची मनसब टाकून देतो मी उभे रहावे अशी तुमची इच्छा होती तर मला योग्यतेनुरूप उभे करावयचे होते. माझे मरण ओढवले आहे. एक तुम्ही तरी मला मारा नाहीतर मी स्वताला मारून घेईन.

•••२९ मे १६६६•••
(परखलदासकडून कल्याणदास यांस)
शिवाजीराजेंनी मुहंमद अमीनखान द्वारे बादशाहला एक अर्जी दिली आहे. त्यात शिवाजीराजेंनी म्हटले आहे : बादशाहांनी माझे जे किल्ले घेतलेत ते सर्व परत करावेत. मी दोन कोटी बादशहांना देईन. मला निरोप द्यावा. मी आपल्या मुलाला चाकरीत ठेऊन जाईन. माझ्याकडून बादशहाने पाहीजे तशी शपथ घ्यावी. मी बादशहाच्या वतनावरील श्रद्धेने येते आलो आहे. माझी निष्ठा खरी आहे. बादशहांनी एखादी मोहीम काढली तर मला बोलवावे मी येऊन हजर होईन. आता बादशहाने विजापूरची मोहीम हाती घेतली आहे. तेथे मला जाऊ द्यावे.

•••७ जून १६६६•••
(परखलदासकडून कल्याणदास दिवाण यांस)
बादशहाने शिवाजीराजेंनी निरोप पाठिवला की तुमचे सगळे किल्ले मला देऊन टाका. मी तुम्हाला मनसब देईन. शिवाजीराजेंनी अर्ज केला मला मनसबची इच्छा नाही. आणि किल्ले माझ्या अधिकारात नाहीत.
त्याच पत्राचा पुढील मजकूर आहे: मी ऐकतो की, शिवाजीराजे कुमार रामसिंग याजपाशी येऊन त्याला म्हटले मला वाटत होते की या बादशाहीत तुमचे सांगितलेले ऐकतात. पण येथे तर तुम्ही माझ्याबद्दल बादशहाला पुष्कळ समजावीत आहात. आता तुम्ही एक काम करावे. बादशहाला तुम्ही म्हणावे, हजरत हा शिवाजीराजा, त्याच्यावर मी आता लक्ष ठेवणार नाही, त्याला मारायचे असेल तर मारा. यावर रामसिंग म्हणाला मी तुम्हाला कसा सोडीन ?

•••९ जून १६६६•••
(परखलदास यांजकडून कल्याणदास यांस)
शिवाजीराजेंपाशी असलेले किल्ले त्यांनी द्यावे असे बादशहाने त्यांना सांगितले. पण शिवाजीराजे तयार झाले नाहीत. राजेंनी बादशहाला एक अर्जी केली आहे त्यात म्हटले की मला राहण्यासाठी एक वाडा देण्यात यावा त्यात मी जाऊन राहीन. पण येथे रामसिंगाशी माझा काही संबंध ठेवू नका…. शिवाजीराजेंनी रामसिंगाला सांगून पाठवले की तुम्ही माझ्याबद्दलचे जामिनपत्र बादशहाला लिहून दिले आहे ते परत मागवून घ्या. बादशहा माझे वाटेल ते करू द्या.आठ जूनला शिवाजीराजेंनी आपल्या सगळ्या नोकरांना निरोप दिला.आणि त्यांना म्हटले : येथून निघून जा. माझ्याजवळ कोणीही राहू नका. मी येथे एकटा राहीन. त्यांना मला मारायचे असेल तर मारू द्या. शिवाजीराजेंनी सिद्दी फौलादखानाच्या मार्फतीने बादशहाला कळविले की मी आपल्या सैन्याला निरोप दिला आहे. त्यांना दस्तके( प्रवासाचे परवाने) देण्यात यावी ही विनंती आहे.

•••१६ जून १६६६•••
( बल्लशहाकडून कल्यादास यांस)
अलिकडे शिवाजीराजेंनी बादशहाला अर्ज केला की मी फकिर ( संन्यासी किंवा बैरागी) होऊ इच्छितो. आज्ञा झाली तर मी काशीला जाईन. बादशहाने म्हटले ठिक आहे फकिर होऊन त्याने प्रयागच्या किल्ल्यात राहवे. तेथिल सुभेदार बहाद्दूरखान याचे त्याच्यावर लक्ष राहील.

•••१३ जुलै १६६६•••
(परखलदासकडून कल्याणदास दिवाण यांस)
शिवाजीराजेंनी मुहंमद अमिनखान व अकिलखान यांच्या मारफत पत्र लिहीली आहे. बादशहीलाही त्यांनी एक अर्ज केला आहे त्यात म्हटले आहे की मी बादशहांना माझे सर्व किल्ले देऊन टाकतो. बादशहाने मला स्वदेशी परतण्याची परवानगी द्यावी. मी येथून लिहीले तरी माझे अधिकारी मानणार नाहीत. मी तेथे जाईन आणि त्यांच्याशी लढून गड घेऊन बादशहांना देईन.बादशहाला हे पटले नाही. त्याचे म्हणने शिवाजी तेथे गेल्याने गड देतील ते येथून लिहिल्याने देणार नाहीत काय ?
त्याच पत्रातील पुढील मजकूर आहे: कुमार रामसिंग याने शिवाजीराजेंनी म्हटले बादशहांना किल्ले देऊन टाका. यावर शिवाजीराजे म्हटले तुमच्या वडीलांनी माझे बावीस किल्ले बादशहाला दिले आणि त्यांच्या मोबदल्यात टोकचा परगणा मिळवला. आता तुम्ही माझे इतर किल्ले बागशहाला देऊ करत आहात. तर तुम्ही कोणता परगणा मिळवण्याचा विचार करत आहे. तुम्ही तोडाचा परगणा घेणार आहात काय ? हे ऐकून कुमार रामसिंग गप्प बसला.

•••१८ जुलै १६६६•••
(परखलदासकडून कल्याणदास यांस)
शिवाजीराजे कुमार रामसिंगापैशी येऊन बसले होते. रामसिंगाने त्यांना म्हटले बादशहा तीन दिवसासाठी शिकारीला जात आहे ( २४ जुलै ते २७ जुलै ). मी त्यांच्याबरोबर जात आहे. त्यावर शिवाजीराजे म्हणाले तुम्ही बादशहाला म्हणावे मी शिवाजीवर लक्ष (निगाहबान) ठेवून आहे. म्हणजे बादशहा तुम्हाला येथेच ठेवेल. कुमार रामसिंग म्हणाला तुम्ही येत असाल तर तुम्हालाही शिकारीसाठी बरोबर घेऊन चलतो. शिवाजीराजे म्हणाले बादशहा माझे प्रकरण केव्हा निकालात काढणार आहे ? मी त्यांना सांगितले की माझा मामला निकालात काढा. मी असाच मरून जाईन आणि किल्ले पण बादशहाच्या हाती लागणार नाहीत.

•••२२ जुलै १६६६•••
(परखलदास यांचे कल्याणदासांच्या नावे)
शिवाजीराजेंचा एक कवी कवीन्द्र कवीश्वर आहे. त्याला शिवाजीराजेंनी एक हत्ती एक हत्तीण एक घोडा आणि वस्त्र दिली आहेत. त्याला आणखी एक हत्ती देण्याचे वचन दिले आहे.शिवाजीराजे म्हणत आहेत : बादशहा मला येथून जाण्यासाठी दस्तक देत नाही. नाहीतर मी आग्र्यात घोड्यावरून प्रवेश केला त्याचप्रमाणे घोड्यावर स्वार होऊन आग्र्यातून निधीन गेलो असतो. माझे हत्ती घोडे सर्व वाटून टाकिन आणि बैरागी होऊन बसून राहीन.

•••१८ ऑगस्ट १६६६•••
(बल्लूशहाकडून कल्याणदास यांस)
भाद्रपदे वद्य १४ शनिवार ( १८ ऑगस्ट १६६६) सवाराही सेवोजी अठास्यो भागो…. अर्थात आज सकाळीच शिवाजीराजे येथून पळाले.
(साभार : समग्र सेतू माधवराव पगडी)

Courtesy
Ajay Veersen Jadhavrao

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.