व्हिएतनाम आणि शिवाजी महाराज या घटनेमागील सत्य

व्हिएतनाम आणि शिवाजी महाराज
महाराजांचा आयुष्य हे तर संपूर्ण मानव जातीलाच आशादायी, प्रेरणादायी आणि यथोचित मार्ग दाखवणार आहे. महाराज हे रयतेचे राजे होते. आणि त्यांनी रयतेचं राज्य उभं केलं तेच स्वराज्य. महाराजांच्या आयुष्याचा त्यांचा आयुष्यातील घटनांचा दुर्घटनांचा अभ्यास आता पर्यंत खूप अभ्यासू मंडळींनी केला लिहला आणि सांगितला. पण तो अभ्यास कसा करायचा आणि महाराजांच्या आयुष्य कडे तटस्थ पणे कसं पाहायच हे मात्र कोणी शिकवलं नाही किंवा खूप कमी जणांनी शिकवलं. इंग्रजीत एक म्हण आहे “give a man a fish and you feed him for a day; teach a man to fish and you feed him for a lifetime” (तुम्ही माणसाला मासा द्या तुम्ही त्याच एक दिवस पोट भराल, तेच तुम्ही त्याला मासे पकडायला शिकवा तुम्ही त्याच आयुष्यभरासाठी पोट भराल) ही म्हण महाराजांच्या अभ्यासकांनी कधीच अवलंबली नाही. त्याचा कारण ……. तेच जाणो असो.


व्हिएतनामचा नकाशा आणि भौगोलिक स्थान

त्या दिवशी आमचे चुलत बंधू एका मोठ्या अभ्यासकांचे /व्याख्यात्याचे व्याख्यान ऐकून आले. त्यांचा चेहऱ्यावर व्याख्यानाचा नूर दिसत होता. एक वेगळाच भावनिक अभिमान चेहरयावर ठेवत ते म्हणाले “आरे तुला माहित आहे का व्हिएतनाम देशात महाराजांचा पुतळा आहे.


भुयाराच मॉडेल

तो देश आपल्या मुंबई जिल्या पेक्षा छोटा आहे. आणि त्या देशाने अमेरिकेला यौद्धात धोबीपछाड दिली. कोणामुळे माहित आहे का ? शिवाजी महाराजां मुळे. त्यांनी शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचा अभ्यास केला आणि त्याचा वापर अमेरिकन विरुद्ध केला. होचिमिन हा त्यांचा राष्ट्र पिता शिवाजी महाराजांचा गाढा अभ्यासक त्याच्या कबरीवर लिहलंय ‘ छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा इथे चिरविश्रांती घेत आहे ‘.” मी म्हणजे फुल्ल शॉक मध्ये. सगळ्यात कहर म्हणजे ही माहिती एका कडून दुसरीकडे व्हाट्सअँप वर सगळी कडे फिरते.


चू ची टनेल लपलेलं भुयारंच

तरुण मावळे अभिमानाने फुगतात, महाराज व्हिएतनाम मध्ये पण फेमस हायती तिकडे त्यांचा पुतळा हाय . असाच एकाला मी एकदा विचारला तुला काय माहिती महाराज आणि व्हिएतनाम बद्दल तर तो म्हणे त्या अभ्यासकांनी सांगितलं, ते पण एवढ्या लोकात, वर एवढे पैसे घेऊन. मग ते काय खोटा बोलत्यात का ? मी आपला गप कारण विषय भावनिक झाला होता आणि विषय भावनिक झाला की चर्चा बंद. म्हणून हा लिखाणाचा घाट.


हो ची मिन यांचं छोटं घर

मी स्वतः व्हिएतनाम मध्ये भरपूर भटकलोय . महाराजांचा पुतळा शोधलाय आणि मला जे सापडला ते तुमचा समोर मांडतोय.
आता हे एके एक मुद्यांची उकल करूया

व्हिएतनाम हा देश मुंबई जिल्ह्यापेक्षा छोटा आहे.
खरंच का अजिबात नाही मुंबई जिल्ह्याचा क्षेत्रफळ आहे ४४६ किमी वर् (446 km²). आणि व्हिएतनामच क्षेत्रफळ आहे ३३१,२१० किमी २ (331,210 km²), जगात क्षेत्रफळात किंवा आकारमानात व्हिएतनामचा ६५ वा क्रमांक आहे. आता तुम्हीच ठरवा काय ते.
अधिक माहिती साठी व्हिएतनामचा नकाशा सोबत जोडला आहे


व्हिएतनामी सैनिकांनी लावलेले काही सापळे

महाराजांचा गनिमीकावा अभ्यासून / वापरून व्हिएतनाम ने अमेरिकेला युद्धात हरवलं
व्हिएतनाम हे राष्ट्र देखील पारतंतत्र्यात होतं. व्हिएतनाम वर राज्य केला फ्रेंच लोकांनी. २ सप्टेंबर १९४५ ला व्हिएतनाम स्वतंत्र झाला आणि अलगत शीत युद्धाच्या कात्रीत सापडला. व्हिएतनामचे दोन भाग पडले नॉर्थ व्हिएतनाम आणि साऊथ व्हिएतनाम. नॉर्थ व्हिएतनाम ला पाठिंबा होता सोविएत रशियाचा आणि चीनचा म्हणजे कॉम्युनिस्ट देशांचा. पण त्यांनी कधीही प्रत्येक्ष युद्धात भाग घेतला नाही. तेच साऊथ व्हिएतनामला पाठिंबा होता अमेरिकेचा आणि अमेरिकेने या यौद्धात प्रत्यक्ष भाग देखील घेतला म्हणून ते युद्ध व्हिएतनाम व अमेरिका यांच्यातच झाल. तसेच अमेरिकेच्या बाजूने होते ऑस्ट्रेलिया, साऊथ कोरिया, न्यूझीलंड हे देश . हे युद्ध १९५४ ते १९७५ पर्यंत चालू होते.


अचानक भुयारातून (चू ची टनेल मधून) वर आलेला व्हिएतनामी सैनिक

व्हिएतनामने ने हे युद्ध गनिमी काव्याने जिंकले, हेय १००% बरोबर. पण त्यांचा गनिमीकावा आणि युद्ध करायची पद्धत खूप खूप वेगळी आहे. हे युद्ध झाल साऊथ व्हिएतनाम मध्ये. हा प्रदेश सदाहरित जंगलांचा त्यामूळ भरपूर घनदाट जंगल हे त्या प्रदेशाचे वैशिष्ठे. या सर्वांचा उपयोग तीथल्या स्थानिक लोकांनी युद्धात केला. तिथल्या स्थानिक लोकांनी त्यांच्या स्वतःच्या शरीर रचनेचाही भरपूर उपयोग करून घेतला.


भुयाराच्या प्रात्येक्षित दाखवणारा आमचा गाईड

व्हिएतनामी स्थानिक लोक हेय उंचीने आणि बांध्याने खूप छोटे. तेच अमेरिकन भरपूर हट्टे कट्टे. व्हिएतनामी लोकांनी जमिनीखाली भरपूर लांबीची भुयार खोदली होती. त्या पैकी १२१ किमीची भुयार सध्या चांगल्या स्थिती आहेत. याभुयाराना चू ची टनेल म्हणून ओळखलं जात. ही सारी भुयार या लोकांनी हाताने उकरून खोदलेली आहेत. हे लोक या भुयारं मध्ये लपून राहत. आणि त्याच भुयारातून लपत छपत अमेरिकन सैनिकांवर हल्ले करत. हि भुयार एकमेकांना जोडलेली होती. हि भुयारे आणि या भुयारांची तोंडे एवढी छोटी असत कि त्यात अमेरिकन सैनिकांना शिरताच येत नसे.


व्हिएतनामी सैनिकांचा जंगलातील राहणीमान

बऱ्याचवेळा हि तोंडे अशा शिथाफीने झाकलेली असे की कोणालाच कळणार नाही इथे भुयार आहे. हि भुयार जमिनीखाली खोलवर असल्याने बऱ्याचवेळा त्याच्यावर बॉम्बचा वा भूसुसुरुंगाचा परिणाम होत नसे. अशाच भुयारं मध्ये व्हिएतनामी राहत त्यांचा शस्रगार चालवत शाळा चालवत हॉस्पिटल चालवत. काही भुयारांची तोंडं एखाद्या पाण्याचा स्त्रोता जवळ उघडे त्या मुळे पाण्याचा प्रश्न मिटायचा. खाण्यासाठी ते लोक बांबू, शेंगदाणे, आणि ग्रीन टी याच वापर करीत आणि ते सगळं जंगलात मुबलक प्रमाणात उपलब्ध होत.


व्हिएतनामी सैनिकांचा त्यावेळेसचा आहार (उकडलेला बांबू, कुटलेले शिंगदाने, ग्रीन टी )

तसेच जंगलात वेगवेगळ्या पद्धतीचे फासे हे व्हिएतनामी लोक लावून ठेवायचे ज्याच्यात अमेरिकन सैनिक नकळत अडकायचे आणि मरायचे. शत्रूच्या रस्त्यातील सगळे पाण्याचे स्रोत या व्हिएतनामी लोकांनी पिण्यलाक ठेवले नव्हते. या सर्व प्रकार मुळे अमेरिकन सैन्याला कधीही समोर शत्रू सापडला नाही आणि त्या मुळे लढाईचा काळ वाढला.


हो ची मिन यांच्या घरातील त्यांची छोटी जेवणाची खोली

ज्या वेळेस लढाईचा काळ वाढतो त्यावेळेस बलाढय राष्ट्राला हि खर्च झेपेनासा होतो त्यात अमेरिकेतूनच या युद्धासाठी वीरोध वाढू लागला आणि १९७५ साली अमेरिकेने माघार घेतली. अशा प्रकारे सध्याचं अखंड व्हिएतनाम उदयाला आले. उदयाला आलेल्या व्हिएतनामने रशियाच्या पाऊलावर पाऊल ठेवत साम्यवादाचा (कम्युनिसीम) पुरस्कार केला.
गनिमी कावा ही एक युद्धकला आहे, या युद्ध कलेचा वापर आता पर्यंत बऱ्याच लोकांनी, देशांनी केलाय तसाच व्हिएतनामने ही.


हो ची मिन यांची गाडी जी रशियाने भेट म्हणून दिली

व्हिएतनामचा यौद्धात त्यांच्या इतिहासात महाराजांचा कुठेही उल्लेख नाही. तेथील लोकांना शिवाजी महाराज माहितही नाहीत . प्रथम आपण डोक्यातून एक काढून टाकला पाहिजे कि गनिमीकाव्याचा शोध महाराजांनी लावला. महाराजांनी फक्त त्याचा यथोचित उपयोग केला. गनिमी काव्याचा प्रथम उल्लेख इ स पूर्व ६०० ते ५०१ एका चाइनीस पुस्तकात येतो ज्याचा नाव आहे ‘आर्ट ऑफ वॉर’, खूप वाचनीय पुस्तक आहे हे. याचाच अर्थ महाराजांचा आणि व्हिएतनाम युद्धाचा काही ही संबंध नाही.

व्हिएतनाम मध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा


गुगल (shivaji staue in vietnam) वर सापडणारा फोटो

आता जर व्हिएतनामी लोकांना महाराज माहित नाहीत तर त्यांचा पुतळा ते का उभारतील. मी स्वतः व्हिएतनाम भटकलोय पण मला स्वतः ला एकदाही तो पुतळा दिसला नाही वा खुद कोणत्या व्हिएतनामी माणसाला दिसला नाही. आपल्या अभ्यासकांना कसा दिसला माहित नाही असो.


वरील फोटो जवळून

गूगलवर ‘shivaji staue in vietnam’ शोधल्यावर लांबून एक घोड्यावर बसलेल्या योध्याचा फोटो दिसतो. तो एका माणसाने तो ट्विट केलेला आहे. तो पुतळा दक्षिण व्हिएतनाम मधील एक शहर होचिमिन सिटी (जुनं नाव सैगोन) मधील आहे त्याच्या मागे एक फुलाच्या कळी सारखी काचेची इमारत दिसते तिचा नाव आहे ‘Bitexco Financial Tower’. तो एक व्हिएतनामी राज्याचा पुतळा आहे त्याचा नाव आहे ‘Trần Nguyên Hãn’. आणि त्याच्या हातात कबुतर आहे. जास्त माहितीसाठी सोबत छायाचित्र जोडली आहेत. याचा अर्थ तो पुतळा महाराजांचा नाही .


वरील फोटो अधिक जवळून

होचिमिन हा त्यांचा राष्ट्र पिता आणि शिवाजी महाराजांचा गाढा अभ्यासक त्याच्या कबरीवर लिहलंय ‘ छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा इथे चिरविश्रांती घेत आहे’
होची मिन यांचा कार्यकाळ १९ फेब्रुवारी १९५१ ते २ सप्टेंबर १९६९. यांना व्हिएतनामचे राष्ट्रपिता म्हणतात. त्यांच अजून एक वैशिष्ठ्य म्हणजे एक्दम साधी राहणी. या माणसाचं सगळ्यात मोठा वैशिष्ठ्य म्हणजे ते व्हिएतनामचा खुपमोठा ऊर्जा स्रोत होते आणि आजही आहेत.


हो ची मिन पंडित नेहरूं सोबत

आणि तो ऊर्जास्रोत कायम राहावा म्हणून व्हिएतनामच्या लोकांनी त्यांचा देह आजून ही जपून ठेवला आहे. रोज हजारो लोक आजही त्यांचं दर्शन घेतात. त्यांच्या नावावरून दक्षिण व्हिएतनाम मध्ये एका शहराचा नाव ठेवलेले (होची मिन सिटी )आहे त्या शहराचा जुना नाव आहे सैगोन.
त्यांची कबर हनोइ नावाच्या शहरात आहे. तेथे त्यांचा देह प्रक्रिया करून लोकांच्या दर्शनासाठी ठेवलेला आहे. तेथे कुठे ही असा काहीलीहलेले नाही. होची मिन यांनी लेनिन, कम्युनिसम (comunisum) चा अभ्यास केला शिवाजी महाराजांचा नाही.


हो ची मिन देह ठेवलेली इमारत

होचि मिन यांची मला आवडलेली काही वाक्य
“Remember, the storm is a good opportunity for the pine and the cypress to show their strength and their stability.”
“You can kill ten of our men for every one we kill of yours. But even at those odds, you will lose and we will win.”


हो ची मिन यांचं दर्शन घेण्यासाठी आजही होणारी गर्दी

मला फक्त एकच म्हणायचंय महाराजांचा इतिहास खूप खूप मोठा आहे. त्यासाठी खोटेपणाच्या ठिगळांची गरज नाही. आणि सगळ्यात महत्वाचे महाराजांना कोणाच्या सर्टफिकेटची गरज नाही ना व्हिएतनाम ना बोस्टन युनिव्हर्सिटी. शिवभक्तांना एक कळकळीची विनंती उगाच कोण म्हणताय म्हणून त्यावर विश्वास ठेऊ नका. स्वतः सत्य शोधा आणि प्रश्न विचार मग तो कोणीही असो अभ्यासक किंवा व्याख्याते.


हो ची मिन यांच्या घरातील त्यांची छोटी अभ्यासिका

जे आहे, जस आहे ते आपल आहे. त्याचा अभिमान बाळगा पण उगा अवास्तव खोटा अभिमान नको.

Courtesy
Abhijit Wagh

वाचा कुठे आहे शिवाजी महाराजांची अस्सल छायाचित्रे

Comments 10

 1. अगदी योग्य माहिती दिल्याबद्दल खास रे साईटचे खास अभिनंदन. महाराजांना मोठे ठरवण्यासाठी अशा गोष्टींची गरज नाही.

 2. rajendra dhage says:

  kay fhaltugiri ahe . maharaj ani vietnam shi kahi hi sambhandha nahi . kahi hi chukichi mahiti deu naka .

 3. Hemant Jadhav says:

  Thanks for correct information and the trouble taken to go to the roots.

 4. Mandar says:

  Please post this answer to Quora also.

 5. milind says:

  परिल पुतळा General Tran Nguyen Han यांचा आहे. महाराजांना आम्ही मानतो म्हणून त्या भवनांचा फायदा घेऊ नका आणि काहीही लिहत जाऊ नका.

 6. Maratha says:

  Wrong information

 7. b k kulkarni says:

  bamanacha foto aahe to.

 8. b k kulkarni says:

  brahmin zindabad

 9. b k kulkarni says:

  bamanacha putala aahe.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.